अभिनेत्रीवर अत्याचार केल्याप्रकरणी अभिनेत्याला अटक, पोलिसांसमोर विष पिल्याचं नाटकही केलं, पण आता मुसक्या आवळल्या
Actor and Film maker Uttar Kumar arrested : अभिनेत्रीवर अत्याचार केल्याप्रकरणी अभिनेत्याला अटक, पोलिसांसमोर विष पिल्याचं नाटकही केलं, पण आता मुसक्या आवळल्या

Actor and Film maker Uttar Kumar arrested : गाझियाबाद पोलिसांनी अखेर दोन दिवस चाललेल्या लपंडावानंतर हरियाणा चित्रपट सृष्टीतील अभिनेता उत्तम कुमार (Uttar Kumar) याला अटक केली आहे. एका अभिनेत्रीने त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला होता. सुरुवातीला पोलिसांनी त्याला क्लिन चिट दिली होती; परंतु अभिनेत्रीने लखनऊ येथे आत्मदहनाचा प्रयत्न केल्यानंतर पुन्हा तपास सुरू करून दुसऱ्या अधिकाऱ्याकडे चौकशी सोपवण्यात आली. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अभिनेत्याने पोलिसांना घाबरवण्यासाठी सांगितले की त्याने काही विषारी पदार्थ खाल्ला आहे. त्यामुळे त्याला 24 तासांहून अधिक काळ मोठ्या रुग्णालयात देखरेखीखाली ठेवण्यात आले. या काळात उत्तर कुमारची (Uttar Kumar) पत्नी, नातेवाईक व ओळखीचे लोक यांनी पोलिस आयुक्तालयासमोर आंदोलनही केले.
उत्तर कुमारने विष खाल्ल्याचा बनाव रचला
हरियाणातील चित्रपटांचे अभिनेते व निर्माते उत्तर कुमार यांना अखेर गाझियाबादच्या शालीमार गार्डन पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांकडून अटक करण्यात आली. अमरोहा येथून त्यांना ताब्यात घेतल्यानंतर अटकेपर्यंत बरेच नाट्य घडले. 15 सप्टेंबरला सकाळी लवकर त्यांना अमरोहातून ताब्यात घेतले होते. त्यावेळी त्यांनी विष प्राशन केल्याचा बनाव करून पोलिसांना घाबरवले. पोलिसांनी तातडीने त्यांना मोठ्या रुग्णालयात दाखल केले. 16 सप्टेंबरच्या दुपारी सर्व चाचण्या पूर्ण झाल्यानंतर त्यांना शालीमार गार्डन पोलिस ठाण्यात नेऊन अटक करण्यात आली. (Actor and Film maker Uttar Kumar arrested)
पीडितेने आत्मदहनाचा प्रयत्न केला होता
या दरम्यान उत्तर कुमार यांच्या पत्नी व जवळच्या लोकांनी पोलिस आयुक्तालयासमोर आंदोलन केले. त्यांचा आरोप होता की मुलीच्या आत्मदहनाच्या धमकीमुळे पोलिस घाबरले. पोलिसांनी जेव्हा-जेव्हा उत्तर कुमारला बोलावले तेव्हा ते हजर झाले होते. पोलिसांनी त्यांना क्लिन चिट देत खटल्यात अंतिम अहवालही दाखल केला होता. पण आत्मदहनाच्या धमकीनंतर तपास अधिकारी बदलला गेला आणि त्यानंतर अमरोहातून त्यांना उचलण्यात आले.
अभिनेता उत्तम कुमारला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
उत्तर कुमारच्या समर्थनार्थ आलेल्या लोकांनी आरोप केला की तक्रारदार मुलगी त्यांच्याकडून तीन कोटी रुपये मागत होती. पैसे न दिल्यामुळे हे सर्व घडवून आणले गेले. शेवटी पोलिसांनी उत्तर कुमारला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावून जेलमध्ये पाठवले. (Actor and Film maker Uttar Kumar arrested)
इतर महत्त्वाच्या बातम्या























