Kangana Ranaut : बॉलिवूची ‘पंगा क्वीन’ कंगना रनौत (Kangana Ranaut) नेहमीच चर्चेत असते. बेधडक वक्तव्यांमुळे ती सतत कोणत्या ना कोणत्या वादात अडकते. पण, यावेळी अभिनेत्रीने वेगळ्या पद्धतीने लोकांचे मनोरंजन करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी कंगना 16 सेलिब्रिटींवर अत्याचार करताना दिसणार असून, तिने त्याची झलकही सादर केली आहे.


कंगना लवकरच डिजिटल जगात पाऊल ठेवणार आहे. ती 'लॉक अप' (Lock Up) नावाचा रिअ‍ॅलिटी शो घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कंगना हा शो होस्ट करताना दिसणार आहे. मेकर्सनी नुकतेच शोचे पोस्टर रिलीज करून कंगनाचा बोल्ड लूक दाखवला होता, आता या शोचा टीझर देखील रिलीज झाला आहे. कंगनाचा हा शो 27 फेब्रुवारीपासून MX Player आणि Alt Balajiवर प्रसारित होणार आहे. टीझरमध्ये कंगनाची बेधडक स्टाईल पुन्हा एकदा दिसली आहे. सोबतच तिने हे देखील स्पष्ट केले आहे की, हा जेल तिचा असेल आणि इथले नियमही तिचे असतील. शोचा ट्रेलर 16 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.


'लॉक अप'चा टीझर आऊट


कंगना रनौतच्या नवीन शो 'लॉक अप' चा टीझर Alt Balaji, MX Player आणि तिच्या इन्स्टा पेजवरून शेअर केला आहे. या टीझरमध्ये पंगा क्वीनची हटके स्टाईलच सांगते की, हा शो किती भव्यदिव्य होणार आहे.


पाहा टीझर :



सर्वात मोठा रिअ‍ॅलिटी शो असल्याचा दावा!


व्हिडीओची सुरुवात कंगनाने होते, ज्यामध्ये ती एका शिमरी आऊटफिटमध्ये दिसत आहे. व्हिडीओमध्ये कंगना म्हणते की, 'या जगात दोन प्रकारचे लोक आहेत, एक ज्यांना मी आवडते आणि दुसरे बी ग्रेड स्ट्रगलर्स जे माझ्यावर टीका करून चर्चेत राहतात. असे लोक ज्यांनी माझा आवाज दडपण्यासाठी एफआयआर केले, घराणेशाहीचा फॉर्म्युला लावला. माझ्या आयुष्याला 24*7 रिअ‍ॅलिटी शो बनवले. पण आता माझी बारी आहे. मी घेऊन येत आहे 'द फादर ऑफ बिगेस्ट रिअ‍ॅलिटी शो'. हे माझे जेल आहे आणि यात 16 वादग्रस्त सेलिब्रिटी असतील. आता तेच तेच होईल जे मला हवंय आणि पप्पांचे पैसे असूनही जामीन मिळणार नाही.’


‘ना चलेगी भाईगिरी, ना पापा का पैसा’


व्हिडीओ शेअर करताना कंगना रनौतने खूप बोल्ड कॅप्शन दिले आहे, 'मेराजेल है ऐसा, ना चलेगी भाईगिरी, ना पापा का पैसा! @mxplayer आणि @altbalaji. 27 फेब्रुवारीपासून #LockUpp स्ट्रीमिंगसाठी सज्ज व्हा. 16 फेब्रुवारीला ट्रेलर रिलीज होणार आहे.’ ‘लॉक अप’ हा शो सेलिब्रिटींवर आधारित रिअ‍ॅलिटी शो असेल, ज्यामध्ये 16 स्पर्धकांना सुमारे 72 दिवस दोन तुरुंगात ठेवण्यात येईल.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha