43 व्या वर्षी चौथ्यांदा लग्न करणार अभिनेत्री, तीन मुलांची आई; कोरियोग्राफर बॉयफ्रेंडला केलं प्रपोज
Vanitha Vijayakumar : अभिनेत्री 43 व्या वर्षी चौथ्यांचा लग्न करणार आहे. तिला तीन मुलं असून ती आता पुन्हा एकदा लग्नाच्या बंधनात अडकण्यास तयार आहे.
Vanitha Vijayakumar : प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री वनिता विजयकुमार लवकरच चौथ्यांदा लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. वनिता कोरिओग्राफर रॉबर्टशी लग्न करणार आहे. अभिनेत्री वनिताने अलीकडेच तिच्या सोशल मीडियावर तिच्या चौथ्या लग्नाची बातमी देऊन चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. तिने लग्नाची तारीख जाहीर केली आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये वनिता एका गुडघ्यावर बसून अतिशय सुंदर रोमँटिक ठिकाणी रॉबर्टला प्रपोज करताना दिसत आहे.
43 व्या वर्षी चौथ्यांदा लग्न करणार अभिनेत्री
सोशल मीडियावर लग्नाचे आमंत्रण शेअर करताना वनिताने लिहिलं, "तारीख लक्षात ठेवा, 5 ऑक्टोबर 2024. वनिता विजयकुमार (हार्ट इमोजी) रॉबर्ट." फोटोमध्ये या कपलची केमिस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस पडली आहे. रॉबर्टनेही त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट देखील शेअर केली, ज्यामध्ये लिहिलं, "VR, मोठी घोषणा. 5 ऑक्टोबर 2024."
कोण आहे वनिता विजयकुमार?
वनिता विजयकुमार प्रसिद्ध तमिळ अभिनेत्री आहे. वनिता ज्येष्ठ तमिळ अभिनेते विजयकुमार आणि त्यांची दुसरी पत्नी, तमिळ अभिनेत्री मंजुला यांची मुलगी आहे. वनिताने यापूर्वी तीन वेळा लग्न केलं आहे. यापूर्वी वनिताने फोटोग्राफर पीटर पॉलसोबत लग्न केलं होतं. पीटर आधीच विवाहित होता आणि त्याला मुलेही होती. त्याने पहिल्या पत्नीपासून वेगळं होण्याआधी वनिताशी लग्न केल्यामुळे वादही झाला होता.
तीन वेळा मोडला संसार, तीन मुलांची आई
पीटरची पत्नी एलिझाबेथने नंतर घटस्फोट होण्याआधी त्याने वनितासोबत लग्न केल्यामुळे या जोडप्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली होती. 2020 मध्ये वनिता आणि पॉल परस्पर संमतीने वेगळे झाले. त्यानंतर 2007 मध्ये वनिताने बिझनेसमन आनंद जय राजनशी लग्न केले, पण त्यांचाही संसार फार काळ टिकला नाही. या जोडप्याला एक मुलगी असून तिची कस्टडी राजनकडे आहे.
ब्रेकअपनंतर पॅचअप, आता लग्नीनघाई
यानंतर वनिताने 2000 मध्ये अभिनेता आकाशशी तिसरं लग्न केलं. त्यांनाही एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले आहेत. मात्र, त्यांचे लग्न 2005 मध्ये त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 2010 मध्ये वनिता आणि आनंद वेगळे झाले. आनंदपासून विभक्त झाल्यानंतर वनिताने 2013 मध्ये रॉबर्टला डेट करायला सुरुवात केली. मात्र, 2017 मध्ये दोघांचं ब्रेकअप झालं. त्यानंतर या दोघांच्या नात्यात पुन्हा पॅचअप झालं आणि आता हे दोघं लग्न करणार आहेत.