Amruta Khanvilkar : अमृता खानविलकरचा सोशल मीडियाला रामराम; चाहत्यांकडून चिंता व्यक्त
Amruta Khanvilkar : अभिनेत्री अमृता खानविलकरने सोशल मीडियावरुन ब्रेक घेतला आहे.
Amruta Khanvilkar : मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) सध्या चर्चेत आहे. आपल्या अभिनयासोबत नृत्याने सर्वांना भूरळ घालणारी लावण्यवती सध्या तिच्या आगामी सिनेमामुळे चर्चेत नसून एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने आता सोशल मीडियावरुन ब्रेक घेतला आहे. एक पोस्ट शेअर करत तिने चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे.
अमृता इंस्टाग्राम आणि फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चांगलीच अॅक्टिव्ह होती. इंस्टाग्रामवर तिचे तब्बल 3.7 मिलियन फॉलोअर्स आहेत. सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या मराठी सेलिब्रिटींच्या यादीत अमृताचं नाव पहिल्या पाचमध्ये आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात होती. वैयक्तिक आयुष्यासह आगामी प्रोजेक्टबद्दल अनेक गोष्टी ती चाहत्यांसोबत शेअर करत होती.
अमृताची पोस्ट काय आहे?
अमृताने खास पोस्ट शेअर करत सोशल मीडियावरुन ब्रेक घेत असल्याची माहिती चाहत्यांनी दिली आहे. तिने लिहिलं आहे,"लवकरच तुम्हाला पुन्हा भेटेल... परत येण्यासाठी योग्य वेळेची प्रतिक्षा आहे". पोस्ट शेअर करत तिने लिहिलं आहे,"लवकरच पुन्हा भेटू... गुडबाय... मी ब्रेक घेत आहे".
View this post on Instagram
अमृता सोशल मीडियावरुन ब्रेक घेत असल्याने तिचे चाहते मात्र नाराज झाले आहेत. अमृताच्या पोस्टवर घटस्फोट घेत आहेस का? लवकरच परत ये, काळजी घे, सोशल मीडियावरुन ब्रेक का घेत आहेस? पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. चाहते कमेंट्स करत चिंता व्यक्त करत आहेत. अमृताने सोशल मीडियावरुन ब्रेक का घेतला हे अद्याप समोर आलेलं नाही. काहींनी तिच्या निर्णयाचं कौतुक केलं आहे तर काहींनी तिला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. आता अमृता सोशल मीडियावर कधी परतणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
अमृताचे आगामी प्रोजेक्ट (Amruta Khanvilkar Upcoming Movie)
अमृता खानविलकरचा 'ललिता शिवाजी बाबर' (Lalita Shivaji Babar) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अमृता धावपटू 'माणदेशी एक्सप्रेम' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ललिता बाबर यांच्या भूमिकेत दिसणार आहे. 26 जानेवारी 2024 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच संजय जाधवच्या कलावती सिनेमातदेखील अमृता मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
संबंधित बातम्या