Ileana D'Cruz : बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूझ (Ileana D'Cruz) दुसऱ्यांदा आई झाली आहे. ही आनंदाची बातमी तिने स्वतः तिच्या चाहत्यांशी इन्स्टाग्रामवरुन शेअर केली असून, त्यानंतर चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलाय.. इलियानाने (Ileana D'Cruz) आपल्या चिमुकल्या बाळाचा एक फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यासोबतच तिने बाळाचे नाव आणि जन्मतारीखही उघड केली आहे. अभिनेत्रीने (Ileana D'Cruz) ही गुड न्यूज प्रेग्नंसीच्या चर्चेनंतर काही दिवसांनी शेअर केली आहे. काही काळापूर्वी इलियाना (Ileana D'Cruz) बेबी बंपसह दिसली होती. त्यावेळी तिला दुसऱ्यांदा प्रेग्नंट असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र त्या वेळी तिने काहीही स्पष्ट केलं नव्हतं.
इलियानाने शेअर केला बाळाचा फोटो
अभिनेत्री इलियाना डिक्रूझने तिच्या इंस्टाग्रामवर काही तासांपूर्वी दुसऱ्यांदा आई झाल्याची माहिती दिली आहे. तिने आपल्या बाळाची ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केली असून, त्याचे नावही सांगितले आहे. इलियानाने आपल्या मुलाचे नाव 'KEANU RAFE DOLAN' असे ठेवले असून, त्याचा जन्म 19 जून 2025 रोजी झाला आहे. ही गोड पोस्ट शेअर करताना इलियानाने कॅप्शन दिलं आहे – “आमचं हृदय भरून आलं आहे.” यासोबत तिने डोळ्यांचा इमोजी आणि लाल रंगाचं हर्ट वालं इमोजी शेअर केलं आहे.
दुसऱ्यांदा आई होण्याचं सौभाग्य
हे सांगणं आवश्यक आहे की, इलियाना डिक्रूझला दुसऱ्यांदा आई होण्याचं सौभाग्य लाभलं आहे. याआधी, ऑगस्ट 2023 मध्ये तिने आपल्या पहिल्या मुलगा कोआ फिनिक्स डोलनचं स्वागत केलं होतं. आता जवळपास दोन वर्षांनंतर इलियाना दुसऱ्यांदा आई झाली आहे. ही आनंदाची बातमी समोर आल्यानंतर अभिनेत्री प्रियंका चोप्राने तिला शुभेच्छा दिल्या आहेत. तिने कमेंट करत लिहिलं – “मुबारक हो ब्यूटीफुल.” अभिनेता करणवीर शर्माने लिहिलं – “बधाई हो इलियाना.” असं म्हटलं आहे. तसेच चाहतेही मोठ्या संख्येने तिला शुभेच्छा देत आहेत.
इलियानाने तिच्या दुसऱ्यांदा प्रेग्नंट असल्याची माहिती ऑक्टोबर 2024 मध्ये दिली होती, म्हणजेच तिच्या पहिल्या मुलगा कोआ फिनिक्स डोलनचा पहिला वाढदिवस साजरा केल्यानंतर काही महिन्यांतच...प्रेग्नंट झाल्यानंतर इलियानाने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत गोपनीयता राखली होती. मात्र, मे महिन्यात इंस्टाग्रामवरील Ask Me Anything (AMA) सेशनमध्ये तिने पालकत्वाविषयी थोडं उघडपणे बोललं होतं.
प्रेम आणि मुलांचं संगोपन यावर मत व्यक्त करताना इलियानाने सांगितलं, की "लोकांना – आणि विशेषतः मुलांना – शिकवलं पाहिजे की क्रूर, निर्दयी, असंवेदनशील किंवा स्वार्थी असणं हे प्रेम मिळवण्यास पात्र गुणधर्म नाहीत... प्रेमही मिळवावं लागतं, अगदी सन्मान आणि आनंदासारखंच."
पुढे बोलताना इलियाना म्हणाली होती की, "मला आनंदी, निरोगी आणि प्रेमळ मुलं वाढवायची आहेत (मला खात्री आहे की प्रत्येक पालकाला असंच वाटतं) आणि मी शक्य ते सर्व करेन, जेणेकरून त्यांना नेहमीच हे जाणवेल की ते किती प्रिय आहेत."
इतर महत्त्वाच्या बातम्या