'बाबा खूप मोठ्या कर्जात आहेत ' मतदानकेंद्राबाहेर अक्षय कुमार येताच मुलगी घाईने समोर गेली; अक्षयच्या कृतीनं वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष ; video व्हायरल
फक्त संवाद साधून नाही, तर प्रत्यक्ष मतदान करूनच आपण मुंबईचा खरा हिरो बनू शकतो. त्यामुळे सर्वांनी मोठ्या संख्येने मतदान करावं.” असंही तो म्हणाला

Akshay Kumar Viral Video: देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) निवडणुकीसाठी आज, गुरुवारी मुंबईत मतदान होत आहे. सकाळपासूनच अनेक मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी पाहायला मिळाली. सर्वसामान्य नागरिकांसोबतच अनेक सेलिब्रिटीही आपला मतदानाचा हक्क बजावताना दिसले. अभिनेता अक्षय कुमार, नाना पाटेकर, तमन्ना भाटिया यांसारख्या कलाकारांनी मतदान केंद्रावर हजेरी लावली.दरम्यान, मतदानासाठी आलेल्या अक्षय कुमारसोबत (Akshay Kumar) घडलेला एक प्रसंग सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतो आहे.
'बाबा खूप मोठ्या कर्जात आहेत...
अक्षय कुमार आज सकाळी मुंबईतील गांधी शिक्षण भवन येथे असलेल्या मतदान केंद्रावर मतदानासाठी पोहोचला होता. मतदानानंतर बाहेर पडत असतानाच एक तरुणी त्याच्याजवळ आली. हातात एक कागद धरून तिने अक्षय कुमारकडे मदतीची विनंती केली. 'बाबा खूप मोठ्या कर्जात आहेत ' असं तिनं अभिनेता अक्षय कुमारला सांगितलं.
अक्षय कुमारने घाई न करता थांबून तिचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं. सुरक्षारक्षकांनी त्या मुलीला दूर करण्याचा प्रयत्न केला, मात्र अक्षय कुमारने त्यांना थांबवलं. त्यानंतर अक्षय कुमारने त्या मुलीला, “तुझा फोन नंबर दे, ऑफिसमध्ये ये,” असं सांगितलं.या संवादानंतर ती मुलगी भावूक होऊन अक्षय कुमारच्या पाया पडण्याचा प्रयत्न करत होती. मात्र अक्षय कुमारने तिला लगेच रोखत तसे करू नकोस, असे सांगितले. हा संपूर्ण प्रसंग कुणीतरी मोबाईलमध्ये टिपला असून तो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून अक्षय कुमारचं कौतुक केलं जात आहे. अनेक युजर्सनी “मुलीची मदत केल्याबद्दल मनापासून धन्यवाद”, “अक्षय कुमार खऱ्या अर्थाने मोठ्या मनाचा माणूस आहे” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी तर “देवाने मदत करण्याची क्षमता दिली असेल तर ती वापरली पाहिजे” असेही म्हटले आहे.
दरम्यान, मतदानानंतर अक्षय कुमारने मुंबईकरांना मतदानाचे महत्त्व पटवून देत खास आवाहन केलं. तो म्हणाला, “आज बीएमसी निवडणुकीसाठी मतदान होत आहे. मुंबईकर म्हणून आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आज आपल्या हातात रिमोट कंट्रोल आहे. फक्त संवाद साधून नाही, तर प्रत्यक्ष मतदान करूनच आपण मुंबईचा खरा हिरो बनू शकतो. त्यामुळे सर्वांनी मोठ्या संख्येने मतदान करावं.” असंही तो म्हणाला.























