Adah Sharma : बाबा सिद्दीकींच्या इफ्तार पार्टीतील हजेरीमुळे अदा शर्मा ट्रोल; अभिनेत्रीनेही दिलं चोख उत्तर, 'दहशतवादी हे शत्रू असतात...'
Adah Sharma : बॉलीवूड अभिनेत्री अदा शर्मा ही नुकतीच बस्तर या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. पण तिला या सिनेमावरुन बरच ट्रोल करण्यात आलंय.
Adah Sharma : बॉलीवूड अभिनेत्री अदा शर्मा (Adah Sharma) हिचा 'बस्तर: द नक्सल स्टोरी' (Baster : The Naxal Story) या चित्रपटामुळे चर्चेत होती. या चित्रपटाची प्रेक्षकांना बरीच उत्सुकता होती, पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तितकी जादू करु शकला नाही. त्यामुळे सोशल मीडियावरही अदा शर्माला बरचं काही ऐकवलं जातंय. नुकतच अदा ही बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांच्या इफ्तार पार्टीला हजेरी लावली होती.
केरळमधील मुलींना आणि महिलांना फसवून तिला त्यांना इस्लाम धर्म स्विकारायला लावण्यास भाग पाडतो, अशी अदा शर्माच्या केरला स्टोरी या सिनेमाची गोष्ट आहे. त्यामुळे अदाने जेव्हा या इफ्तार पार्टीला हजेरी लावल्यामुळे अदाला मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात येत आहे. पण अदाने देखील या ट्रोलर्सना चोख उत्तर दिल्याचं पाहायला मिळतंय.
View this post on Instagram
सोशल मीडियावर अदा झाली ट्रोल
बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीला हजेरी लावल्यानंतर अदाला ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. ट्विटरवर एका युजरने म्हटलं की, 'ही कसली फ्रॉड आहे, या लोकांसाठी इतर दिवशी मुसलमान शत्रू असतात आणि तुम्ही त्यांच्या विरोधातले चित्रपट बनवता आणि मग काही खास प्रसंगी तेच मुसलमान तुमच्यासाठी चांगले असतात. कारण तुम्हाला बिर्याणी खाण्यासाठी बोलावलं जातं.' तर एका युजरने म्हटलं की, मॅम प्लीज मुस्लिमांविरुद्ध प्रोपगंडा असलेले चित्रपट बनवू नका, मी तुमचा खूप मोठा चाहता होतो.
अदाचं ट्रोलर्सना चोख उत्तर
या ट्रोलिंगला सामोरं जावं लागल्यानंतर अदाने देखील चोख उत्तर दिलं. अदाच्या या उत्तरानं सध्या साऱ्यंचंच लक्ष वेधलं. यावेळी अदानं म्हटलं की, डियर सर, दिवस कोणताही असो दहशतवादी हे शत्रू असतात, मुसलमान नाही. सध्या सोशल मीडियावर अदाने दिलेल्या या उत्तराची जोरदार चर्चा सुरु आहे.