Coronavirus Cases Today in India : देशात कोरोना संसर्गाचा आलेख घटताना पाहायला मिळतोय. दैनंदिन कोरोनाबांधितांच्या संख्येत सातत्याने घट होताना पाहायला मिळतेय. देशात गेल्या 24 तासात 50 हजार 407 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 804 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा आदल्या दिवशीपेक्षा कमी आहे. काल देशात 58 हजार 77 नवे कोरोना रुग्ण आढळले होते तर, 657 जणांचा मृत्यू झाला होता. गेल्या 24 तासात भारतात एक लाख 36 हजार 962 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 6 लाख 10 हजार 443 इतकी झाली आहे. दैनंदिन रुग्ण सकारात्मक दर 3.48 वर पोहोचला आहे. जाणून घ्या देशातील कोरोनाची सद्यस्थिती काय आहे.


सक्रिय रुग्णांची संख्या 6 लाख 10 हजार 443 इतकी कमी


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 6 लाख 10 हजार 443 वर आली आहे. कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या पाच लाख सात हजार 981 इतकी झाली आहे. आकडेवारीनुसार, शुक्रवारी दिवसभरात 1 लाख 36 हजार 962 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 4 कोटी 14 लाख 68 हजार 120 लोक संसर्गमुक्त झाले आहेत.





 


आतापर्यंत सुमारे 172 कोटी डोस देण्यात आले


देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत, आतापर्यंत सुमारे 172 कोटी अँटी-कोरोनाव्हायरस लसींचे डोस देण्यात आले आहेत. काल 46 लाख 82 हजार 662 डोस देण्यात आले, त्यानंतर आतापर्यंत लसीचे 172 कोटी 29 लाख 47 हजार 688 डोस देण्यात आले आहेत.


इतर महत्त्वाच्या बातम्या :


Covid19 Vaccine : फायझर लसीच्या पाच वर्षाखालील मुलांवरील वापरासाठी प्रतिक्षा, मंजुरीसाठी अधिक माहिती गरजेची : FDA


Anil Ambani : अनिल अंबानी यांना मोठा झटका, सेबीने घातले कठोर निर्बंध


Health Tips : अनोशेपोटी खा मनुका, होतील 'हे' फायदे


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha