प्रसिद्ध अभिनेत्याला हत्या प्रकरणात जामीन मंजूर, तुरुंगाबाहेर आल्यावर हालत खराब; चाहत्यांचे मानले आभार
Renukaswamy Murder Case : प्रसिद्ध अभिनेता दर्शन थुगुदीपा याला जामीन मंजूर झाला आहे. तुरुंगाबाहेर आल्यावर त्याने चाहत्यांचे आभार मानले आहेत.

Actor Darshan Thoogudeepa Bail : प्रसिद्ध कन्नड अभिनेता दर्शन थुगुदीपा (Kannada Actor Darshan Thoogudeepa) याला अखेर काहीसा दिलासा मिळाला आहे. हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या दर्शन थुगुदीपाला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. रेणुकास्वामी हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या दर्शन थुगुदीपा याला जामीन मिळाला आहे. जामीन मिळाल्यानंतर तुरुंगाबाहेर आल्यावर दर्शनने चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्याने चाहत्यांकडून मिळालेलं प्रेम आणि समर्थनासाठी आभारी असल्याचं म्हटलं आहे.
कन्नड अभिनेता दर्शन थुगुदीपा याला रेणुकास्वामी या 33 वर्षीय ऑटो चालक हत्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. 11 जून 2024 रोजी पोलिसांनी त्याला अटक केली. अभिनेत्री पवित्रा गौडा हिला अश्लील संदेश पाठवल्याबद्दल ऑटो चालकाची हत्या केल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली होती. या प्रकरणात, आरोपी दर्शन, पवित्रा आणि इतर काहींना उच्च न्यायालयाने 13 डिसेंबर 2024 रोजी जामीन मंजूर केला होता, तर इतरांना आधीच जामीन मिळाला होता. आता दर्शनलाही जामीन मिळाला आहे.
प्रेम आणि आपुलकीबद्दल चाहत्यांचे आभार
आता दर्शन याला जामीन मिळाला असून तो तुरुंगाबाहेर आला आहे. तुरुंगाबाहेर आल्यावर त्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तो म्हणाला, 'मी माझ्या सर्व प्रिय सेलिब्रिटी, चाहत्यांचे यांच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आभार मानतो. मी नमस्कार करावा की धन्यवाद? मी काहीही म्हटलं तरी ते पुरेसं होणार नाही. तुम्ही माझ्यावर इतकं प्रेम दाखवलं आहेस की, मी ते कशाप्रकारे परत करावं, हेच मला कळतं नाही.'
तुरुंगातून परत आल्यानंतर आजारी आहे दर्शन
दर्शनने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पुढे त्याने त्याच्या वाढदिवशी चाहत्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली, पण त्याची तब्येत ठिक नसल्याचं सांगितलं. दर्शन म्हणाला की, "माझी तब्येत ठिक नाही, ही समस्या आहे, इतरं काही नाही. मी जास्त वेळ उभे राहून सर्वांचे आभार मानू शकत नाही. मी जेव्हा-जेव्हा कोणतेही इंजेक्शन घेतो तेव्हा मला 15-20 दिवस बरे वाटते, पण परिणाम कमी होताच पुन्हा वेदना सुरू होतात. मला ऑपरेशन करावं लागेल.' दर्शनने त्याच्या चाहत्यांना आश्वासन दिलं की तो लवकरच त्यांना भेटेल. पुढे काय करायचं याबद्दल मला माझ्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल. तुम्हाला माझ्या पाठीच्या कण्याच्या समस्यांबद्दल माहितीच आहे."
मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेता दर्शनची तब्येत ठीक नाही. आरोग्यासंबंधित समस्यांमुळे त्याला जामीन मिळाल्याचं सांगितलं जात आहे. दर्शन पाठीच्या कण्यासंबंधित दुखण्याने त्रस्त आहे. त्यासाठी त्याला शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. याच कारणासाठी न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केल्याचं सांगितलं जात आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या
























