Akshay Kelkar : फाइनली सांगतोय मी… दहा वर्षांचा प्रवास..., अक्षय केळकरने अखेर 'त्या' खास व्यक्तीविषयी केला खुलासा
Akshay Kelkar : अभिनेता अक्षय केळकरने त्याच्या गर्लफ्रेंडसोबतचा एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Akshay Kelkar : कलर्स मराठी (Colors Marathi) वाहिनीवरील अबीर गुलाल या मालिकेतून अभिनेता अक्षय केळकर (Akshay Kelkar) नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. अक्षय हा बिग बॉस मराठीमुळेही बराच चर्चेत राहिला होता. पण सध्या तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आलाय. अक्षयने नुकतच त्याची गर्लफ्रेंड रमासोबतचे एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यावर अनेक कलाकारांनी कमेंट्स केल्याचं पाहायला मिळतंय.
अक्षय आणि त्याच्या गर्लफ्रेंडच्या नात्याला दहा वर्ष पूर्ण होत आहेत. त्याचनिमित्ताने अक्षयने हा व्हिडीओ शेअर केला आहे. अनेक मुलाखतींदरम्यान अक्षयने त्याच्या गर्लफ्रेंडविषयी भाष्य केलं होतं. पण आता त्याने तिच्यासोबतचा व्हिडीओ शेअर करुन चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. या व्हिडीओवर अक्षयने दिलेल्या कॅप्शननेही साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय.
अक्षयने शेअर केला खास व्हिडीओ
अक्षय आणि त्याची गर्लफ्रेंड रमा हिच्या नात्याला 23 डिसेंबर रोजी 10 वर्ष पूर्ण होत आहेत. त्याच्या आधी एक दिवस अक्षयने हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यावर अक्षयने म्हटलं की, तर ही माझी रमा…आम्हाला 10 वर्ष पूर्ण होतायत … म्हंटल एक दिवस आधीच सांगाव .. म्हणून … बापरे, फाइनली सांगतोय मी … पण काहीही झाल तरी i love you मी फक्त तुमचाच आहे आणि आता आम्हीही... अक्षयच्या या व्हिडीओवर गायत्री दातार, समृद्धी केळकर, प्रथमेश परब या कलाकारांनी कमेंट्स केल्या आहे.
अक्षयने शेअर केलेल्या या व्हिडीओवर तो आणि रमा टेरेसवर सांजवेळी निवांत गप्पा मारताना दिसत आहेत. तसेच अक्षय तिच्यासाठी मोगऱ्याची फुलंही घेऊन येतो. एक रोमँटीक गाणंही लावलं आहे. अक्षय केळकर 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वाचा विजेता ठरला होता. त्यानंतर त्याने 'ढोलकीच्या तालावर' हा लोकप्रिय कार्यक्रम होस्ट केला. हिंदी मालिकांमध्येही अक्षयने काम केलं आहे.
View this post on Instagram
ही बातमी वाचा :
Allu Arjun : अल्लू अर्जुनच्या घरावर दगडफेक, JACच्या नेत्यांवर आरोप; पोलिसांची कारवाई