ट्वीटरवर विष पेरुन चालणार नाही, स्वत:चं बँक स्टेटमेंट शेअर केलं, अभिनेता सोनू सूद भडकला, नेमकं काय घडलं?
Actor Sonu Sood gets angry : अभिनेता सोनू सूद यांनी काही दिवसांपूर्वी लातूरमधील शेतकऱ्याला मदतीचं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर एका पत्रकाराने आज (दि.7) मदत केली की नाही? असा सवाल उपस्थित केला होता. आता सोनू सूदने प्रत्युत्तर दिलंय.

Actor Sonu Sood gets angry : लातूर जिल्ह्यातील हाडोळतीचे शेतकरी अंबादास पवार आणि त्यांची पत्नी मुक्ताबाई पवार हे खर्च परवडत नसल्याकारणाने बैलाच्या ठिकाणी स्वतः औतला राहून मशागत करत होते. वयोवृद्ध शेतकरी दाम्पत्याचा मेहनत करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. त्यानंतर सर्व स्तरातून या दाम्पत्याला मदतीचा हात मिळू लागला. अभिनेता सोनू सूदने तुम्ही नंबर पाठवा आणि बैल पाठवतो म्हणत मदत जाहीर केली. त्यानंतर यावर विरोधी पक्षांना सत्ताधाऱ्यांना अधिवेशनादरम्यान जाब विचारला. मात्र, सध्या सोनू सूद याच प्रकरणामुळे चर्चेत आलाय. नेमकं काय घडलंय? जाणून घेऊयात..
अभिनेता सोनू सूद याने काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांना बैल घेऊन देतो असं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर आज (दि.7) एका पत्रकाराने ट्वीटवरुन म्हणजे X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन सोनू सूद याच्यावर सवाल उपस्थित केले आहेत. गुरुप्रीत वालीय असं या पत्रकाराचं नाव आहे.
गुरुप्रीत वालीया याने लिहिलं की, "या शेतकऱ्याचा फोटो तुम्हाला आठवतो का?" अभिनेता सोनू सूद यांनी लिहिलं होतं, "तुमचा नंबर पाठवा, बैल आम्ही पाठवतो." मी अनेकदा पाहिलंय की सोनू सूदची टीम 5% मदत करते आणि 95% प्रसिद्धी (PR) करते. ज्यांना खरंच मदत करायची होती, त्यांनी ती केली. राज्याचे मंत्री बाबासाहेब पाटील यांनी त्यांचं 42,500 रुपये कर्ज स्वतः फेडलं. आणि सोनू भाऊंची टीम फक्त एक्स (पूर्वीचं ट्विटर) वर कौतुकाची थाप घेत राहिली. कोणी मला सांगेल का की, जो माणूस आजही हाताने शेती करतो, त्याच्याकडे ट्विटर असणार तरी कुठे? बरं, जर सोनू भाऊंनी खरंच काही मदत केली असेल, तर जरूर सांगा — तेही मी लिहीन.
दरम्यान पत्रकाराने प्रश्न उपस्थित केल्यानंतर सोनू सूद प्रत्युत्तर दिलं आहे. सोनू सूदने त्याचं बँक स्टेटमेंट दाखवत शेतकऱ्याला पाठवलेल्या पैशांचं रेकॉर्ड शेअर केले आहे. बँक स्टेटमेंट शेअर करताना सोनू सूदने लिहिलं की, "माझ्या वाट्याची मदत तर मी आधीच आपल्या शेतकरी अंबादास यांना केली आहे.आता तुम्ही तुमच्या वाट्याची मदतही पाठवा ना 🙏 कारण काय आहे ना भाऊ, ट्विटरवर विष पसरवून देश चालत नाही. कोणाला मदत पोहोचवायची असेल तर मेसेज करा..जय हिंद!
मेरे हिस्से की मदद तो मैंने पहले ही हमारे किसान अंबादास भाई की कर दी थी।
— sonu sood (@SonuSood) July 7, 2025
अब अपने हिस्से की घास आप भी भेज देना 🙏
क्या है ना भाई, ट्विटर पे ज़हर फैलाने से देश नहीं चलेगा। किसी और को मदद पहुँचाना हो तो मेसेज कर देना 🙏
जय हिन्द 🇮🇳 https://t.co/E3jsMP0w3X pic.twitter.com/WxMd0IxjjW
इतर महत्त्वाच्या बातम्या























