Maharashtra Breaking Updates: मुंबई, ठाणे, पालघरसह तळकोकण आणि विदर्भात आज पावसाचा यलो अलर्ट
Maharashtra Breaking Updates: मुंबई, ठाणे, पालघरसह तळकोकण आणि विदर्भात आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भात कालच्या पावसामुळे शेतीपिकांचं प्रचंड नुकसान झाले आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra Breaking Updates: हिंदीच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे बंधूंचा 5 जुलैला मुंबईत एकत्र मोर्चा निघणार आहे. मनसेप्रमुख राज ठाकरेंनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांना फोन केला होता. मराठी भाषेसाठी दोन मोर्चे...More
धाराशिव जिल्हा परिषद शाळेत शिक्षक दारूच्या नशेत
धाराशिव मधील परंडा तालुक्यातील चिंचपूर बुद्रुक येथील धक्कादायक प्रकार
बीएम मोहोळकर असं शिक्षकाचे नाव यापूर्वीही नशेत शाळेत येण्याबद्दल समज दिल्याची माहिती
शिक्षक दारूच्या नशेत आल्याने मुख्याध्यापकाने आणून दिले निदर्शनास
शाळा व्यवस्थापन समितीने शिक्षकाचा नशेतला व्हिडिओ केला शूट
समज देऊनही शिक्षकाच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याने कारवाईची मागणी
सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटे यांचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षातून निलंबन
सपाटे यांच्या विरोधात विनयभंगचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांची कारवाई
सपाटे यांच्या विरोधात दाखल विनयभंगच्या गुन्ह्याचा अहवाल पक्षाकडे पाठवण्यात आला होता
वरिष्टांच्या सूचनेनुसार मनोहर सपाटे यांना पक्षातून निलंबित करत असल्याची शरद पवार गटाची माहिती
माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या विरोधात सोलापुरात एका महिलेने विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा नोंदवलाय
त्यानंतर आता पक्षाने देखील सपाटे यांच्यावर कारवाई केलीय
धाराशिव ब्रेकिंग
.......
जिल्हा परिषद शाळेत शिक्षक दारूच्या नशेत
धाराशिव मधील परंडा तालुक्यातील चिंचपूर बुद्रुक येथील धक्कादायक प्रकार
बीएम मोहोळकर असं शिक्षकाचे नाव यापूर्वीही नशेत शाळेत येण्याबद्दल समज दिल्याची माहिती
शिक्षक दारूच्या नशेत आल्याने मुख्याध्यापकाने आणून दिले निदर्शनास
शाळा व्यवस्थापन समितीने शिक्षकाचा नशेतला व्हिडिओ केला शूट
समज देऊनही शिक्षकाच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याने कारवाईची मागणी
कोल्हापूर
कोल्हापुरात ठाकरे गटामध्ये भूकंपाची चिन्ह
ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार सोमवारी आपली भूमिका स्पष्ट करणार
जिल्हाप्रमुख पदावर रविकिरण इंगवले यांची नियुक्ती झाल्यानंतर संजय पवार यांचाही नाराजीचा सूर
सोमवारी जिल्ह्यातील इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून पत्रकार परिषदेद्वारे भूमिका स्पष्ट करणार
शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांची माहिती
बुलढाणा फ्लॅश
सख्ख्या भावाने मित्रांच्या मदतीने केला भाऊ आणि वाहिनीवर जीवघेणा हल्ला.
मारहाणीचा सीसीटीव्ही आला समोर.
हतेडी बुद्रुक गावातील घटना
बुलढाणा ग्रामीण पोलिसांत तिघांवर गुन्हा दाखल.
सख्ख्या भावानेच दोन मित्राच्या मदतीने आपल्या भाऊ आणि वहिनीवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना बुलढाणा तालुक्याच्या हतेडी बुद्रुक येथे घडली आहे.. पती- पत्नी शेतात जाण्यासाठी रस्त्यावर उभे असताना अचानक आलेल्या तिघांनी मारहाण सुरू केली, ज्यामध्ये अरुण निकाळजे हे गंभीरित्या जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.. या प्रकरणी तीनही आरोपी विरोधात बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. मारहाणीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे, जुन्या वादातून ही मारहाण झाल्याच बोलल जात आहे,. अधिकचा तपास बुलढाणा ग्रामीण पोलीस करत आहेत...
सिंधुदुर्ग
कोल्हापूर येथील पर्यटकाचा काल सायंकाळी आंबोली जवळील गेळे गावातील कावळेसाद पॉईंट येथे पाय घसरून ३०० फूट खोल दरीत कोसळला होता. आज सकाळपासून शोध मोहीम घेऊन दुपारी १२ वाजता मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. सकाळ पासून कावळेसाद पॉईंट पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला होता. आता मृतदेह बाहेर काढल्यानंतर पर्यटकांना कावळेसाद पॉईंट पर्यटनासाठी सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक पुन्हा कावळेसाद पॉईंट येथे दाखल होत पर्यटनाचा आनंद लुटत आहेत.
बुलढाणा : जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील तरवाडी गावात वीस वर्षांपूर्वी शासनाच्या निधीतून एक सुंदर अशी स्मशानभूमी बांधण्यात आली. मात्र या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ताच विचारात घेतल्या गेला नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी गेल्या वीस वर्षांपासून स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्त्याची मागणी करत अनेकदा शासनाकडे पाठपुरावा केला. मात्र अद्यापही स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नाही. काल जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे या परिसरात स्मशानभूमीला जाण्यासाठी मार्ग नसल्याने संतप्त गावकऱ्यांनी गावात गणेश कुटे या वृद्धाचा निधनानंतर त्यांचा अंतिम संस्कार चक्क तलाठी कार्यालयासमोर केला. गेल्या वीस वर्षापासून स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने संतप्त नागरिकांनी अखेर गावातील तलाठी कार्यालयासमोरच हा अंत्यविधी केल्याने खळबळ उडाली आहे याबाबत नांदुरा तहसीलदार यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय.
बीड : येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक अत्याचाराप्रकरणी आंदोलकांनी पोलीस तपास यंत्रणेला आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. या प्रकरणातील दोन शिक्षक अद्याप फरार असून फरार शिक्षकांना अटक करण्याच्या मागणीसाठी पक्ष संघटना आणि पालकांनी क्लासेसच्या गेटला लावण्यात आलेल्या आरोपी शिक्षकांच्या फोटोला काळे फासून ठिय्या मांडला. दरम्यान पोलीस अधीक्षक कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. या प्रकरणातील दोन फरार शिक्षकांना अटक न केल्यास सोमवारी बीड बंदची हाक देण्यात आली. या प्रकरणातील आरोपींना राजकीय पाठबळ असल्याने ते फरार होण्यास यशस्वी झाले. आरोपींना अटक करून क्लासेसच्या इमारतीला सील ठोकावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
पुण्यात पुन्हा गाड्यांची तोडफोड
पुण्यातील सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत फोडल्या गाड्या
सिंहगड रोड परिसरात 3 ठिकाणी 17 गाड्यांची तोडफोड
आज पहाटे अज्ञातंकडून करण्यात आली गाड्यांची तोडफोड
दारूच्या नशेत अज्ञात डोळक्याने तोडफोड केल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती
पुण्यात सिंहगड रोड परिसरात अज्ञात टोळक्याकडून हैदोस
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अज्ञात टोळक्याचा शोध सुरू
मुंबई : राज्यात बंदी असली तर मुंबईत मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री होत असलेल्या गुटख्यावर आता क्राइम ब्रँचने कारवाईचा बडगा उगारला आहे. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँच युनिट सहाचे पोलीस निरीक्षक भरत घोणे यांच्या नेतृत्त्वात पोलिसांनी काल गोवंडी बैगनवाडी येथे एक गुटखा माफियाचा पाठलाग केला. पाठलाग करून त्याच्या गोदामाचा शोध घेतला आणि तिथे छापा टाकून तब्बल 18 लाख रुपयांच्या 184 गोण्या भरून गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अब्दुल हलीम अब्दुल समद खान आणि मोहम्मद तन्वीर इमाम उल्ला खान या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात यांनी मुंबईत गुटखा कसा आणि कुठून आणला? या मागे एखादी टोळी आहे का ? याचा तपास क्राईम ब्रांच करीत आहेत.
मुंबई : हिंदी सक्ती विरोधात पाच जुलै रोजी होणाऱ्या मोर्चात सहभागी होण्यासाठी मनसेकडून सामान्य मुंबईकरांना हाक दिली जाणार आहे. मनसेकडून मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनमध्ये जाऊन मुंबईकरांना साद घातली जाणार आहे. लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी देखील मोर्चात सहभागी होण्यासाठी मनसेकडून थेट नागरिकांसोबत चर्चा केली जाणार आहे. मनसे नेते संदीप देशपांडे आणि मनसे कार्यकर्ते मुंबईच्या दादर रेल्वे स्थानकात 12 वाजता जाऊन नागरिकांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करणार आहेत.
उत्सुकता संपली; भाजपला मिळणार नवा प्रदेशाध्यक्ष!
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रविंद्र चव्हाण यांची नियुक्ती होणार
रविंद्र चव्हाण प्रदेशाध्यक्षपदासाठी ३० जूनला अर्ज भरणार
१ जुलैला नियुक्ती जाहीर केली जाणार
वरळी डोम येथे १ जुलैला सकाळी ११ वाजता अधिकृत घोषणा होणार
भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी राहणार उपस्थित
राज्यात बंदी असली तर मुंबई मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री होत असलेल्या गुटख्यावर आता क्राइम ब्रँचचे कारवाईचा बडगा सुरू केला आहे. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँच युनिट सहाचे पोलीस निरीक्षक भरत घोणे यांच्या नेतृत्त्वात पोलिसांनी काल गोवंडी बैगनवाडी येथे एक गुटखा माफियाचा पाठलाग केला. पाठलाग करून त्याच्या गोदामाचा शोध घेतला. आणि तिथे छापा टाकून तब्बल १८ लाख रुपयांचा १८४ गोण्या भरून गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अब्दुल हलीम अब्दुल समद खान आणि मोहम्मद तन्वीर इमाम उल्ला खान या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात यांनी मुंबईत गुटखा कसा आणि कुठून आणला? या मागे एखादी टोळी आहे का ? याचा तपास क्राईम ब्रांच करीत आहे.
आंबोली जवळील गेळे गावातील कावळेसाद पॉईंट येथे ३०० ते ४०० फूट खोल दरीत कोल्हापूर येथील पर्यटक काल सायंकाळी कोसळला. दाट धुके असल्याने काल शोध मोहीमेत अडचणी येत होत्या. आज सकाळ पासून शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. सह्याद्री अडव्हेंचर अँड रेस्क्यू टीम आंबोली, सांगली यांच्याकडून आणि पोलिसांच्या माध्यमातून शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. आंबोलीत वर्षा पर्यटनासाठी आलेल्या कोल्हापूर येथील पर्यटकाचा पाय घसरून तो ३०० ते ४०० फूट खोल कावळेसाद दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राजेंद्र बाळासो सनगर हा ४५ वर्षीय चिले कॉलनी, कोल्हापूर येथील पर्यटकाचे आहे. ते कोल्हापूर जिल्हा परिषदेचे कर्मचारी आहेत. कोल्हापूर येथील सनगर हे त्यांच्या १४ सहकाऱ्यांच्या टीमसोबत आंबोली येथे वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आले होते. कावळेसाद पॉईंट येथे रेलिंग जवळून असताना पाय घसरला आणि ते दरीत कोसळले. आंबोली रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. मात्र, रात्रीचा काळोख आणि दाट धुक्यामुळे बचावकार्यात मोठ्या अडचणी येत आहेत.
संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण इंदापूर तालुक्यातील बेलवाडी या ठिकाणी पार पडलं. हा नेत्र दीपक सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ बेलवाडी येथे आले होते. सुरुवातीला पताकाधारी धावले, त्यानंतर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला आणि त्यानंतर विणेकरी आणि सगळ्यात शेवटी रिंगणात अश्व धावले.. रिंगण झाल्यावर ही माती कपाळी ग्रामस्थांनी कपाळी लावली.
कराड शहरातील कोल्हापूर नाका परिसरात रात्री 11 वाजता मद्यधुंद युवकांच्या टोळक्यांने महामार्गावर दादागिरी करत मालट्रक अडवून ट्रकचालकाला शिवीगाळ करत दगडफेक केली. यामध्ये ट्रकच्या काचा फुटल्या तसेच पुणे- मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांच्यात भिंतीचे वातावरण असल्याचे पाहायला मिळाले. यावेळी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एकही पोलीस नसल्याचे पाहायला मिळाले.
विधानसभा निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांना नागरिकांनी प्रचंड मतांनी निवडून दिलं. निवडणुकीदरम्यान एकनाथ शिंदे यांनी केलेल्या आवाहनाला मतदारांनी प्रचंड प्रतिसाद दिल्यानं मतदारांचं आभार मानण्याकरिता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज भंडाऱ्यात येत आहेत. मात्र, हवामान विभागानं आज भंडाऱ्यात येलो अलर्ट जाहीर केला असल्यानं या दौऱ्यावर पावसाचं सावट आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता ९२ पोलीस अधिकारी आणि ५६८ पोलीस कर्मचाऱ्यांचा तगडा बंदोबस्त भंडाऱ्यात सभास्थळी आणि ठिकठिकाणी तैनात करण्यात आला आहे.
धुळे ग्रामीणचे माजी आमदार आणि काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांचा भाजप प्रवेश लवकरच होणार असून कुणाल पाटील यांनी काल राज्याचे मंत्री जयकुमार रावल यांची देखील भेट घेतली आहे. भाजप प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर आज कुणाल पाटील यांचा कार्यकर्ता मेळावा पार पडणार आहे... या मेळाव्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली असून या पोस्टवर फक्त माजी मंत्री रोहिदास पाटील यांचा फोटो ठेवण्यात आला आहे... या पोस्टवरील फोटो मधून काँग्रेसच्या प्रमुखांचे फोटो गायब झाले आहे... दरम्यान आजच्या कार्यकर्ता मेळाव्यात कुणाल पाटील काय बोलतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे....
मुंबईत अंमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी आलेल्या २ इंडोनेशियन नागरिकांना ओशिवरा पोलिसांनी केली अटक
या दोन इंडोनेशियन नागरिकांकडून पोलिसांनी तब्बल २१ कोटी ५५ लाख २० हजार रुपये किंमतीचा २० किलो गांजा जप्त केला आहे
बुडी वियानो ४०, रहमत अर्डी हियादत ३९ अशी या दोघांची नावे आहेत
मागील अनेक दिवसांपासून हे दोघं हा गांजा घेऊन हाॅटेलमध्ये वास्तव्यास होते. याची माहिती ओशिवरा पोलिसांना मिळली
पोलिसांच्या पथकाने छापेमारी करत या दोघांसह कोट्यावधी रुपयांचा गांजा त्यांच्या खोलीतून जप्त केला आहे
या दोघांनी मोठ्या प्रमाणात गांजा यापूर्वी विक्री केला असून तो नेमका कोणाला केला, किंवा या तस्करीत अन्य कोणी सहभागी आहे त्याचा ओशिवरा पोलिस शोध घेत आहेत
डिजिटल अरेस्टची भीती दाखवून कोल्हापुरात आठ कोटींची फसवणूक
रिलायन्स इंडस्ट्रीजमधून निवृत्त दत्तात्रय पाडेकर यांची केली फसवणूक
फसवणूक करणाऱ्या टोळीने वरिष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाचा केला गैरवापर
ईडीच्या कार्यालयातून बोलत असल्याची सांगून पैसे ट्रान्सफर करण्यास पाडले भाग
पाडेकर यांनी शेअर्स विकून फसवणूक करणाऱ्यांच्या 14 खात्यांवर केले पैसे ट्रान्सफर
जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
धाराशिवमधील वाशी तालुक्यातील पवनचक्कीची कामे पाच दिवसांसाठी थांबवण्यात आलेत. तांदुळवाडी येथील शेतकरी पवनचक्कीच्या कारभाराविरोधात आक्रमक झालेत. गेल्या तीन दिवसांपासून शेतकऱ्यांचं पावनचक्कीकडून लूट होत असल्याचा आरोप करत अमरन उपोषण सुरू आहे. त्यांच्या उपोषणानंतर महिलाही आक्रमक झाल्या असून त्यांनी तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन केलं. त्यानंतर तालुक्यातील कामांना पाच दिवसांसाठी स्थगिती देण्यात आली आहे.
परभणी जिल्ह्यातील शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांची आज अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक परभणीच्या पोखरणी नरसिंह येथे आयोजित करण्यात आली आहे या बैठकीमध्ये बाधित पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे सकाळी ११ वाजता ही बैठक होणार आहे.या बैठकीला जिल्ह्यातील बाधित ३१ गावातील प्रत्येकी २ शेतकरी उपस्थित राहणार आहेत परभणी जिल्ह्यात १ जुलै पासुन प्रत्यक्ष मोजणीला सुरुवात होणार आहे त्या अनुषंगाने या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.
आषाढी वारी निमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही शेगाव येथून श्री गजानन महाराज यांची पालखी दिंडी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली असून, २ जून रोजी निघालेल्या या पवित्र दिंडीचे श्री क्षेत्र तुळजापूर येथे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी मंदिर संस्थानच्या वतीने दिंडीतील सर्व वारकऱ्यांसाठी एक वेळच्या जेवणाचा शिधा प्रदान करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा यंदाही भक्तिभावाने जपली गेली.
विठुनामाच्या गजराने आणि तुळजाभवानी देवींचा उदघोष करत आलेल्या दिंडीमुळे संपूर्ण तुळजाभवानी मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन गेला होता.
'आम्ही फॅशन शो मध्ये वापरलेली चप्पल कोल्हापूरचीच'
प्राडा ब्रँडने मान्य केल्याचं महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांचा दावा
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने केला होता प्राडाशी पत्रव्यवहार
पुढील चर्चेसाठी देखील तयार असल्याचं प्राडा केलं मान्य- ललित गांधी
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या पत्राला प्राडा कडून सकारात्मक प्रतिसाद
गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत पाऊस सक्रिय झाला आहे. शहर, तसेच उपनगरांत शुक्रवारी सकाळपासून हलक्या सरी बरसल्या. मुसळधार नसला तरी पावसाची रिपरिप सुरू होती. दरम्यान, मुंबईसह ठाणे आणि पालघर भागात शनिवारपासून पुढचे दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. याचबरोबर राज्यातील इतर काही भागांतही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
बारामतीच्या काटेवाडीतील गोल रिंगणानंतर तुकोबांची पालखी सणसरमध्ये मुक्कामी तर, पहिल्या उभ्या रिंगणानंतर ज्ञानोबांच्या पालखीचा साताऱ्यातील तरडगावात विसावा
मुंबई, ठाणे, पालघरसह तळकोकण आणि विदर्भात आज पावसाचा यलो अलर्ट जारी...विदर्भात कालच्या पावसामुळे शेतीपिकांचं प्रचंड नुकसान...
'हिंदीसक्ती'विरोधातील मोर्चाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा...मात्र पक्षाकडून शरद पवार की प्रतिनिधी सहभागी होणार याची उत्सुकता...
एकत्र मोर्चाच्या निर्णयानंतर संदीप देशपांडे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वरुण सरदेसाईंची चर्चा...तर आदित्य ठाकरे आणि देशपांडेंचीही भेट...दोन्ही पक्षाकडून मोर्चाच्या नियोजनाची तयारी सुरू...
हिंदीच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे बंधूंचा ५ जुलैला एकत्र मोर्चा...राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, मराठी भाषेसाठी दोन मोर्चे निघणं योग्य दिसत नसल्याचं मांडलं मत...उद्धव ठाकरेंचीही तयारी...
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- Maharashtra Breaking Updates: मुंबई, ठाणे, पालघरसह तळकोकण आणि विदर्भात आज पावसाचा यलो अलर्ट