बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकाची तब्येत बिघडली; हॉस्पिटलमधील PHOTO शेअर करत दिली माहिती, नेमकं काय झालं?
Armaan Maliks Hospital Photo Goes Viral: अरमान मलिकने रुग्णालयातील फोटो शेअर करून चाहत्यांना धक्का दिला.

Armaan Maliks Hospital Photo Goes Viral: गायक अरमान मलिक आपल्या सुरेल आवाजासाठी ओळखला जातो. मात्र, अलिकडेच त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, यामुळे नेटकरी आणि त्याच्या चाहत्यांना जबरदस्त धक्का बसला आहे. अरमान मलिकने अलिकडेच सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केली आहे. यात अरमान मलिक रूग्णालयात उपचार घेत असल्याचं दिसून येत आहे. तो रूग्णालयातील कपड्यात दिसत आहे. तसेच त्याच्या हातात ड्रिप असल्याचे दिसून येत आहे. त्याने ही पोस्ट शेअर करून आरोग्याची माहिती दिली. अरमान मलिकची ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल झाली. या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करून गायकाची विचारपूस केली. दरम्यान, अरमानची तब्येत कशी बिघडली? त्याच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहे.
अरमान मलिकने सोशल मीडियावर अलिकडेच एक फोटो शेअर केला आहे. यात तो रूग्णालयात दिसत आहे. अरमान मलिकने रूग्णाचे कपडे घातलेले आहे. तसेच हातात ड्रिप दिसत आहे. फोटो शेअर करून त्यानं एक कॅप्शन दिलं आहे. कॅप्शनमध्ये अरमानने लिहिले की, "गेले काही दिवस चांगले गेले नाहीत. पण आता मी बरा आहे. माझी तब्येत ठीक झाली आहे. विश्रांती घेण्याची आणि स्वत:ला रिचार्ज करण्याची वेळ आली आहे", असं त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. अरमान मलिकची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. दरम्यान, चाहते त्याच्या तब्येतीची विचारपूस करत आहे. काही चाहत्यांनी त्याला कामापेक्षा त्याच्या आरोग्याला प्राधान्य देण्याचा सल्ला दिला आहे. तसेच त्याच्या उत्तम आरोग्यासाठी देवाकडे प्रार्थना करत आहे.
अरमान मलिकची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल
याव्यतिरिक्त अरमान मलिकने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, "या वर्षी तुम्हाला ज्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे, त्या यादीत स्वत:च्या तब्येतीचा देखील समावेश करायला विसरू नका", असं त्यानं म्हटलं आहे. या पोस्टवरून असे दिसते की, तो कदाचित अनेक समस्यांना तोंड देत असेल. मात्र, आता त्याची तब्येत बरी झाली असावी, असं पोस्टमधून दिसत आहे. दरम्यान, अरमान मलिकला नेमकं काय झालं होतं? त्याची नेमकी तब्येत कशी बिघडली? हे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. त्यानं याची माहित आपल्या चाहत्यांना दिली नाही. सध्या अरमान मलिकची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
























