Happy Birthday Himesh Reshammiya : कधी काळी लोकांनी केली गाण्याची थट्टा, आता आपल्या आवाजामुळे जगभरात प्रसिद्ध झाला हिमेश रेशमिया!
Himesh Reshammiya Birthday : आपल्या दमदार आवाजासाठी प्रसिद्ध गायक हिमेश रेशमिया (Himesh Reshammiya) याचा आज (23 जुलै) वाढदिवस आहे.
Himesh Reshammiya Birthday : आपल्या दमदार आवाजासाठी प्रसिद्ध गायक हिमेश रेशमिया (Himesh Reshammiya) याचा आज (23 जुलै) वाढदिवस आहे. हिमेश रेशमिया देशातील लोकप्रिय गायकांपैकी एक आहे. हिमेश रेशमियाचा जन्म 23 जुलै 1973 रोजी गुजरातमध्ये झाला. बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक हिमेशचा आज त्याचा 46वा वाढदिवस साजरा करत आहे. हिमेश त्याच्या हटके गाण्यांसाठी ओळखला जातो. हिमेशने ‘तेरा सुरुर’, ‘झलक दिखला जा’ अशा अनेक सुपरहिट गाण्यांना आपला आवाज दिला आहे. आज तो आपल्या आवाजामुळे जगभरात गाजत असला, तरी कधीकाळी त्याच्या याच आवाजाची खिल्ली उडवली गेली होती.
हिमेशच्या वडिलांची इच्छा होती की, त्याने संगीतात करिअर करावे. वडिलांचे स्वप्न साकार करत हिमेशने गायनाच्या दुनियेत पाऊल ठेवले आणि एक एक पाऊल पुढे टाकत यश मिळवले. हिमेश आपल्या आवाजामुळे आज लाखो हृदयांवर राज्य करत आहे. हिमेश गेल्या काही वर्षांत रिअॅलिटी शोमध्येही खूप दिसला आहे. अनेक नव्या गायकांसाठी तो आदर्श बनला आहे.
सलमान खानने दिली संधी
सुरुवातीला हिमेश रेशमियाच्या आवाजाची बरीच खिल्ली उडवली गेली होती. मात्र, त्याने या सगळ्याकडे लक्ष न देता आपले गायन सुरु ठेवले. हिमेशने आतापर्यंत 700हून अधिक गाणी गायली आहेत आणि 120हून अधिक गाणी संगीतबद्ध केली आहेत. 2003 मध्ये 'तेरे नाम' या चित्रपटातून संगीत दिग्दर्शक म्हणून तो नावारूपाला आला. या चित्रपटासाठी अभिनेता सलमान खान याने त्याला पहिली मोठी संधी दिली होती. हिंदी चित्रपटसृष्टीतील तो पहिला असा गायक आणि संगीत दिग्दर्शक आहे, ज्याला त्याच्या पहिल्या गाण्यासाठी फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पदार्पण गायक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
हिमेशच्या अल्बमने रचला विक्रम
हिमेशच्या 'आप का सुरुर' या पहिल्या अल्बमबद्दल सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हा अजूनही भारतीय संगीत उद्योगाच्या इतिहासात सर्वाधिक विकला जाणारा अल्बम ठरला आहे. हिमेश रेशमियाने 2007 साली 'आप का सुरूर' या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीलाही सुरुवात केली होती. आता जगभरात हिमेशचे लाखो चाहते आहेत.
हेही वाचा :