एक्स्प्लोर

Hruta Durgule : 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण'मध्ये ऋता दुर्गुळे अव्वल 

Hruta Durgule : ‘फुलपाखरु’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री ऋता दुर्गुळे यंदाची महाराष्ट्राचा पॉप्युलर फेस ऑफ द इयर ठरली आहे.

Hruta Durgule : ‘फुलपाखरु’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून ऋता दुर्गुळेला ओळखलं जाते. ऋताने ‘फुलपाखरु’ या मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकली. ती नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असते.  झी टॉकीज वाहिनीने महाराष्ट्राचा पॉप्युलर फेस ऑफ द इयर  या विभागातून ऋताचं नाव जाहीर केलं आहे. झी टॉकीज वाहिनीच्या महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण या पुरस्कार सोहळ्यातील सर्वात लोकप्रिय चेहरा या पुरस्काराच्या रूपाने  प्रेक्षकांची पसंती कायम स्पेशल राहील असं म्हणत ऋताने हा आनंद साजरा केला आहे.  

"महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? "हा पुरस्कार सोहळा घेऊन यावर्षी पुन्हा एकदा झी टॉकीज ही वाहिनी रसिकांच्या भेटीला आली आहे. गेल्या वर्षभर प्रदर्शित झालेल्या सिनेमांमधून विविध बारा विभागासाठी हे पुरस्कार जाहीर केले आहेत. यामध्ये महाराष्ट्राचा फेव्हरेट पॉप्युलर फेस ऑफ दि इअर, फेव्हरेट अभिनेता, अभिनेत्री, खलनायक, सहाय्यक अभिनेता , सहाय्यक अभिनेत्री, फेव्हरेट सिनेमा, गायक, गायिका, गाणं, संगीतकार, दिग्दर्शक आणि स्टाईल आयकॉन अशा विभागांचा समावेश आहे. झी टॉकीज वाहिनीतर्फे दरवर्षी जाहीर होणाऱ्या महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण या पुरस्कार सोहळ्यात कोण बाजी मारणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागलेले असते. या पुरस्कारासाठी नामांकन झालेल्या कलाकारांमधून प्रेक्षकच त्यांच्या पसंतीची मोहर उमटवत असतात. 

छोट्या पडद्यावर मोठी प्रसिद्धी  मिळवणारी अभिनेत्री ऋता दुर्गळे सरत्या वर्षात मोठ्या पडद्यावरही झळकली होती. ऋताने टाइमपास 3 या पहिल्याच सिनेमात साकारलेल्या टपोरी गर्ल पालवीने अक्षरशा धमाल केली. दुर्वा या मालिकेतून तिने अभिनयाला सुरूवात केली. फुलपाखरू, मन उडू उडू झालं या तिच्या मालिकाही गाजल्या. दादा एक गूड न्यूज आहे या नाटकातूनही ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.फुलपाखरु या मालिकेतून ऋता प्रसिद्धीझोतात आली. 

इन्स्टाग्रामवर ऋताचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. इन्स्टाग्रामवर 25 लाख फॉलोअर्स असलेली ऋता ही एकमेव मराठी अभिनेत्री आहे असं म्हटलं जातं. अनेक कार्यक्रमांमध्ये ऋता ची स्टाईल फॉलो केली जाते. दरम्यान, ऋताने दोनच दिवसांपूर्वी एक पोस्ट शेअर करत आजचा दिवस खास असल्याचे म्हटले होते. तिच्या या पोस्टनंतर अनेकांनी तर्क वितर्क लढवले होते. अखेर तिने ती पोस्ट का केली होती हे आजच्या बातमीतून चाहत्यांच्या लक्षात आलं आहे.  “आजचा दिवस फारच खास आहे”, असे कॅप्शन तिने एक फोटो शेअर करून दिले होते.  

"झी टॉकीज या वाहिनीतर्फे महाराष्ट्राचा सर्वात लोकप्रिय चेहरा म्हणून प्रेक्षकांनी पसंती दिली हेच माझ्या अभिनयाचं सार आहे असं मला वाटतं . कलाकार म्हणून प्रत्येकालाच कोणतंही माध्यम हे खुणावत असतं. मी पण कधीच असं ठरवलं नव्हतं की मालिकांमध्ये काम करायचं की सिनेमात रमायचं की रंगभूमीवर स्वतःला सादर करायचं. पण जसजशी मला संधी मिळत गेली तसं मी त्या संधीचं सोनं करायचं इतकच ठरवलं होतं. मालिकांनी मला ओळख दिली. नाटकाने माझ्यातील रंगभूमीवरच्या अभिनयाला लागणारा आत्मवश्विास दिला. प्रत्येकालाच आपल्या आयुष्यातील पहिली गोष्ट ही कायम खास असते आणि माझ्यासाठी झी टॉकीज वाहिनी तर्फे महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय चेहरा म्हणून मिळलेली पुरस्काराची  भेट आयुष्यभर एक स्पेशल पुरस्कार बनवून राहील, अशा भावना ऋताने व्यक्त केल्या आहेत.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uttar Pradesh Loksabha Election : पाचव्या टप्प्याच्या मतदानापूर्वी उत्तर प्रदेशात 'या' पाच घटनांमुळे रातोरात समीकरण बदलणार?
पाचव्या टप्प्याच्या मतदानापूर्वी उत्तर प्रदेशात 'या' पाच घटनांमुळे रातोरात समीकरण बदलणार?
उष्णतेचा कहर! तापमानाचा पारा 46 अंशाच्या पुढे, 'हे' शहर ठरलं देशातील सर्वात उष्ण 
उष्णतेचा कहर! तापमानाचा पारा 46 अंशाच्या पुढे, 'हे' शहर ठरलं देशातील सर्वात उष्ण 
Nashik Lok Sabha : नाशिकमध्ये मविआच्या रॅलीदरम्यान दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने, भगूरमध्ये जोरदार घोषणाबाजी
नाशिकमध्ये मविआच्या रॅलीदरम्यान दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने, भगूरमध्ये जोरदार घोषणाबाजी
Pankaj Tripathi : 'पंचायत'च्या विधायकजींनी साधला पंकज त्रिपाठीवर निशाणा, 'स्ट्रगल'चा ढोल बडवणारे...
'पंचायत'च्या विधायकजींनी साधला पंकज त्रिपाठीवर निशाणा, 'स्ट्रगल'चा ढोल बडवणारे...
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 01 PM : 18 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMallikarjun Kharge India Alliance PC : खतांवरचा GST रद्द करू, महिलांना वर्षाला 1 लाख देऊ : खरगेTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 18 May 2024: ABP MajhaSangali Cafe Todfod Special Report : कॅफे संस्कृती, वाढतेय विकृती! कॅफेमधले काळे धंदे कधी थांबणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uttar Pradesh Loksabha Election : पाचव्या टप्प्याच्या मतदानापूर्वी उत्तर प्रदेशात 'या' पाच घटनांमुळे रातोरात समीकरण बदलणार?
पाचव्या टप्प्याच्या मतदानापूर्वी उत्तर प्रदेशात 'या' पाच घटनांमुळे रातोरात समीकरण बदलणार?
उष्णतेचा कहर! तापमानाचा पारा 46 अंशाच्या पुढे, 'हे' शहर ठरलं देशातील सर्वात उष्ण 
उष्णतेचा कहर! तापमानाचा पारा 46 अंशाच्या पुढे, 'हे' शहर ठरलं देशातील सर्वात उष्ण 
Nashik Lok Sabha : नाशिकमध्ये मविआच्या रॅलीदरम्यान दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने, भगूरमध्ये जोरदार घोषणाबाजी
नाशिकमध्ये मविआच्या रॅलीदरम्यान दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आमनेसामने, भगूरमध्ये जोरदार घोषणाबाजी
Pankaj Tripathi : 'पंचायत'च्या विधायकजींनी साधला पंकज त्रिपाठीवर निशाणा, 'स्ट्रगल'चा ढोल बडवणारे...
'पंचायत'च्या विधायकजींनी साधला पंकज त्रिपाठीवर निशाणा, 'स्ट्रगल'चा ढोल बडवणारे...
Ratnagiri News: शक्कल करून लाखोंची वीज चोरी; महावितरणने केला कोकणातील सर्वात मोठ्या चोरीचा पर्दाफाश
शक्कल करून लाखोंची वीज चोरी; महावितरणने केला कोकणातील सर्वात मोठ्या चोरीचा पर्दाफाश
Sara Ali Khan : अभिनेत्री सारा अली खान लवकरच अडकणार लग्नबंधनात; कोण आहे 'प्रिन्स'?
अभिनेत्री सारा अली खान लवकरच अडकणार लग्नबंधनात; कोण आहे 'प्रिन्स'?
Uddhav Thackeray on Raj Thackeray : पीएम मोदींसमोर राज ठाकरेंच्या पाच मागण्या; उद्धव ठाकरेंनी दोन वाक्यात विषय संपवला!
पीएम मोदींसमोर राज ठाकरेंच्या पाच मागण्या; उद्धव ठाकरेंनी दोन वाक्यात विषय संपवला!
Shantigiri Maharaj : भाजपने पाठिंबा दिल्याचा दावा केल्यानंतर शांतीगिरी महाराजांची मोठी खेळी, थेट PM मोदींच्या कटआऊटवर पुष्पवृष्टी
भाजपने पाठिंबा दिल्याचा दावा केल्यानंतर शांतीगिरी महाराजांची मोठी खेळी, थेट PM मोदींच्या कटआऊटवर पुष्पवृष्टी
Embed widget