(Source: ECI | ABP NEWS)
Rise and Fall Winner: अरबाज पटेल की अर्जुन बिजलानी, कोणत्या कंटेस्टेंटनं जिंकला 'राइज एंड फॉल'चा खिताब?
Rise and Fall Winner: 'राइज एंड फॉल'चा विनरचा खिताब कोण जिंकणार, याबाबत सर्वांना उत्सुकता असतानाच आता सोशल मीडियावर एक ट्वीट व्हायरल होत आहे.

Rise and Fall Winner: गेल्या कित्येक वर्षांपासून टेलिव्हिजनवर टीआरपीमध्ये (Television TRP) आपलं अव्वल स्थान कायम राखणाऱ्या 'बिग बॉस'ला (Bigg Boss) टक्कर देणारा शो पहिल्यांदाच आला आणि त्यानं धुमाकूळ घातला. तो शो म्हणजे, अश्नीर ग्रोवरचा 'राइज एंड फॉल' (Rise and Fall). तब्बल दीड महिने सुरू असलेल्या शोचा नुकताच फिनाले वीक पाहायला मिळाला. यामध्ये अरबाज पटेलला फिनालेचं पहिलं तिकीट मिळालं, तर रुलर्समध्ये अर्जुन बिजलानी आणि धनश्री वर्मा यांच्यात फिनालेच्या रेसमध्ये जाण्यासाठी कॉम्पिटिशन पाहायला मिळालं. पण, आता 'बिग बॉस 19'मधल्या सगळे स्पॉयलर्स देणाऱ्या 'बिग बॉस तक'नं 'राइज एंड फॉल'च्या विनरचं नावच जाहीर करुन टाकलं आहे. ज्यामुळे चाहते आनंदात असल्याचं पाहायला मिळतंय.
'बिग बॉस तक'नं दिलेल्या माहितीनुसार, 'राइज एंड फॉल'चा विनरचा खिताब अर्जुन बिजलानीनं जिंकलाय. यावर लोकांनी म्हटलंय की, विकीपीडियावर आरुशला विनर असल्याचं सांगितलं आहे. तर, लोकांनी ही फेक न्यूज असल्याचं सांगितलं आहे. इतर युजर्सनी लिहिलंय की, तो एकमात्र कंटेस्टंट होता, ज्यानं खेळाचे सर्व पैलू योग्य पद्धतीनं समजले आणि ते योग्य पद्धतीनं हाताळले. खेळातली सर्वच्या सर्व आव्हानं पूर्ण केली आणि जिंकण्यापासून बुद्धिमत्ता, संयम आणि आदरापासून ते धोरणात्मक निर्णय घेण्यापर्यंत, अर्जुन सर्व पातळ्यांवर योग्य ठरला. इतर स्पर्धकांमध्ये त्यांच्या खेळाच्या काही पैलूंचा अभाव होता, म्हणून तो जिंकण्यास पात्र होता.
Arjun Bijlani is the WINNER of the Rise and Fall reality show.
— BBTak (@BiggBoss_Tak) October 16, 2025
Congratulations!!!! 👏
दरम्यान, 'राइज एंड फॉल'चा ग्रँड फिनाले 17 ऑक्टोबर रोजी होणार होता, ज्याचा प्रोमो मेकर्सनी शेअर केलेला. तर, मनीषा राणी आणि बाली यांच्या इवेक्शननंतर टॉप 6 मिळालेले, ज्यामध्ये आरुष, आकृति, अरबाज, अर्जुन, धनाश्री आणि नयनदीप फिनालेपर्यंत पोहोचलेले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























