Shefali Jariwala Passed Away: आधी सिद्धार्थ शुक्ला आता काटा लगा गर्ल..मृत्यूनंतर शेफाली जरीवालाची शेवटची पोस्ट व्हायरल, चाहत्यांचा धक्का

कांटा लगा गर्ल आणि बिग बॉस 13 मधील स्पर्धक शेफाली जरीवाला (42) हिचं निधन (Shefali Jariwala Death) झालं आहे. हृदयविकाराच्या झटक्यानं शेफालीचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.

Shefali Jariwala Passed Away

1/9
मनोरंजनसृष्टीत कलाकारांच्या अकाली एक्झिटची बातमी ही प्रचंड शॉकिंग असते. शुक्रवारची रात्र ही अशीच काहीशी होती.
2/9
वयाच्या 42 व्या वर्षी 'काटा लगा गर्ल' शेफाली जरीवालाच्या मृत्यूच्या बातमीनं चाहत्यांना मोठा धक्का बसला.
3/9
अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर तिची शेवटची इंस्टाग्रॅम पोस्ट सध्या व्हायरल होतेय.
4/9
मृत्यूच्या तीन दिवस आधी पोस्ट केलेल्या शेफाली जरीवालाच्या पोस्टमध्ये तिने तिचे फोटो शेअर केले होते.
5/9
ज्यात तिने सिव्हर कलरचा जंपसूट घातलेला दिसत आहे. ती डीप नेक लाँग स्लीव्ह ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत होती.
6/9
अनेक चाहते तिच्या शेवटच्या पोस्टमध्ये दुःख व्यक्त करून तिला श्रद्धांजली वाहत आहेत.शेफालीच्या मृत्यूबाबत अनेकांनी या पोस्टवर कमेंट केल्या आहेत.
7/9
एका चाहत्यानं.. विश्वास बसत नाहीये. आधी सिद्धार्थ शुक्ला आणि आता शेफाली जी.' असं लिहिलंय. दुसऱ्या युझरने लिहिलंय, 'विश्वास बसत नाहीये. ही एक शॉकिंग घटना आहे.'
8/9
अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. शेफालीचा पती पराग त्यागी यांने मुंबईतील बेलेव्ह्यू हॉस्पिटलमध्ये तिला नेले होते. तिथे उपचारादरम्यान डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
9/9
बिगबॉस 13 मधून शेफाली जरीवालाला चांगली प्रसिध्दी मिळाली.त्यांनतर अनेक चित्रपटांमध्येही शेफाली दिसली. काटा लगा..या हिट रिमिक्समुळेही शेफालीचा स्टारडम सुरु झाला.
Sponsored Links by Taboola