Amrita Rao On Bollywood Politics: इंडस्ट्रीपासून दूर गेलेली 'ही' अभिनेत्री, कित्येक वर्षांनी केलंय कमबॅक; बॉलिवूड पॉलिटिक्सवर म्हणाली, 'लोकांची नजर लागते...'
Amrita Rao On Bollywood Politics: कित्येक वर्षांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारी अभिनेत्री म्हणाली की, "जर तुम्ही लोकांच्या नजरेत आलात, तर तुम्हाला वाईट नजरेची बाधा होईल... तुम्हाला नजर लागेल..."

Amrita Rao On Bollywood Politics: बॉलिवूडची (Bollywood News)) सोज्वळ अभिनेत्री अमृता राव (Actress Amrita Rao) सध्या तिचा नुकताच प्रदर्शित झालेला सिनेमा 'जॉली एलएलबी 3' (Jolly LLB 3) सिनेमामुळे चर्चेत आहे. 'जॉली एलएलबी 3' सिनेमाच्या निमित्तानं ती कित्येक वर्षांनी मोठ्या पडद्यावर कमबॅक करतेय. अशातच अभिनेत्रीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत बॉलिवूडमधल्या राजकारणाबाबत (Bollywood Politics) सांगितलं. ती म्हणाली की, "जर तुम्ही लोकांच्या नजरेत आलात, तर तुम्हाला वाईट नजरेची बाधा होईल... तुम्हाला नजर लागेल..."
बॉलिवूडमधल्या पॉलिटिक्सबद्दल काय म्हणाली अमृता राव?
आपल्या सोज्वळ सौंदर्यानं घायाळ करणारी अमृता राव कित्येक वर्षांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक करतेय. तिचा नुकताच रिलीज झालेला सिनेमा 'जॉली एलएलबी 3'मुळे ती चर्चेत आली आहे. याचनिमित्तानं ती रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये आलेले. जिथे तिनं तिच्या कारकिर्दीसोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यावरही भाष्य केलं. यावेळी बोलताना तिनं सांगितलं की, तिला तिच्या बॉलिवूड करिअरमध्ये नजर लागली, तिला वाईट नजरेचा सामना करावा लागला. तसेच, तिनं बॉलिवूड पॉलिटिक्सबाबतही सांगितलं.
मुलाखतीत बोलताना तिनं सांगितलं की, "मी इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला आणि कोणत्याही गॉडफादरशिवाय सलग तीन सुपरहिट चित्रपट दिले... मी त्याबद्दल खूप आनंदी होते. पण त्यानंतर घडलेल्या काही गोष्टींमुळे मला प्रश्न पडला, 'माझ्यासोबत असं का घडतंय?"
'जेव्हा फेम मिळतं, तेव्हा नजरसुद्धा लागते...'
अमृता राव म्हणाली की, "जेव्हा तुम्ही लोकांच्या नजरेत येता, त्यावेळी सर्वांच्या नजरा तुमच्यावर खिळतात, सगळे कुजबूज करायला लागतात की, अरे ही कोण आहे? मग तुम्हाला नजर लागते. सगळे विचार करत असतील की, ही काय फालतू गोष्टी बोलतेय... पण मी खरं सांगतेय, असं खरंच होतं. मला स्वतःलाही ते जाणवलंय. एकदा मला खूप त्रास होत होता, तेव्हा माझ्या हाऊस हेल्परनं माझी नजर काढलेली... त्यानंतर मला खूप बरं वाटलं..."
View this post on Instagram
फोटोशूट केलं मी, पण नंतर त्यात दुसरीच अभिनेत्री दिसली...
अमृता राव पुढे बोलताना म्हणाली की, "राजकारण सगळीकडेच आहे आणि इथेही... 'इश्क विश्क' रिलीज झाल्यावर शाहिद आणि मी सुपरस्टार झालो... आम्ही एका अवॉर्ड शोसाठी फोटोशूट केलं. पण जेव्हा मी कव्हर शूट पाहिलं, तेव्हा त्यात खरे फोटो नव्हते... माझ्या जागी दोन सुपरस्टार होते आणि मी त्यांच्या मागे कुठेतरी उभी होते. तेव्हा, मला या गोष्टींबद्दल वाईट वाटायचं, पण आता नाही..."
कित्येकांनी टोमणे मारले...
अभिनेत्रीनं सांगितलं की, "अनेकजण नेहमीच तुम्हाला कमीपणा दाखवण्याच्या प्रयत्नात असतात. जेव्हा मी इंडस्ट्रीत नवी होते, त्यावेळी अनेकजण म्हणायचे की, अरे ही किती बारीक आहे, हा पण हे कौतुक नव्हतं बरं का...? पण, त्यावेळी कोणीच म्हटलं नाही की, अरे ही किती परफेक्ट आहे. तुम्ही स्वतःसाठी बेस्ट असायला हवं... हेच तुम्हाला कॉन्फिडन्स देणारं असतं..."
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























