Anusha Dandekar-Bhushan Pradhan :लव्ह यू..., अनुषा दांडेकरने व्यक्त केल्या भूषणविषयीच्या भावना; खास व्हिडीओने चर्चांना उधाण
Anusha Dandekar-Bhushan Pradhan : अभिनेत्री अनुषा दांडेकरने अभिनेता भूषण प्रधानच्या वाढदिवसानिमित्त एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.
Anusha Dandekar-Bhushan Pradhan : 'जुनं फर्निचर' या सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्री अनुषा दांडेकर (Anusha Dandekar) आणि भूषण प्रधान (Bhushan Pradhan) ही नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीस आली. याच सिनेमाच्या माध्यमातून त्यांच्या नव्या मैत्रीलाही सुरुवात झाली. त्यानंतर अनेक कार्यक्रमांना हे दोघे एकत्र दिसले. त्यामुळे अनुषा आणि भूषणच्या नात्याविषयी बऱ्याच चर्चा रंगू लागल्या होत्या. त्यातच आता भूषण प्रधानच्या वाढदिवसानिमित्त अनुषा दांडेकरने शेअर केलेल्या फोटोने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
अभिनेता भूषण प्रधानच्या वाढदिवसानिमित्त अनुषाने तिचा आणि भूषणचा एक खास व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये शेवटला तिने लव्ह यू भूषण असं म्हटलंय. त्यामुळे आता अनुषाने भूषणवरच्या प्रेमाची कबुली तर नाही ना दिली असा प्रश्न चाहत्यांना पडलाय. दरम्यान हा व्हिडीओ देखील अनुषा आणि भूषणच्या ट्रीपचा आहे. त्यामुळे ते दोघे एकत्र ट्रीपलाही गेले होते, हेही समोर आलंय.
अनुषाच्या व्हिडीओने वेधलं लक्ष
अनुषाने हा व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, हॅप्पी बर्थडे भूषी...भूषी... आपण नेहमीच नव्या अॅडवेनचरमध्ये एकत्र खूप छान वेळ घालवुयात... तुझं हे नवं वर्ष अनेक खूप सुंदर जावो..तू खूप हुशार आहेस आणि तुला आणखी मोठं होताना पाहण्यासाठी मी इतर जगासारखी वाट पाहू शकत नाही..मला कायमच हसवण्याबद्दल, छोट्या छोट्या गोष्टींची भेट दिल्याबद्दल खूप खूप थ्यँक्यू...जसा आहेस..तसाच कायम राहिल्याबद्दलही खरंच खूप खूप धन्यवाद...तुझं मन खूप सुंदर आहे, प्रेमळ व्यक्ती आहेस, चांगला मुलगा, भाऊ आणि मित्र आहेस. तू सगळ्यांवर नितांत प्रेम करतोस आणि त्यामध्ये मीही येते...आय लव्ह यू भूषी...
भूषणच्या मित्रांसोबतही अनुषाने घालवला वेळ
अनुषा नुकतीच भूषणच्या मित्र मैत्रीणींसोबतही वेळ घालवताना दिसली होती. पूजा सावंत, तिची बहिण रुचिरा सावंत, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर, वैभव तत्त्ववादी ही सगळी मित्रमंडळी त्यांची मैत्रीण प्रार्थना बेहेर हिच्या अलिबागच्या घरी पोहचले. इथेच त्यांनी दिवाळी देखील साजरी केल्याचं पाहायला मिळालं. यावेळी अनुषा भूषणच्या मित्र मैत्रीणींसोबत वेळ घालवताना दिसली.
View this post on Instagram