एक्स्प्लोर

अभिनेता राजपाल यादवला अंतरिम जामीन; महत्वाची एक अट पूर्ण केल्यानंतर भाच्चीच्या लग्नासाठी सोडलं

याआधी 12 फेब्रुवारीच्या सुनावणीत न्यायालयाने राजपाल यादव यांना फटकारले होते. “आम्हाला तुमच्याबद्दल सहानुभूती असू शकते, पण कायदा आपलं काम करतो,” असे कोर्टाने स्पष्ट केले होते.

Rajpal Yadav Bail: चेक बाउंस प्रकरणात 5 फेब्रुवारीपासून तिहार तुरुंगात असलेल्या अभिनेता राजपाल यादव (Rajpal Yadav) यांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने आज झालेल्या सुनावणीत त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला. भाचीच्या लग्नासाठी त्यांना 18 मार्चपर्यंत अंतरिम जामीन देण्यात आला आहे. चेक बाउंस प्रकरणात तिहार जेलमध्ये असलेल्या अभिनेता राजपाल यादव यांच्या जामिन अर्जावर आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. मात्र न्यायालयाने राजपाल यांच्यासमोर एक महत्त्वाची अट ठेवली होती. दिल्ली उच्च न्यायालयाने राजपाल यादव यांच्या वकिलांना अंतरिम जामिनासाठी आज दुपारी 3 वाजेपर्यंत प्रतिवादी कंपनीच्या नावे 1.5 कोटी रुपयांचा डिमांड ड्राफ्ट जमा करण्याचे निर्देश दिले होते. 

3 वाजेपर्यंत DD जमा करा..

दिल्ली उच्च न्यायालयाने यापूर्वी राजपाल यादव यांच्या वकिलांना अंतरिम जामिनासाठी प्रतिवादीच्या नावे 1.5 कोटी रुपयांचा डिमांड ड्राफ्ट दुपारी 3 वाजेपर्यंत जमा करण्याचा अल्टिमेटम दिला होता. “रक्कम वेळेत जमा केल्यास सुटका करू, अन्यथा उद्या सुनावणी,” असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. यानंतर वकिलांनी 1.5 कोटींचा डीडी जमा केल्याची माहिती कोर्टाला दिली. त्यानंतर शाहजहांपूर येथे भाचीच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी राजपाल यादव यांना अंतरिम सुटका देण्यात आली. मात्र, त्यांना पासपोर्ट जमा करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. प्रकरणाची पुढील सुनावणी 18 मार्च रोजी होणार आहे.

याआधी 12 फेब्रुवारीच्या सुनावणीत न्यायालयाने राजपाल यादव यांना फटकारले होते. “आम्हाला तुमच्याबद्दल सहानुभूती असू शकते, पण कायदा आपलं काम करतो,” असे कोर्टाने स्पष्ट केले होते. कोर्टाच्या आदेशानंतरही वेळेवर शरण न गेल्याबद्दलही न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती.

काय आहे प्रकरण?

राजपाल यादव यांनी 2010 मध्ये त्यांच्या दिग्दर्शकीय पदार्पणाच्या ‘अता पता लापता’ चित्रपटासाठी दिल्लीतील Murli Projects Pvt Ltd कडून 5 कोटी रुपये कर्ज घेतल्याचा आरोप आहे. चित्रपट फ्लॉप ठरल्यानंतर ते पैसे परत करू शकले नाहीत. तक्रारदाराला दिलेले सात धनादेश बाउन्स झाल्यानंतर 2018 मध्ये न्यायालयाने त्यांना आणि पत्नी राधा यादव यांना दोषी ठरवत सहा महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. नंतर 2019 मध्ये सेशन कोर्टानेही ही शिक्षा कायम ठेवली. जून 2024 मध्ये उच्च न्यायालयाने शिक्षा स्थगित करत थकबाकी (जी सुमारे 9 कोटींपर्यंत वाढली होती) फेडण्याचे निर्देश दिले होते. मात्र, वारंवार दिलेली हमी पूर्ण न झाल्याने 2 फेब्रुवारीला कोर्टाने त्यांना सरेंडर करण्याचे आदेश दिले होते.

महत्त्वाच्या बातम्या

Tiger Shroff Attack: टायगर श्रॉफवर हल्ला करण्यामागचं मुख्य कारण समोर; हल्लेखोरांची मागणी काय? मुंबईत दहशत अन्...
टायगर श्रॉफवर हल्ला करण्यामागचं मुख्य कारण समोर; हल्लेखोरांची मागणी काय? मुंबईत दहशत अन्...
Makarand Anaspure on Nana Patekar: 'बोट धरुन त्यांनी मला सिनेसृष्टीत आणलं'; नाना पाटेकरांमुळे मकरंद अनासपुरेंना कशी मिळाली अभिनयाची संधी? सांगितला किस्सा
'बोट धरुन त्यांनी मला सिनेसृष्टीत आणलं'; नाना पाटेकरांमुळे मकरंद अनासपुरेंना कशी मिळाली अभिनयाची संधी? सांगितला किस्सा
Ashwini Gorle Trolled: 'अगं पैठणी साडीची पूर्ण वाट लावलीस...'; 'तारिणी' फेम अभिनेत्री झाली ट्रोल, पैठणी साडीचा ड्रेस घालणं पडलं महागात, नेटकरी संतापले
'अगं पैठणी साडीची पूर्ण वाट लावलीस...'; 'तारिणी' फेम अभिनेत्री झाली ट्रोल, पैठणी साडीचा ड्रेस घालणं पडलं महागात, नेटकरी संतापले
Rashmika Mandanna: 'मी हजार वेळा विचारेन' रश्मिकाने सोडलं मौन, ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर; म्हणाली माझं हाड मोडलं तेव्हा...
'मी हजार वेळा विचारेन' रश्मिकाने सोडलं मौन, ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर; म्हणाली माझं हाड मोडलं तेव्हा...

व्हिडीओ

Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 : पुणे पदवीधरची मतमोजणी सुरु होताच खळबळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही, मविआच्या हर्षदा देशमुखांच्या प्रतिनिधींचा आक्षेप, नेमकं काय घडलं?
पुणे पदवीधरची मतमोजणी सुरु होताच खळबळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही, मविआच्या हर्षदा देशमुखांच्या प्रतिनिधींचा आक्षेप, नेमकं काय घडलं?
Pune Vidhan Parishad Election Result 2026 : पुणे शिक्षक व पदवीधरचा महासंग्राम! पसंतीक्रमाच्या मतांची मोजणी सुरू; बंडखोरी अन् कुरघोड्यांचा कोणाला बसणार फटका?
पुणे शिक्षक व पदवीधरचा महासंग्राम! पसंतीक्रमाच्या मतांची मोजणी सुरू; बंडखोरी अन् कुरघोड्यांचा कोणाला बसणार फटका?
Pradeep Purnekar Thane Morcha: प्रदीप पूर्णेकरांच्या न्यायासाठी आज ठाण्यात विराट मोर्चा, एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी, भाजपचे नेतेही मैदानात उतरणार
प्रदीप पूर्णेकरांच्या न्यायासाठी आज ठाण्यात विराट मोर्चा, एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी, भाजपचे नेतेही मैदानात उतरणार
Election : सरपंचपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात महिलेचा पराभव..., गावकऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला, चिडी देवींच्या कुटुंबाला थेट 25 लाखांची आर्थिक मदत
चिडी देवींचा निवडणुकीत पराभव, गावकऱ्यांकडून थेट 25 लाखांची आर्थिक मदत, लोकांच्या एका निर्णयानं कुंटुंबाला आश्चर्याचा धक्का
Gokul Chairman Election 2026: गोकुळच्या अध्यक्ष निवडीत ट्विस्ट , देवेंद्र फडणवीसांची एन्ट्री होणार? महायुती उमेदवार रिंगणात उतरवण्याच्या तयारीत
गोकुळच्या अध्यक्ष निवडीत ट्विस्ट , देवेंद्र फडणवीसांची एन्ट्री होणार? महायुती उमेदवार रिंगणात उतरवण्याच्या तयारीत
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मोठी बातमी, प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकानं चौकशीला बोलावलं
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकानं चौकशीला बोलावलं
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
Embed widget