'मला बेबोसोबत इंटिमेट होताना मज्जा आली...', बॉलिवूड अभिनेत्याचं करिना कपूरबाबत खळबळजनक वक्तव्य, नेटकऱ्यांनी झाप झाप झापलं
Arjun Rampal Kareena Kapoor: अर्जुन रामपालचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचं कारण म्हणजे, त्यानं त्या इंटिमेट सीनवर केलेलं भाष्य.

Arjun Rampal Kareena Kapoor: बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood Actress) आणि अभिनेते यांना बेडरुम सीन्स काही चुकले नाहीत. बॉलिवूडमध्ये (Bollywood News) असाच एक इंटिमेट सीन (Intimate Scene) खूप गाजला होता, तो करिना कपूर (Kareena Kapoor) आणि अर्जुन रामपालचा (Arjun Rampal). करीना कपूर आणि अर्जुन रामपाल यांचा 'हिरोईन' हा चित्रपट खूप चर्चेत होता. हा चित्रपट 2012 मध्ये म्हणजेच, 13 वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अर्जुन आणि करीना यांच्यात एक इंटिमेट सीन चित्रित करण्यात आला होता. त्यानंतर अर्जुननं त्याबद्दल मुलाखत दिली. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यासाठी अभिनेता आता ट्रोल होत आहे. त्याचं कारण म्हणजे, त्यानं त्या इंटिमेट सीनवर केलेलं भाष्य.
रेडिटवर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अर्जुननं हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीचा व्हिडीओ आहे. त्यात त्यानं म्हटलं आहे की, "मला बेबोसोबत इंटिमेट होण्यात खूप मज्जा आली. मला अजूनही तिच्यासोबतचा लव्ह मेकिंग सीन आठवतो..."
View this post on Instagram
जुन्या व्हिडीओमुळे ट्रोल होतोय अर्जुन रामपाल
अर्जुनचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका युजरनं लिहिलंय की, "हे खूप विचित्र आणि अनप्रोफेशनल आहे. दुसऱ्या युजरनं लिहिलंय की, "मला माहीत नव्हतं की, लोक अशी वक्तव्य इतक्या सहजपणे कशी करतात, तिसऱ्यानं लिहिलंय की, "लोकांना चित्रपट पाहायला बोलावण्यासाठीच्या या इमोशनल टॅक्टिस आहेत. या वक्तव्यामुळे अर्जुन रामपालला सतत ट्रोल केलं जातंय.
दरम्यान, ' हिरोईन' चित्रपटात करीना आणि अर्जुन व्यतिरिक्त रणदीप हुड्डा आणि मुग्धा गोडसे होत्या. करीनानं अलीकडेच बॉलिवूडमध्ये 25 वर्षे पूर्ण केली आहेत. करिनानं अनेक सिनेमांमध्ये इंटिमेट सीन्स दिले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























