एक्स्प्लोर

Amitabh Bacchan on Ratan Tata Death: एका युगाचा अंत.. अभिनेते अभिताभ बच्चन यांचा रतन टाटांच्या निधनावर शोक; म्हणाले'अनेक अद्भुत क्षण..

एक अत्यंत आदरणीय, नम्र परंतु अफाट दूरदृष्टी आणि संकल्पचा दूरदर्शी नेता हरपल्याची भावना अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्यासोबत अनेक अद्भुत क्षण घालवले असल्यासही त्यांनी म्हटलंय.

Amitabh Bacchan on Ratan Tata Death: टाटा समूह आणि भारतीय उद्योग क्षेत्राची पताका आंतरराष्ट्रीय पातळीवर मानाने फडकवणारे ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण भारतभर शोककळा पसरली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर मुंबईत रतन टाटांच्या पार्थिवाचे दर्शन घेतायेत. दरम्यान या दिग्गजाचा निधनाच्या बातमीनंतर बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनीही त्यांच्याबरोबरच्या आठवणी x माध्यमावर शेअर केल्यात.  

काय म्हणाले अमिताभ बच्चन? 

बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी रतन टाटांच्या निधनावर आपले दुःख व्यक्त व्यक्त केलं आहे. यावेळी त्यांच्याबद्दलच्या काही आठवणी ही त्यांनी शेअर केल्या. ते म्हणाले, मला नुकतेच श्री रतन टाटा यांचे निधन झाल्याचे कळाले. एका युगाचा अंत झालाय. एक अत्यंत आदरणीय, नम्र परंतु अफाट दूरदृष्टी आणि संकल्पचा दूरदर्शी नेता हरपल्याची भावना अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्यासोबत अनेक अद्भुत क्षण घालवले असल्यासही त्यांनी म्हटलंय. अनेक वेळा आम्ही काही प्रोजेक्ट्सवर एकत्र सहभागी होतो. असं म्हणत माझ्या प्रार्थना असे म्हणत रतन टाटांना श्रद्धांजली वाहिलीये.

वयाच्या 86 व्या वर्षी रतन टाटांचे निधन

टाटा सन्सचे चेअरमन एमेरिटस रतन टाटा यांचे बुधवारी रात्री मुंबईतील रुग्णालयात निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. 28 डिसेंबर 1937 रोजी नवल आणि सुनू टाटा यांच्या घरी जन्मलेले रतन हे टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे पणतू होते. रतन टाटा लहान असताना त्यांचे पालक वेगळे झाले आणि त्याचे संगोपन त्यांच्या आजीने केले. 1991 मध्ये त्यांनी टाटा समूहाची धूरा देण्यात आली. 

बॉलिवूडकडून रतन टाटा यांना श्रद्धांजली

रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहताना अभिनेता बोमन इराणी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत लिहिलंय, "उद्योग, परोपकार, भव्यता, मानवतेवर आणि प्राण्यांवरचे त्यांचे प्रेम. त्यांनी देशासाठी खूप मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या जाण्यानंतरही ते सर्वांसाठी नेहमीच भारताचे सर्वोत्तम नागरिक असतील. ते नेहमीच आमच्या आठवणींमध्ये राहतील. तुझ्या आत्म्याला शांती लाभो, रतनशा."

सलमान खान, रितेश देशमुखकडून श्रद्धांजली

सलमान खानने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलंय, "रतन टाटा यांच्या निधनानं खूप दुःख झालं आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो" रितेश देशमुखने एक्स मीडिया पोस्टमध्ये म्हटलंय, "असा माणूस पुन्हा होणे नाही. रतन टाटा आता आपल्यात नाहीत, याचं खूप दु:ख झालं. त्यांचं कुटुंब आणि प्रियजनांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. गौरवशाली आत्म्याला शांती लाभो".

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News : एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Hingoli Shaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्गाला हिंगोलीच्या शेतकऱ्यांचा विरोध, 24 जानेवारीला आंदोलनTop 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 7AM : 18 Jan 2025 :  ABP MajhaAaditya Thackeray : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यापासून मुख्यमंत्र्यांना कोण अडवतंय? ABP MAJHAABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 7 AM : 18 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News : एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Embed widget