Marathi Movie :  आणखी एक नाटक रुपेरी पडद्यावर; 'अलबत्या गलबत्या' आता थ्रीडीमध्ये झळकणार

Marathi Movie : रत्नाकर मतकरी यांचे "अलबत्या गलबत्या" हे गाजलेलं बालनाट्य आता थ्रीडीमध्ये रुपेरी पडद्यावर येणार आहे.

Continues below advertisement

Marathi Movie :  मराठी रंगभूमीवरील काही नाटके चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर झळकली आहेत. आगामी काळातही अशाच काही नाटकांचे रुपांतर चित्रपटांमध्ये होणार आहे. त्यापैकी काही चित्रपटांची घोषणाही करण्यात आली आहे. आता, याच यादीत एका बालनाट्याचे नाव समाविष्ट होणार आहे. रत्नाकर मतकरी यांचे "अलबत्या गलबत्या" हे गाजलेलं बालनाट्य आता थ्रीडीमध्ये रुपेरी पडद्यावर येणार आहे. अभिनेता वैभव मांगले हे या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहेत. 

Continues below advertisement

रत्नाकर मतकरी यांनी कथा, कादंबरी, नाटक असे विविध साहित्यप्रकार हाताळले. त्यांची अनेक  नाटकं मराठी प्रायोगिक, व्यावसायिक रंगभूमीवर गाजली. त्याशिवाय त्यांनी बालरंगभूमीवरही अनेक यशस्वी प्रयोग केले होते. "अलबत्या गलबत्या" हे नाटकही त्यापैकीच एक आहे. या बालनाट्यानं इतिहास घ़डवला. आता "अलबत्या गलबत्या" नाटकाला रुपेरी पडद्यावर आणण्याचं शिवधनुष्य तरुण लेखक दिग्दर्शक वरूण नार्वेकर पेलणार आहे. अभिनेते वैभव मांगले हे चित्रपटात  मुख्य  भूमिका साकारणार आहेत. पुढील वर्षी 1 मे 2025 रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचं टीजर पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर लाँच करण्यात आलं. 

वरूण नावर्केर यांनी आतापर्यंत चित्रपट, वेब सीरिज केल्या आहेत. त्यात  मुरांबा, दो गुब्बारे, एक दोन तीन चार यांचा समावेश आहे. तसेच त्यानं दिग्दर्शित केलेल्या अनेक जाहिरातीही गाजल्या आहेत. आता "अलबत्या गलबत्या" या नाटकाला तंत्रज्ञानाची जोड देऊन नव्या रुपात चित्रपट माध्यमातून आणण्यात येणार आहे. त्यामुळे अत्याधुनिक व्हीएफेक्सची जोड दिली जाणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट थ्रीडी मध्ये  असल्यामुळे बच्चेकंपनीला एक वेगळाच अनुभव घेता येणार आहे."अलबत्या गलबत्या" चित्रपटाची निर्मिती एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटचे संजय छाब्रिया, उदाहरणार्थ निर्मितचे सुधीर कोलते आणि न्यूक्लिअर अॅरोचे ओंकार सुषमा माने करत आहेत. भालजी पेंढारकर चित्र हे सहयोगी निर्माते आहेत. 

'संगीत मानापमान'प्रदर्शनाच्या वाटेवर... 

संगीत मानापमान ही कलाकृती लवकरच रुपेरी पडद्यावर येणार आहे. याआधी 'कट्यार काळजात घुसली' (Katyar Kaljat Ghusali) या गाजलेल्या नाटकावरून चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती. त्यानंतर आता दुसऱ्या संगीत नाटकावरील चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटात सुबोध भावे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 1 नोव्हेंबर 2024 रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील कलाकारांबाबत आणखी फारशी माहिती समोर  आली नाही. चित्रपटाचे दिग्दर्शन सुबोध भावे करत आहे. 

इतर संबंधित बातम्या :

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola