एक्स्प्लोर

Ashok Saraf : 'रसिक प्रेक्षकांचे प्रेम कायम हृदयात राहील', ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण प्रदान

जेष्ठ अभिनेते आणि सर्वांचे लाडके अशोकमामा यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

Ashok Saraf : जेष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांना महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा सर्वोच्च नागरी पुरस्कार महाराष्ट्र भूषण (Maharashtra Bhushan Award) प्रदान करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या हस्ते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. वरळी येथील डोम, एनएससीआय ( नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडिया) येथे गुरुवारी सायंकाळी 6.30 वाजता पार पडलेल्या 57 व्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यावेळी अशोक सराफ यांनी रसिक प्रेक्षकांचे आभार मानले. 

180 मराठी सिनेमे, 52 हिंदी सिनेमे, 12 नाटकं आणि त्याचे हजारो प्रयोग, 10 टिव्ही मालिका आणि कमावलेले अगणित चाहते. अशोक सराफ यांचा प्रवास अकड्यांमध्ये कोंडणं अशक्य आहे. पण याच प्रवासाचा यथोचित सन्मान करण्यासाठी राज्य सरकारनं अशोक सराफांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केला. भन्नाट टायमिंग, भूमिकेतलं वैविध्य आणि सहजता या जोरावर अशोक सराफ यांनी रंगमंच, चित्रपट आणि मालिका या तिन्हींमध्ये आपला ठसा उमटवला.

रसिक प्रेक्षकांचे प्रेम कायम हृदयात राहील : अशोक सराफ 

महाराष्ट्रातील एक क्रमांकाचा पुरस्कार तुम्ही मला दिलात, याचा खरोखर आनंद आहे. माझ्या जन्मभूमी आणि कर्मभूमी ने माझा गौरव केला. महाराष्ट्र भूषण मिळणाऱ्यांची यादी भली मोठी. त्यात मला स्थान दिले ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. पन्नास वर्षात प्रवासात ज्यांनी मला कळत नकळत का होईना मदत केली आहे, ही सगळी त्यांची किमया आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे रसिक प्रेक्षक. जे आवडले तर डोक्यावर घेतात. रसिकांना आवडलं पाहिजे हाच दृष्टीकोन ठेवला. रसिकांनी प्रेम दिले. ते उपकार मी कधीच फेडू शकणार नाही. माझ्या ह्रदयात हे प्रेम कायम राहील, अशी भावना यावेळी अशोक सराफ यांनी व्यक्त केली.

मामांच्या अभिनयाचे विविध पैलू

दादा कोंडकेंसोबत पांडू हवालदार , कळत नकळत, भस्म यांसारख्या चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांपुढे अभिनयाचे विविध पैलू त्यांनी उलगडले. 'वजीर'सारख्या चित्रपटातून राजकारणी व्यक्तिरेखा त्यांनी साकारली तर चौकट राजामधील सहृदय गुणाच्या व्यक्तिरेखा त्यांनी निभावली. ऐंशीच्या दशकात लक्ष्यामामा आणि अशोकमामा या जोडीने महाराष्ट्राला खळखळून हसवलं आणि कलेच्या माध्यमातून त्यांच्या मनोजरंजनाची सेवा देखील केली. अशी ही बनवाबनवी, धुमधडाका, एक गाडी बाकी अनाडी यांसारख्या अनेक चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांचं केवळ मनोरंजन नाही केलं तर मराठी चित्रपटाचा एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं.

अशोक सराफ यांच्या बहुरंगी अभिनयाला सचिन पिळगांवकर, महेश कोठारे यांसारख्या कसलेल्या दिग्दर्शकांची साथ मिळून नवरी मिळे नवऱ्याला, आत्मविश्वास, गंमत जंमत, आयत्या घरात घरोबा यांसारख्या कलाकृती साकार झाल्या. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी 'दामाद' या चित्रपटापासून त्यांच्या दमदार अभिनयाची एन्ट्री केली. 'करण अर्जुन', 'कोयला', 'येस बॉस', 'जोडी नं.१' हे अशोक सराफ यांचे हिंदीतील काही उल्लेखनीय चित्रपट. अमेरिकेतील सिएटल येथे झालेल्या बृहन्महाराष्ट्र कन्व्हेन्शनमध्ये त्यांनी विजय केंकरे दिग्दर्शित 'हे राम कार्डिओग्राम' या नाटकाद्वारे त्यांनी परदेशी रंगमंचावरही पाऊल ठेवले आहे.

ही बातमी वाचा : 

रंगमंच, रुपेरी पडदा अन् टीव्ही स्क्रीन व्यापून टाकणारा अभिनेता, असा आहे अशोकमामांच्या अभिनयाच्या कारकिर्दीचा प्रवास

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget