एक्स्प्लोर

अक्षय कुमारला दिलासा! महर्षी वाल्मिकींच्या वेशातल्या डीपफेक व्हिडीओवर मुंबई हायकोर्टाचा महत्वाचा निर्देश

Akshay Kumar: या खोट्या व्हिडीओनंतर अक्षयने तीव्र संताप व्यक्त करत थेट न्यायालयाचे दरवाजे ठोठावले.

Akshay Kumar Deepfake Video: सोशल मीडिया आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वाढत्या वापरामुळे आज कोणाचाही फोटो किंवा व्हिडीओ सहज एडिट करता येतो. पण या तंत्रज्ञानाचा गैरवापरही वाढला आहे आणि सर्वाधिक फटका बसतो तो सेलिब्रिटींना. काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारचा (Akshay Kumar) एक डीपफेक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता, ज्यात तो महर्षी वाल्मिकींच्या वेशात दिसत होता. या खोट्या व्हिडीओनंतर अक्षयने तीव्र संताप व्यक्त करत थेट न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. आपल्या व्यक्तिमत्व अधिकारांचे संरक्षण व्हावे यासाठी त्याने न्यायालयात याचिका दाखल केली होती.

हायकोर्टाचा अक्षय कुमारला दिलासा 

या प्रकरणी आता मुंबई उच्च न्यायालयाने अक्षय कुमारला मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने त्याच्या प्रतिमेचा व व्यक्तिमत्व हक्कांचा भंग करणारे डीपफेक व्हिडीओ आणि एआय कंटेंट तत्काळ काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. तसेच अशा सामग्रीचा प्रसार करणाऱ्या अज्ञात व्यक्ती आणि काही ई-कॉमर्स साइट्सविरुद्धही कारवाईचे निर्देश दिले आहेत.

न्यायाधीशांनी या निर्णयात नमूद केले की, “अशा प्रकारचा एआय-आधारित कंटेंट फक्त एका अभिनेत्याच्या नव्हे तर समाजाच्या सुरक्षेसाठीही धोकादायक ठरू शकतो. डीपफेक इतका वास्तवदर्शी असतो की खरे आणि बनावट व्हिडीओ ओळखणे जवळपास अशक्य बनते. यामुळे व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबीयांवरही गंभीर परिणाम होऊ शकतात.”

'तो व्हिडीओ पूर्णपणे खोटा...'

अक्षय कुमारने याआधीच आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून आपली भूमिका स्पष्ट केली होती. “माझा एआयच्या मदतीने तयार केलेला व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात मला महर्षी वाल्मिकी म्हणून दाखवलं आहे. परंतु हा व्हिडीओ पूर्णपणे खोटा आहे. माध्यमांनीही त्यावरून बातम्या केल्या, जे चुकीचं आहे. कृपया अशा गोष्टींवर विश्वास ठेवण्याआधी त्याची सत्यता तपासा,” असं त्याने स्पष्ट केलं होतं.अक्षयसारखेच अनेक कलाकारही आता आपल्या प्रतिमेच्या सुरक्षेसाठी पुढे सरसावत आहेत. ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन आणि हृतिक रोशन यांनीही अशाच प्रकारच्या डीपफेक आणि फोटो मॉर्फिंगविरोधात न्यायालयाची मदत घेतली आहे. 

मुंबई उच्च न्यायालयाने युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम, एक्स आणि इतर सोशल मीडिया कंपन्यांना हा व्हिडिओ काढून टाकण्याचे आदेश दिले. असे व्हिडिओ पुन्हा अपलोड होऊ नयेत यासाठी कडक देखरेख यंत्रणांनाही न्यायालयाने आदेश दिले.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Karmala : करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
Dhule: हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू
हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Pune गुन्हेगारीवर आळा कधी? वाहतूक कोंडी कधी सुटणार?;पालिका निवडणूक चुरशीची
Mahapalikecha Mahasangram Jalna जालन्यात व्यापाऱ्यांच्या पक्षांकडून अपेक्षा काय? कोण मारणार बाजी?
Mahapalikecha Mahasangram Mira Bhayandar : कोण मारणार मिरा-भाईंदरमध्ये बाजी? स्थानिकांना काय वाटतं?
Mahapalikecha Mahasangram Solapur : सोलापूर महापालिकेतील राजकीय गणित बदलणार? कोण बाजी मारणार?
Mahapalikecha Mahasangram Vasai Virar पालिकेत कोणाची बाजी? अनधिकृत बांधकामामुळे पालिका चर्चेत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karmala : करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
Dhule: हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू
हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
लोकांनी राहुल गांधींना गटांगळ्या खायला लावल्या;राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका,शरद पवारांनाही टोला
लोकांनी राहुल गांधींना गटांगळ्या खायला लावल्या;राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका,शरद पवारांनाही टोला
मुंबईत इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी
मुंबईत इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी
Bihar Election Result 2025: नितीश कुमार सरकारवर 62 हजार कोटींच्या घोटाळ्यांचा आरोप केला अन् निकाल लागताच भाजपकडून माजी केंद्रीय मंत्र्याची हकालपट्टी
नितीश कुमार सरकारवर 62 हजार कोटींच्या घोटाळ्यांचा आरोप केला अन् निकाल लागताच भाजपकडून माजी केंद्रीय मंत्र्याची हकालपट्टी
PM नरेंद्र मोदी चंद्रावरही शिवशक्ती कॉलनी उघडणार; भाजपच्याच मंत्र्यांचा दावा, आदित्य ठाकरेंना टोला 
PM नरेंद्र मोदी चंद्रावरही शिवशक्ती कॉलनी उघडणार; भाजपच्याच मंत्र्यांचा दावा, आदित्य ठाकरेंना टोला 
Embed widget