मी सुद्धा स्वत:ची लघवी पित होते, परेश रावल यांच्या नंतर आशिकी फेम अनु अग्रवालचा दावा
Anu Aggarwal revelations : मी सुद्धा स्वत:ची लघवी पित होते, असा दावा अभिनेत्री अनु अग्रवालने केला आहे.

Anu Aggarwal Revelations : बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखीत मोठा खुलासा केला होता. मी लघवी पिली होती, असं परेश रावल म्हणाले होते. त्यानंतर परेश रावल पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. एकीकडे परेश रावल यांच्या या वक्तव्यामुळे लोकं हैराण झालेले असताना आता आशिकी फेम अभिनेत्री अनु अग्रवाल हिने मी देखील स्वत:ची लघवी पिले होते, असा दावा केलाय. एवढेच नाही तर अनु अग्रवालने लघवी पिण्याचे फायदेही सांगितले आहेत.
अनु अग्रवालने पिली होती स्वत:ची लघवी
अनु अग्रवालने इंस्टंट बॉलिवूडला दिलेल्या मुलाखतीत मोठा खुलासा केलाय. जेव्हा अनुला परेश रावल यांनी लघवी पिण्याबद्दल वक्तव्य सांगितलं असता अनु अग्रवाल म्हणाली की, मी देखील स्वत:ची लघवी प्यायली होती. अनु म्हणाली- बऱ्याच लोकांना हे माहित नाही. हे जाणीवेचा अभाव आहे, पण मूत्र पिणे याला अमरोली म्हणतात. हे हठ योगाचे एक आसन आहे, ते अमृत मानले जाते.
अनु अग्रवालने लघवी पिण्याचे फायदे सांगितले
पुढे बोलताना अनु अग्रवाल म्हणाली, मी स्वत: देखील लघवी प्यायली आहे. आम्ही सर्वांनी याचा अनुभव घेतला आहे. त्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. तुम्ही संपूर्ण लघवी पिऊ नका. तुम्हाला फक्त एक भाग प्यावा लागेल. मधला भाग अमृत मानला जातो. ते त्वचेला सुरकुत्या येण्यापासून दूर ठेवते. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. मी स्वतः ते अनुभवले आहे.
परेश रावल यांनी एका मुलाखतीत खुलासा केला होता की, वीरू देवगणने त्यांना दररोज सकाळी लघवी पिण्याचा सल्ला दिला होता. तो म्हणाला की सर्व लढवय्ये हे करतात. त्यानंतर, परेश रावल 15 दिवस दररोज त्यांची लघवी प्यायले होते.
View this post on Instagram
View this post on Instagram
इतर महत्त्वाच्या बातम्या























