एक्स्प्लोर

Stunt man Dies At Movie Set : 20 फूटांवरून कोसळून स्टंटमनचा चित्रपटाच्या सेटवर मृत्यू, सिनेसृष्टीत हळहळ

Stunt man Dies At Sardar 2 Shooting Spot : सेटवर स्टंटच्या दरम्यान 20 फूटांवरून कोसळून स्टंटमॅनचा मृत्यू झाला आहे. एलुमलाई असे मृत्यू झालेल्या सीनियर स्टंटमॅनचे नाव असून ते 54 वर्षांचे होते.

Stunt man Dies At  Sardar 2 Shooting Spot : 'सरदार-2' या चित्रपटाच्या सेटवर चित्रीकरणा दरम्यान भीषण अपघात झाला आहे. सेटवर स्टंटच्या दरम्यान 20 फूटांवरून कोसळून स्टंटमॅनचा मृत्यू झाला आहे. एलुमलाई असे मृत्यू झालेल्या सीनियर स्टंटमॅनचे नाव असून ते 54 वर्षांचे होते. चित्रपटात स्टंट करताना 20 फूटांवरून कोसळून त्यांचे निधन झाले. 

एलुमलाई यांनी रजनीकांत, कमल हासन, विजय, अजित कुमार यांच्या अनेक सिनेमांमध्ये स्टंट केले होते. मंगळवारी ते कार्तीच्या 'सरदार 2' या चित्रपटासाठी स्टंट करत होते. त्यानंतर एलव्ही प्रसाद लॅबच्या आवारात ते 20 फूट खाली कोसळले. या वेळी सुरक्षितेची पुरेशी काळजी घेण्यात आली नव्हती असे म्हटले जात आहे. अपघातानंतर त्यांना तातडीने  रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टर त्यांना वाचवू शकले नाहीत आणि उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या छातीभोवती अनेक जखमा होत्या. त्याशिवाय, फुफ्फुसांना गंभीर दुखापत झाली. विरुगंबक्कम पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे.

या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. एलुमलाई यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सरदार 2 चित्रपटाच्या सेटवर शोकाकूल वातावरण आहे. एलुमलाई यांच्या आठवणीत अनेकजण शोकाकुल झाले असून त्यांच्या डोळ्यात अश्रू वाहत आहे. 

सरदार 2 चे चित्रीकरण....

सरदार -2 चित्रपटाचे चित्रीकरण 15 जुलैपासून सुरू करण्यात आले. चेन्नईतील एलव्ही प्रसाद स्टुडिओत याचे चित्रीकरण सुरू होते. 12 जुलै रोजी 'सरदार-2'ची मुहूर्त पूजा पार पडली होती. यावेळी पीएस मथिरन, कार्थी आणि इतर क्रूचे सदस्य  उपस्थित होते. दिग्गज अभिनेते शिवकुमार हे देखील उपस्थित होते. 

'सरदार-2'मधील इतर कलाकारांबाबतची माहिती समोर आली नाही. या चित्रपटाचा पहिला भाग 2022 मध्ये रिलीज झाला होता. हा एक स्पाय थ्रिलर चित्रपट होता. या चित्रपटात कार्थी दुहेरी भूमिकेत होता. 

इतर महत्त्वाची बातमी :

महत्त्वाच्या बातम्या

Tiger Shroff: अभिनेता टायगर श्राॅफवर जुहूत गोळीबार, तीन अनोळखी व्यक्तींनी दुचाकीवरून येऊन गोळीबार केल्याने एकच खळबळ, टायगरसह चालक सुद्धा जखमी
अभिनेता टायगर श्राॅफवर जुहूत गोळीबार, तीन अनोळखी व्यक्तींनी दुचाकीवरून येऊन गोळीबार केल्याने एकच खळबळ, टायगरसह चालक सुद्धा जखमी
Gaurav More: गौरव मोरेनं घेतला iPhone 18 Pro; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; अभिनेत्याचं सडेतोड उत्तर, ट्रोलर्सची घेतली फिरकी!
गौरव मोरेनं घेतला iPhone 18 Pro; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; अभिनेत्याचं सडेतोड उत्तर, ट्रोलर्सची घेतली फिरकी!
Sachin Pilgaonkars Guru: सचिन पिळगावकर कुणाला मानतात आपले गुरू? कोणाकडून काय शिकले? गुरूंबद्दल केला मोठा खुलासा!
सचिन पिळगावकर कुणाला मानतात आपले गुरू? कोणाकडून काय शिकले? गुरूंबद्दल केला मोठा खुलासा!
Kavya Maran vs Anirudh: अनिरुद्ध अन् काव्याच्या लग्नाच्या चर्चांना उधाण; संपत्तीच्या बाबतीत कोण पुढे? दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत?
अनिरुद्ध अन् काव्याच्या लग्नाच्या चर्चांना उधाण; संपत्तीच्या बाबतीत कोण पुढे? दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत?

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका, सर्वाधिक फायदा 'या' कंपनीला
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
Satara News : कुरिअर कंपनीतून एकानं टीप दिली, पुणे बंगळुरु महामार्गावर दरोडा टाकत दीड कोटींचे सोने चांदीचे दागिने लुटले, पोलिसांनी 12 तासात 8 जणांना बेड्या ठोकल्या
पुणे बंगलोर महामार्गावर कवठे गावच्या हद्दीत दीड कोटींचा दरोडा, LCB नं तपासाची चक्र फिरवली, 12 तासात 8 जणांना बेड्या
Gokul Election: गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने 99.96 टक्के मतदान; 12 पैकी 10 तालुक्यात शंभर टक्के, गुलाल उद्या दुपारीच लागणार!
गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने 99.96 टक्के मतदान; 12 पैकी 10 तालुक्यात शंभर टक्के, गुलाल उद्या दुपारीच लागणार!
Sachin Sanap : एवढ्या मोठ्या पक्षाला शिक्षक उमेदवार मिळाला नाही, माझ्या विरोधात मंत्री, आमदार प्रचारासाठी उतरलेत, सचिन सानप यांची भाजपवर टीका
एवढ्या मोठ्या पक्षाला शिक्षक उमेदवार मिळाला नाही, एकनाथ शिंदेंना वारं कोणत्या दिशेनं वाहतंय ते कळतं: सचिन सानप
Kolhapur Crime: कोल्हापुरात हातकणंगले तालुक्यात अवघ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला निर्घृण पद्धतीनं संपवलं; गावकऱ्यांकडून मोर्चा काढत गावातच फाशीची मागणी
कोल्हापुरात हातकणंगले तालुक्यात अवघ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला निर्घृण पद्धतीनं संपवलं; गावकऱ्यांकडून मोर्चा काढत गावातच फाशीची मागणी
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठा ट्विस्ट, महादेव जानकरांची घोषणा; म्हणाले, दत्तात्रय सावंत 'रासप'चे उमेदवार, विजय पक्का
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठा ट्विस्ट, महादेव जानकरांची घोषणा; म्हणाले, दत्तात्रय सावंत 'रासप'चे उमेदवार, विजय पक्का
Embed widget