Devika Rani Kissing Scene: ज्या काळात स्त्रियांचं सिनेमांमध्ये काम करणंही कठीण होतं, त्या काळात 'या' धाडसी अभिनेत्रीनं दिलेला किसिंग सीन
Devika Rani Kissing Scene: ज्या काळात स्त्रिया उंबरठाही ओलांडत नव्हत्या, त्या काळात 'या' धाडसी अभिनेत्रीनं सर्वांत मोठा किसिंग सीन देऊन खळबळ माजवलेली.

Devika Rani Kissing Scene: जेव्हा भारतीय चित्रपटसृष्टीची सुरुवात झाली, तेव्हा सेलिब्रिटी आणि दिग्दर्शकांना अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागलं. चित्रपटसृष्टीच्या सुरुवातीच्या काळात महिलांसाठी काम करणं खूपच कठीण होतं. आणि त्यात जर बोल्ड सीन दिला, तर बापरे बाप... किसिंग सीनबाबत तर मनात विचार करणंही अवघड... पण त्या काळत एका अभिनेत्रीनं सर्व चौकटी मोडून सर्वानाच आश्चरयचकित केलेलं. या अभिनेत्रीनं असं काही केलं की, जे करण्याआधी आजच्या अभिनेत्रीही शंभरदा विचार करतात.
एक काळ असा होता, जेव्हा चित्रपटांमध्ये रोमँटिक किंवा बोल्ड सीन्स शूट करणं गुन्ह्यासमान मानलं जायचं. त्यावेळी, एका अभिनेत्रीनं निर्भयपणे सामाजिक नियम तोडले आणि एक नवा मार्ग तयार केला. ती अभिनेत्री म्हणजे, देविका राणी (Devika Rani)... जी हिंदी चित्रपटांची पहिली ड्रीम गर्ल म्हणून ओळखली जाते.
देविका राणी कोण होती?
देविका राणीचा जन्म आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील एका सुशिक्षित आणि संपन्न कुटुंबात झाला. तिचे पालक डॉक्टर होते आणि त्यांनी त्यांच्या मुलींच्या शिक्षणाला खूप महत्त्व दिलं. या तत्वज्ञानामुळे देविकाला वयाच्या नवव्या वर्षी इंग्लंडमधील बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवण्यात आलं, ज्या काळात समाजात मुलींच्या शिक्षणाला फारसं महत्त्व दिलं जात नव्हतं. नंतर तिनं रॉयल अकादमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट (RADA) मध्ये अभिनयाचं शिक्षण घेतलं आणि चित्रपटांच्या जगात प्रवेश केला.
देविका राणीचं लग्न आणि चित्रपटात पदार्पण
1928 मध्ये देविका राणीची भेट चित्रपट निर्माते हिमांसू राय यांच्याशी झाली. दोघांनी 1929 मध्ये लग्न केलं. लग्नानंतर देविका केवळ अभिनेत्रीच नाही तर, चित्रपट निर्मितीच्या तांत्रिक पैलूंमध्येही निपुण बनली. हिमांसू राय यांच्या 'अ थ्रो ऑफ डाइस' या मूकपटासाठी तिनं खास ड्रेस डिझाइन आणि कला दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळलेली.
देविका राणीचा बोल्ड किसिंग सीन, ज्यामुळे खळबळ माजलेली
लग्नानंतर, हे जोडपं सिनेमाविषयक आणखी गोष्टी शिकण्यासाठी जर्मनीला गेलं. तिथे त्यांनी UFA स्टुडिओमध्ये चित्रपट निर्मितीचं प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर हिमांशू राय यांनी 1933 मध्ये देविका राणी यांची मुख्य भूमिका असलेला 'कर्मा' हा चित्रपट बनवला.
हा चित्रपट हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये बनवण्यात आला होता. 'कर्मा'मध्ये देविका राणी आणि हिमांशू राय यांच्यातील चार मिनिटांचं चुंबन दृश्य दाखवण्यात आलं होतं, जो त्यावेळी भारतीय चित्रपटसृष्टीसाठी खूप धाडसी मानला जात होता. हा सीन सिनेसृष्टीच्या इतिहासात अजरामर झाला, कारण तो भारतीय चित्रपटांमधील पहिला ऑन-स्क्रीन किसिंग सीन होता.
देविका राणीवर उठलेली टीकेची राळ
कर्मा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला असला तरी, त्यातील बोल्ड सीन्सच्या हेडलाईन्स बनल्या. अनेकांनी देविका राणीवर टीका केली आणि एक महिला असे बोल्ड सीन्स कशी करू शकते? असा प्रश्न उपस्थित केला. दरम्यान, देविकानं सर्व टीकेकडे दुर्लक्ष केलं आणि तिची अभिनय कारकीर्द सुरू ठेवली. तिला माहीत होतं की, जर समाज बदलायचा असेल तर कोणीतरी पहिलं पाऊल उचललं पाहिजे आणि तिनं तेच केलं...
देविका राणीला सन्मान आणि मान्यता मिळाली
देविका राणीच्या योगदानाची नंतर देशभरात दखल घेण्यात आली. दादासाहेब फाळके पुरस्कार मिळवणारी ती पहिली भारतीय अभिनेत्री ठरली. तिला पद्मश्री पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलेलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :


















