Allu Arjun Video : 'पुष्पा नाम सुनकर फ्लावर समझा क्या, मैं फायर हूं'!!!  सगळीकडेच सध्या ‘पुष्पा’ (Pushpa The Rise) चित्रपटातील गाण्यांची आणि संवादांची क्रेझ दिसत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन आता बराच काळ लोटला आहे. चित्रपटगृहांमधून हा चित्रपट आता OTT प्लॅटफॉर्मवरही आला आहे. पण, अजूनही या चित्रपटाची हवा प्रेक्षकांच्या डोक्यातून कमी झालेली नाही. बऱ्याच दिवसांनी एखादा चांगला चित्रपट पाहायला मिळतो, तेव्हा चाहत्यांमध्येही त्याची क्रेझ दिसते. 


‘पुष्पा’ या चित्रपटात अल्लू अर्जुनने (Allu Arjun) ‘पुष्पराज’ची व्यक्तिरेखा प्रेक्षकांसमोर अतिशय नेत्रदीपक पद्धतीने मांडली आहे. या अभिनेत्याने पडद्यावर एक सामान्य मजूर ते चंदन तस्कर पुष्पराज अशी ही भूमिका उत्तमरित्या साकारली आहे. बॉडी लँग्वेज किंवा स्टाईल, या चित्रपटात तो त्याच्या अभिनयाला पूर्ण न्याय देताना दिसला. कदाचित त्यामुळेच लोकांना त्याचा चित्रपट खूप आवडला आहे. 


ट्रान्सफॉर्मेशन व्हिडीओची चर्चा!


आता अल्लू अर्जुनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप शेअर केला जात आहे. हा एक ट्रान्सफॉर्मेशन व्हिडीओ आहे, जो पुष्पाच्या भूमिकेसाठी अल्लू अर्जुन कसा तयार झाला हे दाखवतो. या चित्रपटात खराखुरा ‘पुष्पराज’ दिसावा यासाठी अल्लू अर्जुनने भरपूर कष्ट घेतले होते. 


पाहा व्हिडीओ :



अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’साठीचा हा मेकओव्हर व्हिडीओ पाहून तुम्हाला समजले असेलच की, त्याने या पात्रासाठी किती मेहनत घेतली आहे. ‘पुष्पा’च्या भूमिकेला पडद्यावर जिवंत करण्यासाठी प्रोस्थेटिक मेकअपचा वापर केला गेला आहे, ज्यासाठी खूप संयम आवश्यक होता. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कळते की, अल्लू अर्जुनने या चित्रपटासाठी अपर कष्ट घेतले आहेत. कदाचित या भूमिकेसाठी अल्लू इतका सक्षम दुसरा अभिनेता नसावा!


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha