Shefali Jariwala old interview video : कांटा लगा फेम अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचं ह्रदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 42 व्या वर्षी निधन झालंय. मात्र, तिच्या मृत्यूबाबत अजूनही शंका व्यक्त करण्यात येत आहे. तिचा मृत्यू कशामुळे झालाय, याबाबतचा खुलासा तिच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधूनचं होणार आहे. मात्र, शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर तिची एक मुलाखत (Shefali Jariwala old interview video) तुफान व्हायरल झालीय. त्याबाबत तिने एक महत्त्वाची इच्छा व्यक्त केली आहे. (Shefali Jariwala old interview video)
शेफाली या व्हायरल झालेल्या मुलाखतीत (Shefali Jariwala old interview video) म्हणते की, 'माझ्या मृत्यूपर्यंत 'काटा लगा गर्ल' म्हणून ओळखलं जावं, जगात एकच 'काटा लगा गर्ल' ती मीच', शेफालीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. तिच्या मृत्यूनंतर सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
खूप कमी लोकांना माहीत आहे की शेफाली जरीवालाने अक्षय कुमारच्या सुपरहिट चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आणि सुपरस्टार पुनीत राजकुमारच्या ब्लॉकबस्टर चित्रपटातून साउथ इंडस्ट्रीत पदार्पण केले होते. शेफालीने ‘कांटा लगा’ या गाण्यामुळे लोकप्रियता मिळवली. त्यानंतर ती ‘नच बलिए’, ‘बूगी वूगी’ आणि ‘बिग बॉस 13’ यांसारख्या शोमध्येही झळकलेली पाहायला मिळाली.
शेफाली जरीवालाने 2004 साली सलमान खान आणि अक्षय कुमारच्या सुपरहिट चित्रपट ‘मुझसे शादी करोगी’मधून डेब्यू केला होता. या चित्रपटात त्यांची अक्षय कुमार आणि कादर खानसोबत एक छोटीशी भूमिका होती. अक्षय आणि शेफालीने एका गाण्यावर डान्स केला होता.
तसंच, शेफालीने पुनीत राजकुमारच्या कन्नड चित्रपट ‘हुडुगारु’ मधून कन्नड इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं. या चित्रपटाचे दिग्दर्शन के. मादेश यांनी केलं होतं. यात पुनीत राजकुमार, श्रीनगर किट्टी, योगेश आणि राधिका पंडित हे प्रमुख भूमिकांमध्ये होते.
‘हुडुगारु’ मध्ये शेफाली ‘पंकजा’ या गाण्यावर पुनीत राजकुमारसोबत डान्स करताना दिसली होती. हे गाणं ममता शर्मा, व्ही. हरिकृष्णा आणि नवीन माधव यांनी गायले होते, आणि योगराज भट यांनी याचे बोल लिहिले होते. पुनीत राजकुमार यांच्या निधनानंतर शेफालीने या गाण्याच्या दोन फोटो शेअर करत दिवंगत अभिनेत्याला श्रद्धांजली वाहिली होती.
‘हुडुगारु’ हा चित्रपट 2011 साली प्रदर्शित झाला होता. चित्रपटाची कथा तीन जवळच्या मित्रांच्या आजूबाजूला फिरते, जे नेहमी एकमेकांच्या पाठीशी उभे राहतात. तिघांचे वेगवेगळे स्वप्न असतात, पण एका मुलीच्या प्रेमात पडल्यामुळे त्यांचं आयुष्यच बदलून जातं.
शेफाली जरीवाला शेवटची 'शैतानी रस्में' या शोमध्ये दिसली होती. या शोमध्ये नकिया हाजी आणि विभव रॉय हे मुख्य भूमिकेत होते. हा शो एक भारतीय रोमँटिक हॉरर फँटेसी सिरीज होता, ज्याचा प्रीमिअर 15 जानेवारी 2024 रोजी स्टार भारत वर झाला होता. शेफालीने मोठ्या स्टार्ससोबत काम केलं, पण चित्रपटांनी मात्र तिचं नशीब बदललं नाही.
इतर महत्त्वाच्या बातम्या