'जर जाती व्यवस्था राहिलीच नाहीये म्हणता तर कशाचे ब्राह्मण?' फुले सिनेमाच्या वादावर अनुराग कश्यप काय म्हणाला?
Anurag Kashyap on Phule Movie controversy : 'जर जाती व्यवस्था राहिलीच नाहीये म्हणता तर कशाचे ब्राम्हण?' फुले सिनेमाच्या वादावर अनुराग कश्यप काय म्हणाला?

Anurag Kashyap on Phule Movie controversy : अभिनेता आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप त्याच्या रोखठोक वक्तव्यांसाठी ओळखला जातो. तो काही मुद्यांवर त्याची मतं स्पष्टपणे मांडत असतो. दरम्यान, आता अनुरागचं एक वक्तव्य पुन्हा चर्चेत आलंय. गेल्या काही दिवसांपासून महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित सिनेमाची देशभर चर्चा आहे. या सिनेमात प्रतिक गांधी हा महात्मा फुले यांची भूमिका साकारणार आहे. महात्मा फुले यांच्या चरित्रावर आधारित सिनेमा त्यांच्या जयंतीदिवशी म्हणजे 11 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, ब्राह्मण महासंघाने विरोध केल्यानंतर सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. आता हा सिनेमा 25 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. सेन्सॉर बोर्डाने या सिनेमाला 'यू' सर्टिफिकेट दिलं आहे.
दरम्यान, इतकंच नाही तर सेन्सॉर बोर्डाने निर्मात्यांना या सिनेमासाठी संशोधनही करण्यास सांगितलं आहे. यावर अनुराग कश्यप चांगलाच भडकलाय. या विषयावर अनुराग कश्यपने सोशल मीडियावर अनेक पोस्ट देखील केल्या आहेत. अनुराग कश्यपने सेन्सॉर बोर्डावर बोलत असताना त्याने सरकारवरही जोरदार टीका केलीये.
अनुराग कश्यपने इन्स्टाग्रामवर लिहिले की, "धडक 2 या सिनेमाच्या स्क्रिनिंगबाबत सेन्सॉर बोर्डाने सांगितलं की, नरेंद्र मोदींनी भारतातील जातीव्यवस्था नष्ट केली आहे. दरम्यान, त्याच आधारावर संतोष हा सिनेमा रिलीज होऊ दिला नव्हता. आता ब्राह्मण फुले या सिनेमावर आक्षेप घेत आहेत. भैय्या जर जातीव्यवस्थाच नष्ट झालीये, तर कशाचे ब्राह्मण? असा सवाल अनुराग कश्यपने उपस्थित केलाय.
तर तुमचा ब्राह्मणवाद अस्तित्वात नाही, कारण मोदीजींनी देशातून जातीव्यवस्था नष्ट केलीये. नाहीतर मग तुम्ही सर्वजण मिळून आम्हाला मूर्ख बनवत आहात. तुम्ही सर्व मिळून निर्णय घ्या की, भारतात जातीवाद अस्तित्वाद आहे की नाही? असंही अनुराग म्हणालाय.
फुले सिनेमाचे दिग्दर्शक अनंत महादेवन काय म्हणाले होते?
अनंत महादेवन म्हणाले होते की, ट्रेलर पाहून लगेच अंदाज काढता येणार नाही चित्रपट कोणाच्या समर्थनात आहे कुणाच्या विरोधात आहे. चित्रपट पाहिल्यावर समजेल किती बॅलन्सिंग चित्रपट आहे. ब्राह्मण समाजाला आम्ही विनंती करतो की तुम्ही चित्रपट पाहा. काही गैरसमज झाले आहेत ते आम्ही क्लिअर करायला तयार आहोत. मला विश्वास आहे चित्रपट पाहिल्यावर ते पण खूश होतील. या चित्रपटात दोन्ही घटकांना समानता दिली आहे. ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले हे शाळा सुरू करू शकले, जेव्हा ब्राह्मणांनी त्यांना जागा दिली. चित्रपटात संपन्नता बॅलन्सिंग दाखवली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
























