एक्स्प्लोर

Amol Kolhe On MI Savitribai Jyotirao Phule Serial Offair Reasons: 'आपल्या भावना कॉर्पोरेटला समजत नाही '; अमोल कोल्हेंनी सांगितली 'मी सावित्रीबाई .. ' मालिका बंद करण्याची कारणं;  TRP, आर्थिक अडचण सगळंच सांगून टाकलं

ही मालिका नेमकी कशामुळे बंद करण्यात आली ? याची कारणमीमांसा करणारा एक व्हिडिओ नुकताच डॉ अमोल कोल्हे यांनी शेअर केला आहे. 

Mi Savitribai Jyotirao Phule serial Off-air Reasons:  गेल्या काही दिवसांपासून 'मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले' (Mi Savitribai Jyotirao Phule)मालिका टीआरपीचं कारण देत बंद केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारे अभिनेते डॉ अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी मालिका वाचवण्याचा अनेक प्रयत्न केले. मालिका कशाप्रकारे बंद पडली जाते याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वर्धापन दिनी त्यांनी तक्रारींचा पाढा वाचला होता. अमोल कोल्हे यांच्या भाषणानंतर आमदार रोहित पवार यांनी मालिकेसाठी 50 लाख रुपये तर जितेंद्र आव्हाड यांनी 10 लाख रुपये मदत जाहीर केली होती. ही मालिका बंद करू नये, यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. मात्र, वाहिनीने व्यावसायिक कारण देत मालिका सुरू ठेवण्याचा पुनर्विचार टाळला. ही मालिका नेमकी कशामुळे बंद करण्यात आली ? याची कारणमीमांसा करणारा एक व्हिडिओ नुकताच डॉ अमोल कोल्हे यांनी शेअर केला आहे. 

काय म्हणाले डॉ अमोल कोल्हे?

"जय शिवराय. मी सावित्रीबाई ज्योतीराव फुले ही स्टार प्रवाहवरील मालिका 14 जून रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतेय. शेवटचा भाग आज प्रसारित होणार आहे. ही मालिका बंद होण्याची कारणे काय आहेत? TRP हे  प्रमुख कारण आहे की आणखी काही.. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता पुढे काय होणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज मी देणार आहे. पाच जानेवारीला स्टार प्रवाहवर ही मालिका सुरु झाली होती ती 14 जूनला संपणार आहे.  जेंव्हापासून ही बातमी बाहेर आली की, मालिका बंद होतेय, तेंव्हापासून असंख्य  फोन आले, मेसेजेस , email  द्वारे  लोकांनी  ही मालिका बंद होऊ नये, हा इतिहास लोकांपार्यात पोहोचला पाहिजे यासाठी विनवण्या केल्या. परवा पंढरपुरात एका युवकानं भर उन्हात राहून ही मालिका सुरु राहावी यासाठी आंदोलन केलं. एवढच नाही तर मालिका सुरु राहावी यासाठी इंदापुरातील  निमगाव केतकी गावात गावकऱ्यांनी बैठक घेतली. बार्शी तालुक्यातील गावांमध्येही अनेक ठिकाणी मालिका सुरु राहावी यासाठी प्रयत्न झाले. आजच्या काळातही महात्मा फुले समजून घेणं, पचणे, रुचणे हे अवघड गोष्ट आहे. व्यवस्थेविरोधात बंड करणारे होते. सामाजिक क्रांतिकारक आहेत.  हा विरोध त्यांना त्या काळातही होता. म्हणून तर सावित्रीबाईंना शाळा सुरु  करताना शिणगारा सोसावा लागला. " असं अमोल कोल्हे म्हणाले.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dr. Amol Kolhe (@amolrkolhe)

 

कोणावरही आकस नाही : अमोल कोल्हे

सर्वप्रथम मी स्टार प्रवाह वाहिनीचे मनापासून आभार मानतो. कारण त्यांनी  ही मालिका करण्याची संधी दिली. आजच्या सासू सुनांच्या  मालिकांचा  बोलबाला असताना स्टार प्रवाहने सतीश राजवाडे, EP अभिजित खाडे, कौस्तुभ बेडेकर  यांचे मनापासून आभार मानतो. कारण 152 भाग का होईना ही गोष्ट सांगण्याचं धाडस  त्यांनी दाखवलं. वेळोवेळी त्यांनी पूर्ण सहकार्य दाखवलं. माझा  कोणावरही आकस नाही, रोषसुद्धा नाही, कारण ही मालिका सांगण्याचं एक  प्रामाणिक प्रयत्न  स्टार प्रवाहने केला हे मी नमूद करू इच्छितो.आपल्या सगळ्यांची जी भावना आहे, त्याला अनेक कंगोरे आहेत. कॉर्पोरेट  कल्चरला या भावना कळू शकत नाहीत अशी माझी धारणा आहे.  ही मालिका सादर करणारे जे सर्व सहकलाकार आहेत. या सगळ्यांनी मनापासून मेहनत केली. सगळ्यांचे मी आभार मानतो. जगदंब क्रिएशनची सगळी टीम ही घरचीच आहे. 

मालिका बंद होण्याची करणे काय?

" स्टार  प्रवाहने मला जे कारण दिलं ते असं आहे की , मालिकेला मिळणारा TRP आणि मालिकेला लागणारा पैसा याची सांगड  जुळत नाही  असं कॉर्पोरेटचं मत आहे. आता ही सांगड जुळत नाही, याबाबत अनेक प्रश्न अनेकांना पडू शकतात. म्हणजे याचं ऐतिहासिक मूल्य जे आहे, याची नोंद घेतलीय का? याची डबिंगची बाब लक्षात घेतलीय का.. तसेच अनेक बाबी असतात. सामाजिक बांधिलकी असते.  या अनेक गोष्टींच्या खोलात गेलं तर  आणखी गोष्टींचा गुंता  वाढत जातो. ही मालिका वाहिनीची होती. गोष्ट महाराष्ट्राची असली तरी मालिका वाहिनीच्या मालकीची असते. त्यांनी  व्यावसायिक  गणिते हा  निकष आधी लावला असेल ज्यामुळे ही मालिका बंद होतेय." असंही अमोल कोल्हे यांनी सांगितले.

आर्थिक अडचणीचा विषय

डॉ अमोल कोल्हे म्हणाले, "पुढचा प्रश आर्थिक  अडचण. यासाठी आधी मी आमदार रोहित पवार यांचे मनापासून आभार मानेन. आमदार जितेंद्र आव्हाड, आदरणीय छगन भुजबळ  याचे मनापासून आभार मानतो. कारण त्यांना हा सगळं प्रकार कळल्यानंतर त्यांनी घसघशित आर्थिक मदत जाहीर केली. स्टार प्रवाहवरील ही मालिका संपणार असली तरी गोष्ट थांबणार नाही. हे फार मोठं शिवधनुष्य आहे.  तुम्हा सर्वांच्या साथीने हे उचलायचंय. जगदंब क्रिएशनच्या संपूर्ण टीमने ठरवलं आहे. या साग्लुयातून आपण पुढे जाणार आहोत. लवकरच सगळे अपडेट तुम्हाला मिळतील.  मालिका कधी, कुठे किती वाजता सुरु होईल याबाबत मंगळवारी माहिती देईन' असं डॉ अमोल कोल्हे म्हणाले.

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Saraf On Sachin Pilgaonkar: 'त्याला पाहिजे ते मी करतो..' सचिन पिळगावकर यांच्याविषयी बोलताना अशोक सराफ म्हणाले,' तेव्हापासून सुपरस्टार म्हणायला सुरुवात झाली..'
'त्याला पाहिजे ते मी करतो..' सचिन पिळगावकर यांच्याविषयी बोलताना अशोक सराफ म्हणाले,' तेव्हापासून सुपरस्टार म्हणायला सुरुवात झाली..'
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
Advertisement

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
Mumbai Crime News: जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
Devendra Fadnavis in Nagpur: कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र;
अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र; "प्रिय अभिजीत, मी तुम्हाला लाहोरमधून पत्र लिहितोय, एक शहर जिथं दिल्लीसारखंच, आपण तेव्हा फाळणीत लाखो लोक गमावले, पण आजही.."
Chhatrapati Sambhajinagar : सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
Iran War Update: इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Embed widget