क्राईम पेट्रोलवर अनैतिक प्रेम कहाण्या सांगणाऱ्या अनुप सोनीचं अफेअर घटस्फोटीत पत्नीनं रंगेहात पकडलं होतं
Anup Soni : क्राईम पेट्रोलवर अनैतिक प्रेम कहाण्या सांगणाऱ्या अनुप सोनीचं अफेअर घटस्फोटीत पत्नीनं रंगेहात पकडलं होतं

Anup Soni : क्राईम पेट्रोलमधील कहाणी सांगण्याच्या एका वेगळ्या अंदाजामुळे घरा घरात पोहोचणारा अनुप सोनी त्याच्या लव्हस्टोरीमुळे नेहमी चर्चेत राहिलाय. क्राईम पेट्रोलवर अनेक अनैतिक प्रेम कहाण्या आणि त्यातून झालेले मर्डर अनुप सोनी त्याच्या स्टाईलमध्ये प्रेक्षकांसमोर मांडत असतो. मात्र, याच अनुप सोनीचं अफेअर त्याच्या पत्नीने पकडलं होतं. फार कमी लोकांना माहिती असेल की अनुप सोनी हा राज बब्बर यांचा जावई आहे. अनुप सोनीचे दोन विवाह झाले आहेत. त्याच्या पहिल्या पत्नीचं नाव ऋतू सोनी आणि दुसरी पत्नी राज बब्बर यांची मुलगी जुही आहे. ऋतू सोबत संसाराची बरीच वर्षे घालवल्यानंतर अनुप सोनीचं जुही बब्बर हिच्या अफेअर सुरु झालं होतं. ऋतूला अनुपवर संशय येत होता. ऋतूला अनुप आणि जुही या दोघांवरही संशय येत होता. त्यानंतर तिने पती अनुपचे कॉल डिटेल्स काढले. तेव्हा ऋतूला समजलं की, अनुप आणि जुही बऱ्याच काळापासून फोनवर बोलत आहेत.
पहिल्या पत्नीने घटस्फोट दिल्यानंतर राज बब्बर यांच्या मुलीशी विवाह
पतीने विश्वासघात केल्यामुळे मन दुखावलेल्या ऋतूने 2010 मध्ये अनुप सोनीला घटस्फोट दिला. त्यानंतर अनुप सोनीने 2011 मध्ये जुहीशी लग्न केलं. अनूप सोनीने टेलिव्हिजनमधून नाव आणि पैसा दोन्ही कमावले. त्याचे बालिका वधू आणि क्राइम पेट्रोल हे शो खूप गाजले. अनुपने एका मुलाखतीत त्याच्या अभिनय कारकिर्दीबद्दल आणि संघर्षांबद्दल मोकळेपणाने सांगितले होते. त्यांनी सांगितले की, संघर्षाच्या दिवसांत माझी जेवणाची अबदा असायची आणि आर्थिक संकटाचाही सामना करावा लागला होता. वयाच्या 13 ते 20 वर्षांच्या कालावधीत मी जयपूरमध्ये होतो आणि तिथे माझी हिंदी चांगली झाली. हा तो काळ होता जेव्हा मला अभिनयाची आवड निर्माण झाली, तेव्हा मी त्याबद्दल खूप उत्सुक होतो.
अनुप सोनी एका मुलाखतीत म्हणाला की, NSD मध्ये जाण्यापूर्वी माझ्यासाठी अभिनय म्हणजे फक्त स्क्रिप्ट्स आणि संवाद बोलून दाखवणे एवढचं होतं. जेव्हा मी NSD जॉईन केले तेव्हा मला जाणवले की ,अभिनय करत असताना करण्यासाठी भरपूर काही आहे. वैयक्तिक आणि व्यावसायिकरित्या माझे जीवन घडवल्याबद्दल मी NSD चा सदैव ऋणी राहीन. 90 च्या दशकाच्या उत्तरार्धात मी काही मित्रांसोबत मुंबईला यायचं ठरवलं. कोणीही येऊन मला भूमिका देणार नाही म्हणून वरिष्ठांनी मला प्रोजेक्ट हाती घेण्याचा सल्ला दिला.
अनुप म्हणाला, 'त्या काळात आमच्याकडे कास्टिंग डायरेक्टर नव्हते. मुख्य भूमिकेसाठी कलाकारांची निवड चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांनी केली होती. हे सहाय्यक दिग्दर्शकच आम्हाला सहाय्यक भूमिकांसाठी निवडायचे. म्हणून मी कामासाठी त्यांच्याशी संपर्क करू लागलो.' अनूपने सांगितले की, संघर्षाच्या दिवसात त्यांना जेवणाची देखील आबदा असायची. काम नव्हते आणि नोकरीसाठी त्यांना सतत वेगवेगळ्या कार्यालयात जावे लागत होते. पुढे बोलताना अनुप म्हणाला होता की, 'मी भाग्यवान होतो की त्या दिवसांत मला मोठ्या आर्थिक संघर्षातून जावे लागले नाही. कारण आम्ही 2-3 मित्र एकत्र राहत होतो. आई-वडिलांनी थोडीफार रक्कम दिली होती. त्यामुळे पुन्हा पुन्हा विचारता येत नाही. माझे वडील सरकारी नोकरीत होते आणि त्यांना काही मर्यादा होत्या.
View this post on Instagram
इतर महत्त्वाच्या बातम्या
























