एक्स्प्लोर

Asim Sarode On Atharva Sudame: अर्थव सुदामे, तुझं तर राज ठाकरेंनी कौतुक केलं होतं, घाबरतो कशाला, व्हिडीओ डिलीट केल्यानंतर असीम सरोदे मैदानात

Asim Sarode On Atharva Sudame: नामांकीत वकील असिम सरोदे यांनी अथर्व सुदामेच्या समर्थनात एक पोस्ट केली आहे. अथर्वने तो व्हिडिओ पुन्हा अपलोड करावा. कोण काय करतंय ते बघूयात, असं म्हणत अथर्वला पाठींबा दिला आहे. 

Asim Sarode On Atharva Sudame: सध्या प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर (Social Media Influencer) अथर्व सुदामे (Atharva Sudame) वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सध्या त्याच्यावर चोहीकडून टीकेची झोड उठवली जात आहे. पण, दुसरीकडे अथर्व सुदामेच्या समर्थनातही काहीजण पोस्ट करत आहेत. अशातच अथर्व सुदामेला ब्राम्हण महासंघानं (Brahmin Mahasangh) फैलावर घेतलं असतानाच आता नामांकीत वकील असिम सरोदे (Asim Sarode) यांनी अथर्व सुगामेच्या समर्थनात पोस्ट केली आहे. आपल्या पोस्टमधून असिम सरोदे यांनी अथर्व सुदामेनं व्हिडीओ डिलीट केल्या, ते योग्य केलं नाही, असंही म्हटलं आहे. तसेच, अथर्वने तो व्हिडिओ पुन्हा अपलोड करावा. कोण काय करतंय ते बघूयात, असं म्हणत अथर्वला पाठींबा दिला आहे.  

असिम सरोदे नेमकं काय म्हणाले? 

नामांकीत वकील असिम सरोदे यांनी अथर्व सुदामेच्या समर्थनात एक पोस्ट केली आहे. पोस्टमध्ये असिम सरोदे म्हणाले की, "अथर्व सुदामे याने घाबरून व्हिडीओ डिलीट केला हे योग्य केले नाही असे वाटले. अथर्वबाबत अनेक लोक विविध मतं मांडतात. त्याच्या व्हिडीओतील विनोदाच्या दर्जाबाबत बोलले जाते. परंतु त्यानं जे रिल्स सातत्यानं तयार केलेत, स्पर्धेच्या युगात स्वतःचा एक मार्ग तयार केला, त्याचं कौतुक करायलाच पाहिजे. त्याचे काही विनोद अनेकांना उथळ,पांचट, निरर्थक वाटले असतील पण ते अश्लील नव्हते..."

"कधी उथळ, गंभीर, गमतीदार, विचार प्रवर्तक तर कधी  सुमारही अशा वळणांवरून एखादा विषय नेमकेपणाने हाताळला जातो तेव्हा धमक्या देणाऱ्यांना घाबरून अथर्वने त्याचा अत्यंत सुंदर आणि सामाजिकता, बंधुभाव, प्रेम जपण्याचे आवाहन करणारा व्हिडीओ डिलीट करणे मला चिंताजनक वाटले. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर होणारे असे टुकार हल्ले ठामपणे परतवून लावता आले पाहिजेत. तेवढयासाठी मी अथर्व सोबत आहे...", असं असिम सरोदे म्हणाले आहेत. 

"राज ठाकरे साहेबांनी अथर्वचं जाहीर कौतुक केलं होतं, तेव्हा पासून अथर्वने अधिक जबाबदारीने अनेक विषय हाताळले असे सुद्धा दिसते. एका उत्तम व्यंगचित्रकाराने दिलेल्या कौतुकाच्या शब्दांनी अथर्वला प्रोत्साहन मिळाले. पण आता काही सुमार धर्मवादी अथर्वला धमक्या देत असतांना राज ठाकरेंनी व मनसेने अथर्वच्या सोबत उभे राहावे असे आताच माझे राज साहेबांसोबत बोलणे झाले. 
अथर्वने तो व्हिडिओ पुन्हा अपलोड करावा. कोण काय करतंय ते बघूया.", असं असिम सरोदे म्हणाले. 

अथर्व सुदामेचा व्हिडीओ वादाचं केंद्रबिंदू का ठरतोय? 

प्रसिद्ध सोशल मीडिया स्टार अथर्व सुदामे सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्यासाठी कारण ठरलंय, त्याचं एक रिला. गणेशोत्सवाच्या निमित्तानं अथर्व सुदामेनं एक रिल शेअर केलं आहे. या रिलमध्ये अथर्व सुदामे एका भाविकाच्या भूमिकेत दिसतोय. अथर्व गणेशोत्सवासाठी गणरायाची मूर्ती खरेदी करण्यासाठी मूर्तीकाराकडे जातो. मूर्तीकाराच्या कारखान्यात असंख्य मूर्ती असतात. त्यातली एक मूर्ती अथर्व बूक करतो. तेवढ्यात मूर्तीकाराचा मुलगा अब्बू अशी हाक मारत तिथे येतो. तेवढ्या अथर्व सुदामे आणि तो मूर्तीकार एकमेकांकडे पाहतात. तेवढ्यात मूर्तीकार अथर्वला सांगतो की, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पुढे जाऊन मूर्ती पाहू शकता... मूर्तीकाराला वाटतं की, अथर्व सुदामे मूर्ती खरेदी करेल की नाही? पण, अथर्व सुदामे तुमच्याकडूनच मूर्ती घ्यायची आहे, असं मूर्तीकाराला निक्षूण सांगतो. 

अथर्व सुदामे मूर्तीकाराशी बोलताना म्हणतो की, "माझे वडील सांगतात की, आपण साखर व्हावं जी खीरही बनवते आणि शीरखुर्माही... तसेच आपण वीट व्हावं जी वीट देवाळातही लावली जाते आणि मशिदीमध्ये देखील..." असा संवाद या रीलच्या शेवटी अर्थवच्या तोंडी देण्यात आला आहे. या रीलवरुन अथर्व सुदामेवर हिंदुत्वाद्यांकडून टीका होत आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Atharva Sudame Apologized: 'अक्कल शिकवतोय... तुझा धंदा मर्यादित ठेव'; ट्रोलिंगनंतर अथर्व सुदामेला ब्राम्हण महासंघानंही सुनावलं, नेमकं घडलं काय?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?

व्हिडीओ

Ajit Pawar : तोंडी परीक्षा, उमेदवारीची प्रतीक्षा, इच्छुकांवर प्रश्नांची सरबत्ती Special Report
Shivaji Park Sabha:शिवाजीपार्कसाठी रस्सीखेच,शिवाजी पार्क मैदानावर कुणाचा आवाज घुमणार? Special Report
Latur News : विम्याच्या पैशासाठी स्वत:च्या मृत्यूचा बनाव, वद्धाच्या जीववर बेतला Special Report
Manrega Name Change : मनरेगा, 'जी राम जी' मध्ये फरक काय? विरोधकांचा गदारोळ Special Report
Mahapalika Mahasangram Akola : अकोल्यात पालिका निवडणुकीत कोणते मुद्दे महत्त्वाचे ठरणार?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
Prithviraj Chavan VIDEO: राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
Girish Mahajan: साधू महंतांना गांजा प्यायला सरकार पैसे देते हे बोलणं चूक, एकही अवाक्षर खपवून घेणार नाही: गिरीश महाजन
साधू महंतांना गांजा प्यायला सरकार पैसे देते हे बोलणं चूक, एक अवाक्षरही खपवून घेणार नाही: गिरीश महाजन
Embed widget