एक्स्प्लोर

Ajay Purkar : अभिनेते अजय पुरकर याचं निर्मिती क्षेत्रात पदार्पण; जमदग्नीवत्स प्रॉडक्शन्सची केली स्थापना

अभिनेते अजय पूरकर (Ajay Purkar) हे निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहेत.

Ajay Purkar : गेली 15 वर्षे नाटक, चित्रपट आणि दूरदर्शन मालिका या माध्यमांतून घरोघरी पोचलेल्या आणि चोखंदळ रसिकांनी वाखाणलेल्या दर्जेदार मराठी अभिनेत्यांमधील एक आघाडीचे नाव म्हणजे अजय पूरकर (Ajay Purkar) . अभिनय आणि गायन या दोन्ही क्षेत्रात उत्तम गती असलेल्या अजय पूरकर यांचे नाव अनेक गाजलेल्या कलाकृतींशी जोडले गेलेले आहे. असंभव, अस्मिता, तू तिथे मी, मुलगी झाली हो अशा अनेक मालिका, कोडमंत्र, नांदी यांसारखी उत्कृष्ट आणि वेगळ्या विषयांवरची नाटके आणि बालगंधर्व, फर्जंद, फत्तेशिकस्त, मुळशी पॅटर्न, पावनखिंड यांसारखे भव्य चित्रपट त्यांच्या अभिनयक्षमतेची साक्ष देतात. या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘पावनखिंड’ या ऐतिहासिक चित्रपटाने 50 कोटी रूपयांचा व्यवसाय करून मराठी प्रेक्षकांना परत एकदा चित्रपटांची गोडी लावली, की ज्यात ‘बाजीप्रभू देशपांडे’ या मध्यवर्ती भूमिकेत अजय पूरकर होते.

इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर, अजय पूरकर यांनी निर्मिती क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला असून, त्यांनी नुकतीच ‘जमदग्नीवत्स प्रॉडक्शन्स’ ही निर्मितीसंस्था स्थापन केली आहे. या संस्थेद्वारा नाटक, चित्रपट, दूरदर्शन मालिका यांची निर्मिती करण्यात येणार आहे. तसेच विविध ओटीटी प्लॅटफॉर्मसाठीसुद्धा चित्रपट आणि मालिका यांची निर्मिती होणार आहे. आपले मराठी चित्रपट आशय आणि निर्मितीमूल्य या बाबतीत दाक्षिणात्य चित्रपटांपेक्षा कमी पडतात, अशी तक्रार बर्‍याचदा प्रेक्षक करत असतात. आपल्या मातीतील तरूण प्रतिभावान लेखक, दिग्दर्शक आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तंत्रज्ञ शोधून उच्च दर्जाचे मराठी चित्रपट तयार करणे, हा ‘जमदग्नीवत्स प्रॉडक्शन्स’चा प्रमुख हेतू आहे. या क्षेत्रात नव्याने येऊ इच्छिणार्‍या लेखकांनीही एसडब्ल्यूएमध्ये रजिस्टर्ड केलेल्या आपापल्या संहिता, या संस्थेकडे घेऊ जाव्यात, असे आवाहन पूरकर यांनी केले आहे.   

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ajay Purkar (@ajay.purkar)

संस्थेतर्फे फक्त मराठी, हिंदी याच भाषांमधून निर्मिती न करता, इतर प्रमुख भारतीय भाषांमधूनही निर्मिती केली जाणार आहे. स्वतः कलाकार जेव्हा निर्माता होतो, तेव्हा निर्मितीमूल्य आणि सर्जनप्रक्रिया या दोन्ही गोष्टींमध्ये होणारे अनावश्यक बदल आणि कलाकृतीची अधोगामी वाटचाल यांना आपोआपच पायबंद बसतो, हे आपल्याला ज्ञात आहेच.

जमदग्नी ऋषी हे मूळपुरुष असल्याने, त्यांच्या नित्यस्मरणासाठी, त्यांचे आशीर्वाद नित्यनेमाने मिळण्यासाठीच ‘जमदग्नीवत्स प्रॉडक्शन्स’ असे आपल्या संस्थेचे नामकरण करणार्‍या, स्वाभिमानी हिंदू असलेल्या, परंपराप्रिय, कलासक्त अजय पूरकर यांच्याकडून या वर्षाखेरीस एका अभूतपूर्व आणि भव्य निर्मितीची घोषणा होणार आहे.

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

'मराठी बिग बॉस' गाजवल्यानंतर विशाल निकम नव्या अवतारात दिसणार, अल्बम ‘तू संग मेरे’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार!

महत्त्वाच्या बातम्या

Aavarapan 2 Box Office collection: 19 वर्षांनंतर इमरान हाश्मीच्या सिनेमानं केला जुन्या अपयशाचा हिशोब चुकता; 'आवारापन 2' चा बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकुळ, आतापर्यंत किती कमावले?
19 वर्षांनंतर इमरान हाश्मीच्या सिनेमानं केला जुन्या अपयशाचा हिशोब चुकता; 'आवारापन 2' चा बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकुळ, आतापर्यंत किती कमावले?
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
Mahesh Kothare on Inspector Jadhav: कोठारे आडनाव असताना इन्स्पेक्टर महेश जाधव नाव का वापरलं? महेश कोठारे यांनी सांगितला रंजक किस्सा, म्हणाले...
कोठारे आडनाव असताना इन्स्पेक्टर महेश जाधव नाव का वापरलं? महेश कोठारे यांनी सांगितला रंजक किस्सा, म्हणाले...
Ashok Saraf On Sachin Pilgaonkar: 'त्याला पाहिजे ते मी करतो..' सचिन पिळगावकर यांच्याविषयी बोलताना अशोक सराफ म्हणाले,' तेव्हापासून सुपरस्टार म्हणायला सुरुवात झाली..'
'त्याला पाहिजे ते मी करतो..' सचिन पिळगावकर यांच्याविषयी बोलताना अशोक सराफ म्हणाले,' तेव्हापासून सुपरस्टार म्हणायला सुरुवात झाली..'

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Sajjan Kumar: काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
Nashik Crime News: मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
15 ते 20 कोटींचा पाऊस पाडण्याचं आमिष, अल्पवयीन मुलीचा वापर; तेलंगणातील भोंदूबाबाला लातूरमधून अटक
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
Embed widget