स्टाईल सिनेमातील अभिनेत्याला ओळखणंही झालंय कठीण, वयाच्या 48 वर्षी केलंय 26 वर्षांनी लहान असलेल्या मुलीशी लग्न
Actor Sahil Khan marry 22 years old Milena Alexandra : स्टाईल सिनेमातील अभिनेत्याने वयाच्या 48 वर्षी केलंय 26 वर्षांनी लहान असलेल्या मुलीशी लग्न; 6 महिन्यांपूर्वी सुरु झालाय संसार

Actor Sahil Khan marry 22 years old Milena Alexandra : साल 2001 मध्ये अभिनेता शरमन जोशी आणि अभिनेता साहिल खान यांचा 'स्टाईल' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हलक्याफुलक्या कॉमेडीने सजलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांचे, विशेषतः तरुण प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले होते. ही फिल्म हिट झाली आणि त्याचबरोबर शरमन-साहिल ही जोडीसुद्धा लोकप्रिय ठरली. त्यानंतर 2003 मध्ये पुन्हा एकदा हे दोघं सिल्व्हर स्क्रीनवर एकत्र दिसले. मात्र, त्यानंतर या दोघांनी पुन्हा एकत्र कुठल्याही चित्रपटात काम केलं नाही. जिथे शरमन जोशी चित्रपटसृष्टीतच पुढे जात राहिला. मात्र, साहिल खानने फिटनेस व्यवसायात आपलं नशीब आजमावलं.
स्टाईल सिनेमातील अभिनेता साहिल खानच्या पर्सनॅलिटीमध्ये आता खूप बदल झालाय. त्याने सहा महिन्यांपूर्वी त्याने वयाच्या 48 व्या वर्षी 26 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्रीसोबत लग्न केलंय. बराच काळ साहिल चित्रपटसृष्टीपासून दूर होता, पण त्याच्या दुसऱ्या लग्नामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला होता. व्हॅलेंटाईन डेनिमित्त साधून साहिल खानने त्याची प्रेयसी मिलिना अलेक्झेंड्रासोबत दुसरं लग्न केलं. हे लग्न दुबईच्या बुर्ज खलिफामध्ये एका आलिशान रिसेप्शनसोबत साजरं करण्यात आलं होतं, ज्यात कपलचे जवळचे मित्र आणि कुटुंबीय सहभागी झाले होते. या रिसेप्शनच्या अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायर देखील झाले होतं.
View this post on Instagram
वय प्रेमाची व्याख्या करत नाही
माहितीसाठी सांगायचं झालं, तर साहिलने आपल्यापेक्षा तब्बल 26 वर्षांनी लहान असलेल्या मुलीशी लग्न केलं आहे. जेव्हा लोकांना याबाबत समजलं, तेव्हा अनेक चर्चांना सुरुवात झाली. अलीकडेच एका मुलाखतीत साहिलने यावर उत्तर देताना सांगितलं की, "वय प्रेमाची व्याख्या करत नाही. आमची गोष्टही तशीच आहे. माझ्या मते, प्रेम हे समजूतदारपणा आणि परस्पर सुसंवादातून निर्माण होतं – आणि ते मला मिलिनामध्ये दिसलं."
View this post on Instagram
पहिल्या भेटीतच आकर्षण वाटलं
साहिलने पुढे सांगितलं की, "आमची भेट जेव्हा झाली, तेव्हा मिलिना फक्त 21 वर्षांची होती. मी तिला पहिल्यांदा मॉस्कोमध्ये तिच्या आईसोबत एका रेस्टॉरंटमध्ये डिनर करताना पाहिलं. त्याच वेळी मी माझ्या मित्रांसोबत तिथे होतो. त्यानंतर मी तिला मॉडेलिंग आणि फोटोशूटसाठी ऑफर दिली, पण तिने नकार दिला. ती म्हणाली की, तिला यामध्ये रस नाही आणि ती अशा व्यक्तीच्या शोधात आहे, ज्याच्यासोबत ती लग्न करून संसार करु शकेल."
साहिल पुढे बोलताना म्हणाला, "हे ऐकून मला ती गोष्ट आवडली आणि त्याच क्षणी मला वाटलं की मी हिला लग्नासाठी विचारावं. मी तिला पाहिल्यानंतर लगेचच तिच्याकडे आकर्षित झालो होतो. आणि मला जाणवलं की तीही माझ्याकडे तसंच पाहतेय. वयाच्या फरकाबाबत मी असं म्हणेन की, मिलिना तिच्या वयापेक्षा अधिक प्रगल्भ आहे. आम्ही आमच्या नात्याविषयी गंभीरपणे चर्चा केली. नंतर एकमेकांच्या कुटुंबीयांची भेट झाली आणि आता मिलिना अलेक्झेंड्रा खान ही माझी पत्नी आहे."
इतर महत्त्वाच्या बातम्या
























