एक्स्प्लोर

Apurva Nemlekar On Pranit More Biryani Controversy: 'अतिशय लज्जास्पद, मला किळस आली...', प्रणित मोरेच्या '370 ची बिर्याणी' वादावर अपूर्वा नेमळेकरची प्रतिक्रिया

अलिकडेच रात्रीस खेळ चाले फेम अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने बिर्याणी वादावर प्रतिक्रिया दिली आहे.

Apurva Nemlekar on Pranit More: प्रणित मोरे (Pranit More) गेल्या काही दिवसांपासून  त्याच्या शोमध्ये केलेल्या एका प्रेक्षकाच्या महिलांबाबत केलेल्या अपमानास्पद बोलण्यामुळे चर्चेत आहे.  '370 रुपयांची बिर्याणी, खाऊ घातली, आता ती वसूल तर करणारच' म्हणत सभ्यतेच्या  सगळ्या मर्यादा तर ओलांडल्याच, पण त्याहीपेक्षा अधिक वाईट म्हणजे शोचा होस्ट आणि स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेने त्याच्या बोलण्याला न रोखता जवळपास अर्धा तास वेळ दिला. नंतर या क्लिप्स व्हायरल झाल्यानंतर प्रणितला जाहीर माफी मागावी लागली. आक्षेपार्ह बोलणाऱ्या 'हिमांशू जांगडा' या तरुणाला नोकरीवरून काढून टाकण्यात आले. हिमांशूच्या अनेक क्लिप्स सध्या व्हायरल होत आहेत. या प्रकारावर अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत. अलिकडेच रात्रीस खेळ चाले फेम अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने बिर्याणी वादावर प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणली अपूर्वा नेमळेकर?

अपूर्वा नेमळेकर प्रणित मोरेच्या व्हायरल बिर्याणी वादावर स्पष्टच म्हणली ' प्रणीत मोरेच्या शोमधील एक व्हायरल क्लिप नुकतीच पाहिली आणि मला अक्षरशः घृणा वाटली. एका व्यक्तीने डेटनंतर ‘वसुली’साठी आपल्या जोडीदारावर जबरदस्ती केल्याची गोष्ट अभिमानाने सांगितली, आणि समोर बसलेली तथाकथित ‘पुरुषांची’ गर्दी त्यावर हसत होती! ही कुठल्याच प्रकारे ‘डार्क कॉमेडी’ नाही. ही जबरदस्ती आणि हक्क गाजवण्याच्या मानसिकतेचं लाजिरवाणं उदाहरण आहे. त्या प्रेक्षकांमध्ये बसून हसणारे लोक पुरुष नाहीत; ते समाजावरचं ओझं आहेत. प्रेक्षक म्हणून आपण जागं होण्याची गरज आहे आणि खऱ्या अर्थाने मनोरंजन म्हणजे काय, याची जाणीव ठेवून निवड केली पाहिजे. अशा टॉक्सिक लोकांना व्यासपीठ देणं आणि त्यांना सोशल मीडिया स्टार बनवणं थांबवलं पाहिजे. त्यांना जाब विचारा आणि त्यांच्यावर बंदी घाला.: असं ती म्हणाली.


Apurva Nemlekar On Pranit More Biryani Controversy: 'अतिशय लज्जास्पद, मला किळस आली...', प्रणित मोरेच्या '370 ची बिर्याणी' वादावर अपूर्वा नेमळेकरची प्रतिक्रिया

'370ची बिर्याणी ' वक्तव्य भोवलं ; तरुणाला नोकरीवरून काढलं

गेल्या आठवड्यात प्रणित मोरेच्या शोमधील एका क्लिपची सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चा झाली. बिर्याणी वाद निर्माण होण्यापूर्वी हिमांशू जांगडा कुणाला माहीत असण्याचा कारण नाही. मात्र, या सगळ्या बिर्याणी वक्तव्य प्रकारानंतर असमवेदनशील वक्तव्यामुळे ट्रोल झालेल्या या प्रेक्षकाला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. या संदर्भात त्या तरुणाच्या बॉसने व्हिडिओ करत माहिती दिली. या व्हिडिओनंतर ज्या कंपनीत तो काम करायचा, त्या कंपनीच्या बॉसला ऑफिसमधील अनेकांचे कॉल आले. ई-मेलही आले. त्यानंतर कंपनीतील कर्मचारी, त्यांचे क्लायंट यांना फरक पडत असल्याचं लक्षात आल्यानंतर  इतकं असंवेदनशील वक्तव्य करणाऱ्या तरुणाला कामावरून काढून टाकण्यात आलं.

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Deepika padukone Spirit: 10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
Aavarapan Atul Parchure: तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले
तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले
Kangana Ranaut on Sharmila Tagore: 'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...
'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...
Advertisement

व्हिडीओ

Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
Embed widget