(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Navya Naveli Nanda : '..म्हणून मी अभिनय क्षेत्रात काम करणार नाही '; बिग बींच्या नातीनं सांगितलं कारण
Navya Naveli Nanda : नव्यानं तिच्या करिअरबाबत एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.
Navya Naveli Nanda : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतात. अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक ( Abhishek Bachchan) हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आहे. तसेच अभिषेकची पत्नी ऐश्वर्या (Aishwarya Rai Bachchan) देखील अभिनय क्षेत्रात काम करते. काही दिवसांपूर्वी अशी चर्चा होती की अमिताभ यांची नात नव्या नवेली नंदा (Navya Naveli Nanda) ही अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. पण आता नव्यानं अभिनय क्षेत्रा ऐवजी दुसऱ्या क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या ही बिझनेस वुमन झाली आहे. नव्यानं तिच्या करिअरबाबत एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.
नव्यानं सांगितलं की तिला अभिनय क्षेत्रात करिअर करायचं नाही. ती म्हणाली, 'मला डान्स करायला आवडतो पण मी या गोष्टींकडे जास्त गांभीर्यानेनं पाहात नाही. मला बिझनेस करायची आवड होती. माझी आजी आणि काकू या दोघीही वर्किंग वुमन आहेत. त्या आमच्या फॅमिली बिझनेसकडे लक्ष देतात. मी माझ्या वडीलांना सपोर्ट करते. पण मला अभिनय क्षेत्रात काम करायच नाहिये.'
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वी नव्याचं नाव अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीसोबत जोडलं जात होतं. तसेच अभिनेता जावेद जाफरी यांचा मुलगा मिजान जाफरीला नव्या डेट करत आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू होती पण नव्यानं याबाबत कोणतीही माहिती दिली नव्हती.
संबंधित बातम्या
- Malaika Arora : 'लोक ढोंगी आहेत'; ट्रोलर्सला मलायकानं दिलं सडेतोड उत्तर
- Bachchan Pandey : अभिषेक बच्चन अन् चंकी पांडेसोबत खास कनेक्शन; असं ठरलं 'बच्चन पांडे' नाव
- JALSA First Look Poster : ओटीटीवर होणार मनोरंजनाचा धमाका, विद्या बालनचा ‘जलसा’ लूक प्रेक्षकांच्या भेटीला!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha