कधीकाळी योगा क्लास घेऊन घर चालवायची, सिनेक्षेत्रात आली अन् नशीब पालटलं, दोन सिनेमांनी कमावले 2400 कोटी
Anushka Shetty : फोटोमध्ये दिसणारी ही गोंडस मुलगी एकेकाळी योगा शिकवयाची. पण एके दिवशी एका दिग्दर्शकाचे तिच्यावर लक्ष गेले आणि ती देशातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री बनली.

Anushka Shetty : एखाद्याचं नशीब कधी आणि कसं पालटेल कोणालाही सांगता येत नाही. या फोटोतील मुलीच्या आयुष्यात असंच काहीसं घडलं आहे. कधी योग शिकवून आपलं जीवन जगत होती, पण आयुष्यात एक वेगळं वळण आलं आणि तिच्या दोन चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर 2400 कोटी रुपये कमावले. ती साऊथ इंडस्ट्रीची टॉप अभिनेत्री (Anushka Shetty) आहे आणि तिला निवडक भूमिका करण्यासाठी ओळखलं जातं. आता तिचा (Anushka Shetty) येणारा चित्रपट "घाटी" आहे, जो एक अॅक्शन फिल्म आहे, आणि त्या चित्रपटात ती एका वेगळ्या अंदाजात दिसत आहे. हा अंदाज पाहून तिच्या फॅन्समध्ये चांगलीच चर्चा आहे. ओळखलंत का ती कोण आहे? (Anushka Shetty)
ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून, बाहुबली फेम अनुष्का शेट्टी आहे, जी ‘बाहुबली’ चित्रपटातील देवसेना म्हणून ओळखली जाते. 7 नोव्हेंबर 1981 रोजी जन्मलेल्या अनुष्का शेट्टीने तिच्या करिअरची सुरुवात योगा प्रशिक्षक म्हणून केली होती. तिने भरत ठाकुरकडून योग शिकला आणि तो शिकवून तिच्या करिअरची सुरुवात केली. एक दिवस योग शिकवताना, दिग्दर्शक मेहेर रमेश यांच्या नजरेत ती आली. मेहेर यांनी तिला चित्रपटांमध्ये काम करण्याचा प्रस्ताव दिला, आणि तिथूनच तिच्या आयुष्यातला नवा वळण आला.
मेहेर यांनी अनुष्काचं नाव पुरी जगन्नाथ यांना सुचवलं, आणि अशाप्रकारे ती त्याच्या चित्रपटात दिसली. 2005 मध्ये अनुष्काने ‘सुपर’ चित्रपटाद्वारे साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केला. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खास कमाल दाखवू शकला नाही. त्यानंतर, ‘महानंदी’ चित्रपटात ती दिसली. परंतु, एस. एस. राजामौली यांच्या एका कॉलमुळे तिचं आयुष्य बदलून गेलं.
राजामौली यांच्या ‘बाहुबली’ चित्रपटाने अनुष्काला जगभर ओळख दिली. या चित्रपटात तिच्या देवसेना या भूमिकेला प्रेक्षकांनी प्रचंड लोकप्रियता दिली. ‘सिंघम’, ‘रुद्रमादेवी’, ‘अरुंधती’, आणि ‘वेदम’ सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्येही अनुष्काने आपल्या अभिनयाची छाप पाडली. ‘बाहुबली 1’ आणि ‘बाहुबली 2’ या सिनेमांनी मिळून जगभरातून 2400 कोटी रुपये कमावले. आज तिची निव्वळ संपत्ती सुमारे 140 कोटी रुपये आहे. "घाटी" चित्रपटाव्यतिरिक्त, ती एक मलयालम हॉरर फिल्म ‘कत्तनार’मध्येही दिसणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या























