सुप्रसिद्ध अभिनेता आदिनाथ कोठारेची मालिका विश्वात दमदार एन्ट्री; कोणत्या मालिकेत झळकणार?
Actor Adinath Kothare : सुप्रसिद्ध अभिनेता आदिनाथ कोठारेची मालिका विश्वात दमदार एन्ट्री केली आहे.

Actor Adinath Kothare : सुप्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता आदिनाथ कोठारेला आपण अनेक सिनेमा आणि वेबसिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. मात्र, आता आदिनाथ आता मालिका विश्वात दमदार एन्ट्री घेण्यासाठी सज्ज झाला आहे. स्टार प्रवाहच्या नशिबवान मालिकेतून रुद्रप्रताप घोरपडेच्या रुपात आदिनाथ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. रुद्रप्रताप घोरपडे हा नागेश्वर घोरपडेचा एकुलता एक मुलगा. दिसायला रुबाबदार... जणू एखादा राजकुमार... स्वभावाने मनमिमळावू, सर्वांची मदत करणारा रुद्रप्रताप नागेश्वरच्या स्वभावाच्या एकदम विरुद्ध आहे. वडिलांचा मोठा बिझनेस असल्याने रुद्रला परदेशी पाठवण्याची त्याच्या वडिलांची म्हणजेच नागेश्वरची इच्छा होती. पण रुद्रने गावात राहून गावातल्या लोकांच्या मदतीसाठी आणि सेवेसाठी आपलं आयुष्य वाहून घेण्याचा निर्णय घेतला.
View this post on Instagram
आदिनाथ कोठारेसाठी रुद्रपताप ही भूमिका ड्रीमरोल आहे. या भूमिकेविषयी सांगताना आदिनाथ म्हणाला, या मालिकेसाठी मी प्रचंड उत्सुक आहे. 'माझी पहिली दैनंदिन मालिका आहे. गेली अनेक वर्ष मालिका करण्याचा विचार सुरु होता. नशिबाने नशिबवान मालिकेच्या निमित्तानेच हा योग जुळून आला. टीव्ही हे फक्त माझंच नाही तर प्रत्येकाचच आवडतं माध्यम आहे. मालिकेच्या माध्यमातून तुम्ही घराघरात पोहोचता, प्रेक्षकांच्या कुटुंबाचा भाग होता. नशिबवान मालिकेची गोष्ट अतिशय सुंदररित्या गुंफण्यात आलीय. रुद्रप्रताप या भूमिकेला देखिल अनेक पदर आहेत. जे हळू हळू उलगडतील. स्टार प्रवाह वाहिनी सोबत खूप जुनं नातं आहे. निर्माता म्हणून कोठारे व्हिजनची पहिली मालिका स्टार प्रवाहसोबत केली होती. त्यानंतर अनेक सुपरहिट मालिका स्टार प्रवाहसोबत केल्या. पुन्हा एकदा नव्या प्रोजेक्टची सुरुवात महाराष्ट्राच्या नंबर वन वाहिनीसोबत होतेय याचा अतिशय आनंद आहे. मालिकेत दिग्गज कलाकारांची फौज आहे. गणेशोत्सवाच्या धामधुमीत अतिशय छान कलाकृती माझ्या वाट्याला आलीय. मला खात्री आहे बाप्पाच्या आशीर्वादाने नशिबवान मालिका देखिल प्रेक्षकांच्या मनात नक्कीच घर करेल. तेव्हा नक्की पाहा आमची नवी मालिका नशिबवान 15 सप्टेंबरपासून रात्री 9 वाजता फक्त स्टार प्रवाहवर...
इतर महत्त्वाच्या बातम्या























