
Sushmita Sen, Lalit Modi : ‘लेकीने काही सांगितलंच नाही!’, सुष्मिता सेन-ललित मोदींच्या नात्यावर अभिनेत्रीच्या वडिलांची प्रतिक्रिया...
Sushmita Sen, Lalit Modi : ललित मोदी यांनी ट्विटरवर फोटो शेअर करून आपण आणि सुष्मिता सेन डेटिंग करत असल्याची माहिती चाहत्यांना दिली होती.

Sushmita Sen, Lalit Modi : भारताची माजी मिस युनिव्हर्स-अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) आणि ललित मोदी (Lalit Modi) यांच्यातील नात्याबद्दल ऐकून केवळ चाहत्यांनाच धक्का बसलेला नाही, तर सुष्मिता सेनच्या कुटुंबीयांनाही याची माहिती नव्हती. सुरुवातीला सुष्मिताचा भाऊ राजीव सेन याने आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे म्हटले होते. आता सुष्मिताचे वडील शुभीर सेन यांचीही या नात्यावर प्रतिक्रिया आली आहे. सुष्मिता सेंच वडील आणि माजी हवाई दल अधिकारी शुभीर सेन यांनी याबद्दल बोलताना सांगितले की, त्यांना या प्रकरणाची काहीही माहिती नाहीय.
मात्र, अद्याप सुष्मिता अभिनेत्रीचे लग्न झालेले नाही, असे तिच्या वडिलांनी स्पष्ट केले. ललित मोदी यांनी ट्विटरवर फोटो शेअर करून आपण आणि सुष्मिता सेन डेटिंग करत असल्याची माहिती चाहत्यांना दिली होती.
काय म्हणाले शुभीर सेन?
एबीपीशी केलेल्या संभाषणादरम्यान शुभीर म्हणाले की, ‘मला या नात्याबद्दल काहीही माहिती नाही. मी गुरुवारी सकाळीच माझ्या मुलीशी बोललो, पण ती याबद्दल काहीच बोलली नाही. तुम्ही माझा उल्लेख केल्यावर मी पहिल्यांदा ट्विट पाहिलं. मला अजिबात माहित नसलेल्या गोष्टीबद्दल आता मी काय बोलावे हे मलाच कळत नाही.’
सुष्मिता आणि ललित मोदी यांच्या नात्याबद्दल जाणून घ्यायला मला नक्कीच आवडेल, असेही शुभीर यांनी म्हटले आहे. मात्र, सध्या त्यांना याबाबत काहीच माहिती नाही. ते म्हणाले, ‘फोनवर सहसा आम्ही मुलांच्या आरोग्याबद्दल आणि ते’ नीट खात आहे की, नाही याबद्दल बोलतो. त्यादिवशीही आम्ही नेहमीप्रमाणे यावरच बोललो. मी त्यांच्याबद्दल (ललित मोदी) काहीही ऐकले नाही. पण मला काही कळले तर नक्की सांगेन. यात लपवण्यासारखे काही नाही.’
भावाने देखील माहिती नव्हती!
एका मुलाखतीमध्ये सुष्मिताचा भाऊ राजीवला ललित मोदी आणि सुष्मिता यांच्या नात्याबाबत विचारण्यात आले. त्यावर तो म्हणाला की,'मी खुश आहे आणि हैराण देखील... मी काही बोलण्याआघी माझ्या बहिणीसोबत चर्चा करेन. मला याबाबत काहीच माहित नाही. माझी बहिणीनं याबाबत कोणतीही माहिती दिली नाही त्यामुळे मी यावर काही कमेंट करणार नाही.'
लवकरच लग्न करण्याची शक्यता
ललित मोदी आणि सुष्मिता सेन यांच्या वयामध्ये 10 वर्षाचे अतंर आहे. ललित हे 56 वर्षाचे आहेत. तर सुष्मिता ही 46 वर्षांची आहे. ललित मोदी यांनी ट्वीट शेअर करुन सुष्मिता आणि त्यांच्या नात्याची माहिती नेटकऱ्यांना दिली.पहिल्या ट्विटमध्ये सुष्मिता सेन हिचा ‘बेटरहाफ’ असा उल्लेख केला होता. त्यानंतर दुसऱ्या अन्य एका ट्विटमध्ये आम्ही अद्याप लग्न केले नाही. आम्ही रिलेशनशिपमध्ये आहोत. लवकरच लग्न करु असे म्हटलेय.
संबंधित बातम्या
ब्रेकअप के बाद! सुष्मिता सेन पुन्हा एकदा प्रेमात, ललीत मोदींनी पोस्ट केले रोमँटिक फोटो
Lalit Modi Biopic: 'थालावी' आणि '83'चे निर्माता विष्णु वर्धान इंदुरी आता ललित मोदींवर चित्रपट बनवणार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
