'पायऱ्या चढताना माझा टॉप हलका वर आला अन् दिग्गज निर्मात्यानं कंबरेला...'; अमृता सुभाषनं सांगितला तिच्यासोबतचा 'तो' चिड आणणारा प्रसंग
Amruta Subhash: नुकतंच अमृता सुभाषनं एका बड्या प्रोड्युसरच्या घाणेरड्या वर्तनामुळे त्याला खडसावल्याचं सांगितलं.

Amruta Subhash Reveals BIG Producer Touched Her Inappropriately: सिनेसृष्टी जेवढी ग्लॅमरस दिलते, तेवढीच तिची दुसरी बाजू अनेक विचित्र चेहऱ्यांनी व्यापलेली आहे. आजवर अनेक बॉलिवूड (Bollywood), हॉलिवूड (Hollywood) अभिनेत्रींनी सिनेसृष्टीचं पडद्यामागचं भीषण वास्तव सर्वांसमोर मांडलं आहे. याला मराठमोळी अभिनेत्री अमृता सुभाषही (Amruta Subhash) अपवाद नाही. अमृतानं यापूर्वीही तिला आलेल्या भयानक अनुभवांबाबत उघडपणे भाष्य केलं आहे. पण, या घटनांनी ती कधीच कोलडली नाही, अनेकांनी तिला याबाबत वाच्यता करु नकोस, नाहीतर तुझं करिअर संपेल असं सांगून शांत बसण्याचा सल्ला दिला. पण, अमृतानं हिमतीनं या सर्व घटनांना तोंड दिलं. याचं श्रेय ती तिच्या आयुष्यातील काही महिलांना देते. नुकतंच तिनं एका बड्या प्रोड्युसरच्या घाणेरड्या वर्तनामुळे त्याला खडसावल्याचंही अमृतानं सांगितलं. त्यासोबत तिच्या या स्पष्टवक्तेपणामुळे अनेक भूमिका गमवाव्या लागल्या, पण अमृतानं मोठ्या धीरानं सर्व परिस्थितींचा सामना केला.
अमृता सुभाषनं आजवर अनेक गाजलेल्या चित्रपटांत महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. त्यापैकी काही चित्रपटांतील भूमिकांसाठी तिला गौरवण्यातही आलं. सध्या ती तिचा आगामी चित्रपट 'जारण'मुळे ती चर्चेत आली आहे. नुकतीच तिनं झूमला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना अमृता सुभाषनं अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा केला.
बड्या प्रोड्युसरनं दिलेल्या घाणेरड्या वागणुकीबाबत बोलताना अमृतानं सांगितलं की, "एकदा मी पायऱ्यांवरुन चढत असताना माझा टॉप हलका वर आला. तेव्हाच कोणीतरी माझ्या कंबरेला हात लावला. मी लगेच मागे वळून बघितलं, तर तो एक प्रसिद्ध ज्येष्ठ निर्माता होता. मी तिथल्या तिथे त्याला फटकारलं. मी ओरडले, 'ए काय करतोय तू?, काय प्रकार होता हा?', असं म्हणत मी त्याला खडसावलं. तर त्या निर्मात्याने उलट माझ्या कपड्यांनाच दोष दिला. मी त्याला म्हटलं, "माझे कपडे नीट करणं तुझं काम नाही. मला स्पर्श करण्याची तुझी हिंमत कशी झाली?"
View this post on Instagram
"इंडस्ट्रीतल्या बड्या निर्मात्याला खडसावल्यानंतर आता मला काम मिळणार नाही, असं लोक म्हणायला लागले. पण मला काहीच फरक पडणार नव्हता. घाबरुन राहण्यापेक्षा आपला आत्मसम्मान महत्वाचा आहे. आपल्या देशात महिलांना अनेकदा अशा घटनांना सामोरं जावं लागतं. प्रत्येक ठिकाणी त्यांना असे अनुभव येतात. एकदा ट्रेनमध्ये मला एका छोट्या मुलानंही चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा मी त्याला शिक्षा न देता नीट प्रेमानं त्याची चूक समजावून सांगितली होती. जेणेकरुन तो भविष्यात कोणासोबत असं वागणार नाही.", असंही अमृता सुभाषनं सांगितलं.
त्यानं रात्री उशिरा दारु प्यायला बोलावलं... : अमृता सुभाष
"एका ज्येष्ठ निर्मात्यानं मला रात्री उशिरा घरी दारु प्यायला बोलवलं होतं. मी त्याच्या खोलीत जाऊन त्याला सुनावलं. सर, तुम्ही माझ्या वडिलांच्या वयाचे आहात. माझ्याशी अशा पद्धतीनं का बोलताय? असं मी त्यांना विचारलं. मी माझ्या सुरक्षेसाठी मुद्दामून दरवाजाही उघडाच ठेवला होता. आपण आवाज उठवला की, असे लोक आपल्याशी बोलायलाही घाबरतात. पण आपणच घाबरलेलो दिसलो तर ते आपल्याला दाबण्याचा प्रयत्न करतात. पण आपण आत्मविश्वासानं त्यांच्या डोळ्यात डोळे घालून सामना केला पाहिजे.", असं अमृता सुभाष म्हणाली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























