Vishal Nikam : औक्षण,आशिर्वाद,आपलेपणा! ‘बिग बॉस मराठी 3’ विजेता विशाल निकमने कुटुंबासोबत साजरा केला वाढदिवस

Vishal Nikam

1/6
‘बिग बॉस मराठी 3’चा विजेता विशाल निकम याने नुकताच त्याचा वाढदिवस संपूर्ण कुटुंबासोबत साजरा केला. याची काही खास क्षणचित्रे त्याने सोशल मीडियावर शेअर केली आहेत.
2/6
विशालचा जन्म 10 फेब्रुवारी 1994 रोजी झाला. तो मुळचा सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील देवीखिंडी गावचा आहे.
3/6
विशालने सांगलीतील विटा येथून भौतिकशास्त्र या विषयातून पदवी घेतली. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मिथुन' या चित्रपटामध्ये विशालने महत्वाची भूमिका साकारली होती.
4/6
'साता जल्माच्या गाठी' या मालिकेतील विशालच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. 'दख्खनचा राजा ज्योतिबा' या मालिकेमुळे विशालला लोकप्रियता मिळाली.
5/6
'जय भवानी जय शिवाजी' या मालिकेमध्ये देखील विशालने महत्त्वाची भूमिका साकारली होती. ‘बिग बॉस मराठी 3’मधून त्याने चाहत्यांची मने जिंकली.
6/6
‘बिग बॉस मराठी 3’च्या घरातही खेळाडूवृत्ती, टास्क जिंकण्याची जिद्द, घरातील वावर, स्पष्टवक्तेपणा यामुळे तो नेहमीच चर्चेत राहिला. (All PC : @vishhalnikam/IG)
Sponsored Links by Taboola