Shefiwala Jariwala death case : कांटा लगा फेम अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचं वयाच्या 42 व्या वर्षी निधन झालंय. मात्र, तिच्या मृत्यूबाबत अजूनही मोठा सस्पेन्स कायम आहे. शेफाली जरीवाला गेल्या 5 ते 6 वर्षांपासून तरुण दिसण्यासाठी ट्रीटमेंट घेत होती. अँटी एजिंगचा अर्थ असतो की, तरुण दिसण्यासाठी घेतले जाणारे उपचार... शेफाली दोन औषधं घेत होती. ज्यामध्ये व्हिटामिन सी आणि Glutathione नावाच्या औषधांचा समावेश होता, असं शेफालीवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं आहे.
मात्र, शेफाली जरीवाला घेत असलेल्या औषधांचा ह्रदयविकाराच्या झटक्याशी कोणताही संबंध नाही. शेफाली जे औषधं घेत होती. ते सुंदर दिसण्यासाठी घेतली जातात. त्याचा परिणाम केवळ त्वचेवर पाहायला मिळतो. डॉक्टरांच्या माहितीनुसार, शेफाली फिट होती. तिने कधीही कोणत्या आजाराविषयी माहिती दिली नाही. त्यामुळे तिचा मृत्यू नेमका कसा झाला? याबाबत अजूनही संशय व्यक्त केला जात आहे.
शेफाली जरीवालाचा जन्म 15 डिसेंबर 1982 रोजी मुंबईत झाला होता. अभिनेत्रीने सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॉलेजमधून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं होतं. 'कांटा लगा' गर्लने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या सलमान खानच्या 'मुझसे शादी करोगी' या चित्रपटातून केली होती. त्यानंतर ती अनेक चित्रपटांमध्ये झळकलेली पाहायला मिळाली..
शेफालीने दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही काम केलं आहे. त्या के. मदेश यांच्या कन्नड चित्रपट 'हुडुगारू' मध्येही ती दिसल होती. या चित्रपटात पुनीत राजकुमार, श्रीनगर किट्टी, योगेश आणि राधिका पंडित यांसारखे कलाकार होते. शेफाली जरीवाला म्युझिक व्हिडिओ ‘कांटा लगा’मुळे एका रात्रीत स्टार बनली होती. या गाण्यातील तिच्या स्टेप्समुळे प्रेक्षक तिचे चाहते झाले होते. 'कांटा लगा' गर्ल अनेक टीव्ही रिअॅलिटी शोजचाही भाग राहिली आहे. तिने ‘बिग बॉस 13’ मधून खूपच प्रसिद्धी मिळवली होती. ती 'नच बलिए 5' आणि 'नच बलिए 7' मध्येही दिसली होती. याशिवाय तिने 'बूगी वूगी' या शोमध्येही भाग घेतला होता. शेफाली दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लासोबतच्या नात्यामुळेही खूप चर्चेत राहिल्या होत्या. ती अनेक वर्षे त्याच्यासोबत होती. 2004 मध्ये शेफालीने गायक हरमीत सिंगसोबत लग्न केलं होतं. मात्र 2009 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटाच्या 6 वर्षांनंतर शेफालीने अभिनेता पराग त्यागीशी दुसरं लग्न केलं आणि त्यांच्यासोबत त्या आनंदी वैवाहिक आयुष्य जगत होत्या.
इतर महत्त्वाच्या बातम्या