(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shreyas Talpade : सिता आणि द्रौपदीच्या रोलमुळे आत्मविश्वास वाढला, अभिनेता श्रेयस तळपदेने उलगडला प्रवास
अभिनेता श्रेयस तळपदेने त्याचा नाटक ते दूरदर्शन मालिकांपर्यंतचा प्रवास एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर उलगडला. यावेळी त्याने विविध अनुभव सांगितले.
Majha Katta Actor Shreyas Talpade : करार हे नाटक बघून मी प्रभावीत झालो होतो. ते नाटक बघून मी शाळेत असताना शिक्षक दिनादिवशीच्या कार्यक्रमात सितेचा रोल केला. तेव्हा मी आठवीत होतो. माझे डायलॉग लगेच पाठ व्हायचे म्हणून मला हा रोल दिला होता. त्यानंतर दुसऱ्या वर्षी मी द्रौपदीचा रोल केला. तिथून माझा आत्मविश्वास वाढू लागल्याचे अभिनेता श्रेयस तळपदेने सांगितले. यावेळी त्याने पुष्पा चित्रपटातील डायलॉग देखील म्हणून दाखवला.
एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमाला दहा वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून एबीपी माझाने महाकट्ट्याचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील दहा दिग्गज मान्यवरांशी संवाद साधण्यात येणार आहे. यामध्ये अभिनेता श्रेयस तळपदे याच्याशी संवाद साधला. श्रेयसने नाटक ते दूरदर्शन मालिकांपर्यंतचा प्रवास उलगडला. 1999 पर्यंतचा वेळ आईने मला दिला होता. तोपर्यंत नाटकाचे काही झाले नाहीतर तू नोकरी करायची असे आईने सांगितल्याचे श्रेयस म्हणाला.
मराठी सिनेमाला प्राईम टाईम मिळायला हवा
इक्बाल चित्रपट केल्यानंतर मला बऱ्याच ऑफर आल्या. बरेच लोक मला नॅशनल अॅवॉर्ड फिक्स आहे असे म्हणत होते. वेगवेगळ्या दिग्दर्शकाकडून विचारणा झाली. अनेकांकडून खूप काही शिकायला मिळाले असल्याचे श्रेयसने सांगितले. दाक्षिणात्य सिनेमामुळे बॉलिवूडला घाबरायची काहीही गरज नाही. तुमचा दर्जा चांगला असेल तर ते लोक पण आपल्या फिल्म बघणारच असे श्रेयस म्हणाला. घाबरण्यापेक्षा ती एक संधी असल्याचे त्याने सांगितले. सुरुवातीला आपण मार्केंटिगमध्ये कमी पडायचो, पण आता चित्र बदलत असल्याचे श्रेयसने सांगितले. चांगला सिनेमा असेल तर लोक आणखी जातात. महाराष्ट्रात मराठी सिनेमाला प्राईम टाईम मिळायला हवा असेही श्रेयसने सांगितले.
प्रविण तांबेचा रोल माझ्यासाठी खूप कठीण होता
निर्मात्याच्या रोलसाठी मला खूप कष्ट करावे लागल्याचे त्याने सांगितले. प्रविण तांबेचा रोल माझ्यासाठी खूप कठीण होता. कारण प्रवीणची भाषा, बॉलिंग, बॅटिंग, त्याचा 20 वर्षाचा स्ट्रगल हे करणे माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होते. त्याचा रोल करता करता मी कधी प्रविण तांबे झालो ते मला समजलेच नाही असेही त्याने सांगितले. जे तुमच्याबरोबर काम करतात, त्यातील काही जणांबरोबर मैत्री राहत नाही, असेही से त्याने सांगितले.
मालिकेत छोट्या कलाकारासोबत काम करतानाचा अनुभव वेगळा आहे. मालिकेत मायराने खूप चांगले काम केले आहे. इतक्या कमी वयात ती खूप शार्प असल्याचे त्याने सांगितले. मला बॉलिवूनडमध्ये वेगळी वागणूक कधीच मिळाली नाही. जे पटलं त्या गोष्टीच मी केल्या. मला लाचारी करावी लागली. मला रोल देशील का असे करत मी कोणाकडे कधीच गेलो नाही. पहिले शूट करताना शर्ट मित्राकडून आणला होता असेही श्रेयसने सांगितले. आपल्या कामातूनच आपल्याला काम मिळाले तर ती मजा वेगळी असते. कामातून आपली ओळख झाली पाहिजे असेही त्याने सांगितले.
पुष्पा या चित्रपटाचा डबिंगचा अनुभव चांगला होता असेही श्रेयसने सांगितले. बाकिचे सिनेमं जसे डब केले तसेच मी देखील हा सिनेमा डब केल्याचे तळपदेनं सांगितले. त्या चित्रपटातील अॅक्टरचे काम मला खूप आवडली. फिल्म बघताना मी स्वत: ला तिकडे इमॅजीन करत होतो असे श्रेयसने सांगितले. पुष्पासाठी कोणाचा आवाज असावा यासाठी चर्चा सुरु असताना डबिंगे डेरेक्टर अबुल यांनी माझे नाव सुचवले. त्यांच्याबरोबर मी एक सिनेमा डब केला होता. त्यानंतर मला विचारणा झाली. मी करण्याचे ठरवले आणि केल्याचे श्रेयसने सांगितले.