TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्यांचा घेतलेला आढावा.
TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -
सलमानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीची पोस्ट चर्चेत
प्रसिद्ध अभिनेत्री सोमी अली सलमान खानसोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत होती. रिपोर्टनुसार, सलमान आणि तिचे नाते काही काळ टिकले पण नंतर त्यांचा ब्रेक-अप झाला. नुकतीच सोमी अलीनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून सोमीनं 'बॉलिवूडमधील हार्वे वेनस्टाईन' (Harvey Weinstein) ला वॉर्निंग मेसेज दिला आहे.
आलिया भट्ट ठरली महागडी अभिनेत्री
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. तिचा 'आरआरआर' सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालतो आहे. अशातच आलिया भट्ट 2021 वर्षातील महागडी अभिनेत्री ठरली आहे. 2021 चा ब्रॅंड व्हॅल्यूएशन अहवाल जाहीर झाला आहे. त्यानुसार आलिया भट्ट 2021 वर्षातील सर्वात महागडी अभिनेत्री ठरली आहे. 2021 वर्षातील ब्रॅंड व्हॅल्यूएशन अहवालात आलिया चौथ्या स्थानावर आहे.
राजामौलींच्या 'आरआरआर'ने पाच दिवसांत केला 100 कोटींचा टप्पा पार
एस.एस. राजामौली यांचा 'आरआरआर' सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालतो आहे. हा सिनेमा 25 मार्च रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. आता या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. आतापर्यंत या सिनेमाने 107.59 कोटींची कमाई केली आहे.
वरुण धवन आणि जान्हवी कपूरचा 'बवाल' लवकरच होणार प्रदर्शित
साजिद नाडियाडवाला आणि सिने निर्माते नितेश तिवारी यांनी त्यांच्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. 'बवाल' असे या सिनेमाचे नाव आहे. हा सिनेमा 7 एप्रिल 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. 'बवाल' सिनेमात वरुण धवन आणि जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत आहेत.
नवाजुद्दीन सिद्दीकीने केला लोकलने प्रवास
बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीनचा एक व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो मुंबई लोकल ट्रेनमधून प्रवास करताना दिसत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये नवाजुद्दीन हा लोकल ट्रेनच्या प्लॅटफोर्मवर लोकलची वाट पाहाताना दिसत आहे. त्यानंतर तो लोकलमध्ये बसतो. एबीपीच्या 'एबीपी आयडियाज ऑफ इंडिया' या (ABP Ideas of India Summit 2022) कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी नवाजने लोकलने प्रवास केला आहे.
संबंधित बातम्या
Aryan Khan : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यासाठी एनसीबीला मिळणार का मुदतवाढ? उद्या निर्णय
Documentary : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 'गोपाळ नीलकंठ दांडेकर - किल्ले पाहिलेला माणूस' माहितीपट देशभरात होणार प्रदर्शित
Alia Bhatt : आलिया भट्ट ठरली महागडी अभिनेत्री, ब्रॅंड व्हॅल्यूएशन अहवालात चौथ्या स्थानावर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha