(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sneha Chavan : अनिकेत विश्वासरावची एक्स बायको पुन्हा अडकली लग्नबंधनात, कुटुंबियांच्या उपस्थितीत घरीच गुपचूप उरकलं लग्न
Sneha Chavan : अनिकेत विश्वासरावची एक्स बायको अभिनेत्री स्नेहा चव्हाण हिने पुन्हा एकदा लग्नगाठ बांधली आहे.
Sneha Chavan : अभिनेत्री स्नेहा चव्हाण (Sneha Chavan) आणि अनिकेत विश्वासराव (Aniket Vishwasrao) या दोघांनीही 2018 मध्ये लग्नगाठ बांधली होती. पण त्यांचा हा संसार फार काळ टिकला नाही. अवघ्या दोनच वर्षात त्या दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय घेतला. पण स्नेहाने घटस्फोट घेताना अनिकेत आणि त्याच्या कुटुंबियांवर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते. त्यानंतर बराच काळ स्नेहा अभिनयापासूनही दूर असल्याचं पाहायला मिळालं. पण आता पुन्हा एकदा स्नेहा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. कारण स्नेहाने पुन्हा एकदा लग्नगाठ बांधली आहे.
स्नेहाचं तिच्या घरीच अगदी सध्या पद्धतीने लग्न उरकण्यात आलं. तिच्या घरातले आणि काही जवळचे मित्र तिच्य या लग्नाला उपस्थित होते. स्नेहाच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत आहेत. मानस असं स्नेहाच्या नवऱ्याचं नाव आहे. तसेच स्नेहाने तिच्या रिसेप्शन लूकचेही फोटो व्हायरल झाले आहेत.
स्नेहाचे शेअर केले फोटो
लग्नासाठी स्नेहाचं घर अगदी पारंपारिक पद्धतीने सजवण्यात आलं आहे. स्नेहाचे आणि मानसच्या घरचेच या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहेत. लग्नासाठी स्नेहाने जांभळ्या रंगाची साडी परिधान केली होती. त्याचप्रमाणे मानसने त्याच रंगाची शेरवानी परिधान केली होती. रिसेप्शनसाठी स्नेहाने डिझायनर गाऊन तर मानसने ब्लॅक थ्रीपीस परिधान केला होता. त्यांच्या या रिसेप्शन पार्टीला त्यांच्या मित्र मैत्रिणींनीही हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं.
दरम्यान घटस्फोटाच्या वेळी स्नेहाने अनिकेतवर अनेक गंभीर आरोप केले होते. तसेच तिने हिंसाचार, जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचीही आरोप केला होता. पण हे सगळं पोटगी मिळवण्यासाठी ती करत असल्याचा आरोप अनिकेतने केला होता.
View this post on Instagram
View this post on Instagram