Director Sanjay Gupta On Bollywood Celebrity Demand: 'व्हॅनिटी व्हॅनमध्ये बॉलिवूड स्टार्स नग्नावस्थेत...'; दिग्दर्शकानं उघडपणे सांगितलं इंडस्ट्रीचं काळं सत्य
Director Sanjay Gupta On Bollywood Celebrity Demand: संजय गुप्ता यांनी 40 वर्षांपासून ज्या इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत, त्याबद्दल अनेक किस्से सांगितले.

Director Sanjay Gupta On Bollywood Celebrity Demand: बॉलिवूड निर्माते (Bollywood Producers), दिग्दर्शक (Bollywood Director) आणि सेलिब्रिटी यांच्यात होणारे वाद काही नवे नाहीत. तसेच, आजवर अनेक निर्मात्यांनी बॉलिवूड सेलिब्रिटींच्या मागण्यांबाबत उघडपणे सांगितलं आहे. निर्मांत्यांनी सेलिब्रिटींच्या सांगितलेल्या मागण्या ऐकून अक्षरशः डोळे फिरतात. अशातच आता आणखी एका दिग्दर्शकानं बॉलिवूडमधील सेलिब्रिटींच्या मागण्या आणि त्यांच्या स्टाफवर होणाऱ्या खर्चाबाबत उघडपणे सांगितलं आहे.
दिग्दर्शक संजय गुप्ता (Sanjay Gupta) यांनी सांगितलं की, आजकाल काही स्टार्स सात व्हॅनिटी व्हॅनची मागणी करतात. तर अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे एकमेव चित्रपट स्टार आहेत, जे आजही त्यांच्या कर्मचाऱ्यांचा खर्च स्वतः उचलतात आणि चित्रपट निर्मात्यांकडून त्याचे अजिबात पैसे घेत नाहीत. तसेच, बोलताना त्यांनी अजय देवगण, हृतिक रोशन आणि काही इतर स्टार्सचं नाव घेत कौतुक केलं आहे, ज्यांच्याकडे स्टाफही जास्त नाही आणि ते आपल्या कर्मचाऱ्यांचे पैसेही निर्मात्यांकडून घेत नाहीत.
सायरस ब्रोचाच्या पॉडकास्टवर बोलताना संजय गुप्ता यांनी बॉलिवूड स्टार्सच्या अनेक गोष्टी उघडपणे सांगितल्या. संजय गुप्ता यांनी 40 वर्षांपासून ज्या इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत, त्याबद्दल अनेक किस्से सांगितले. त्यांनी किशोरावस्थेत सहाय्यक म्हणून सुरुवात केली आणि 1994 मध्ये 'आतिश: फील द फायर' या चित्रपटातून दिग्दर्शनात पाऊल ठेवलं. स्टार स्टाफ वाढवण्याच्या खर्चावर बोलताना ते म्हणाले की, "मिस्टर बच्चन, अजय देवगण आणि हृतिक रोशनसह सर्व जुन्या कलाकारांकडे फक्त एक मेकअप मॅन आणि एक स्पॉट बॉय असायचा. निर्माते कर्मचाऱ्यांच्या खर्चाबद्दल तक्रार करतात आणि ते बरोबर आहे, आणि अचानक तुम्हाला लाखो रुपये द्यावे लागतात..."
पुढे बोलताना संजय गुप्ता यांनी सांगितलं की, "मी काही अशा अभिनेत्यांनाही ओळखतो जे सहा 'अनिवार्य' व्हॅनिटी व्हॅन घेऊन येतात, हे खरं आहे; मी खूप गंभीरपणे हे बोलतोय... पहिली व्हॅन ही त्या स्टारची पर्सनल स्पेस. तिथे स्टार त्याला हवं तसं वागतो, अगदी नग्नावस्थेत बसतो. त्याच्या पुढे सरांची दुसरी व्हॅन असते, जिथे ते त्यांचा मेकअप आणि केस सेटअप करतात. त्यानंतर, ती व्हॅन असते जिथे सर त्यांच्या मिटिंग्स घेतात. चौथ्या व्हॅनमध्ये त्यांची जिम असते, जिथे सर व्यायाम करतात...".
स्टार कपल्ससाठी 11 व्हॅनिटी व्हॅन
पुढे बोलताना संजय गुप्ता म्हणाले की, "सेटवर एक शेफ असतो आणि तो दिवसभर फक्त ग्रॅमच्या हिशोबात स्टार्सचं वजन मोजत राहतो... मग सहावी व्हॅन असते, पाच व्हॅनचे कर्मचारी कुठे बसतील? तर ते सहाव्या व्हॅनमध्ये" पुढे बोलताना संजय गुप्ता म्हणाले की, स्टार कपल्स असतील तर परिस्थिती आणखी वाईट आहे, कारण त्यांची वेगळ्या व्हॅनची मागणी असते. सेटवर 11 व्हॅन येतात. ते घरी एकत्र जेवतात का? ते पती-पत्नी आहेत, तरीही त्यांच्याकडे वेगळ्या किचन व्हॅन आहेत, मी अजिबात अतिशयोक्ती करत नाही... ही वस्तुस्थिती आहे..."
संजय गुप्ता म्हणाले की, अमिताभ बच्चन हे एकमेव अभिनेते आहेत, जे अजिबात हे कल्चर मानत नाहीत. मिस्टर बच्चन त्यांच्या स्टाफचे पैसे स्वतः देतात. निर्मात्यांना ते काहीच देऊ देत नाहीत... काहीही नाही... वेतन नाही, भाडं नाही. ते म्हणतात, 'हा माझा स्टाफ आहे; हे निर्मात्याचं काम नाही..'."
महत्त्वाच्या इतर बातम्या :























