एक्स्प्लोर

Tiger Shroff: टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार

Tiger Shroff: मिळालेल्या माहितीनुसार, तीन अनोळखी व्यक्ती दुचाकीवरून आले आणि त्यांनी अचानक टायगर श्रॉफवर गोळीबार केला. या हल्ल्याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Tiger Shroff: मुंबईमध्ये जुहू पोलीस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरती बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमध्ये टायगर श्रॉफ बचावला असला तरी त्याचा ड्रायव्हर मात्र गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. तब्बल सात राऊंड फायर केल्यानंतर दुचाकीवरून आरोपी फरार झाले.समोर आलेल्या माहितीनुसार जुहू पोलीस स्टेशनच्या 100 मीटर अंतरावरती हा गोळीबार झाला. या गोळीबारानंतर आता रस्ता बंद करण्यात आला आहे. डीसीपी मोहित गर्ग यांनी घटनास्थल धाव घेतली. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी गोळीबार झाला तिथून 300 मीटर अंतरावरती रोहित शेट्टी यांच्याच घरावरती गोळीबार झाला होता. दरम्यान, टायगर श्रॉफच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर बिश्नोई गँगने या गोळीबाराची जबाबदारी घेतली आहे. या संदर्भातील एक ऑडिओ व्हायरल झाला असून या संदर्भात जर सलमान खानसोबत काम केल्यास तर प्रत्येकाचे हाल असाच होईल अशी धमकी सुद्धा  दिली आहे. 

गृहमंत्री यांनी या प्रकरणाकडे लक्ष दिले पाहिजे 

गोळीबारानंतर झिशान सिद्धीकी यांनी सांगितले की, आम्हाला दोन वर्षांत अजून न्याय मिळालेला नाही. माझ्या वडिलांच्या निधनाला दोन वर्षे झाली आहेत आणि मुंबईतील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती ज्या प्रकारे बिघडत आहे, ते खूप दुर्दैवी आहे. मला नुकतेच कळले की टायगर श्रॉफवर गोळीबार झाला, आणि ही एक अत्यंत चुकीची गोष्ट आहे. पूर्वी, जेव्हा माझा जन्मही झाला नव्हता, तेव्हा आम्ही मुंबई किती असुरक्षित होत आहे याबद्दल ऐकायचो. मी माझ्या सुरक्षेची मागणी करत आहे, पण माझी सुरक्षा एक टक्काही वाढलेली नाही. त्यामुळे, ही एक मोठी चिंतेची बाब आहे. मला वाटते की मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी या प्रकरणाकडे लक्ष दिले पाहिजे आणि आपण पोलीस अधिकारी व गुप्तचर यंत्रणेची निश्चितपणे चौकशी केली पाहिजे, कारण मुंबईत असे घडत आहे हे खूप दुर्दैवी आहे.

महाराष्ट्रात क्राईम वाढलेला आहे 

सुप्रिया ताई सुळे म्हणाल्या की, "हे धक्कादायक आहे, सातत्याने महाराष्ट्रात क्राईम वाढतोय. म्हणजे हा आरोप नाहीये, हे वास्तव आहे. केंद्र सरकारचा डेटा जो सांगतो, हे डबल इंजिन सरकार आहे. म्हणजे एकाच विचाराचं सरकार महाराष्ट्रात आहे आणि एकाच त्याच विचाराचं केंद्रात आहे. त्या केंद्र सरकारचा डेटा सांगतो की महाराष्ट्रात क्राईम वाढलेला आहे. म्हणजे अतिशय चिंताजनक आहे. माझी महाराष्ट्राच्या सरकारला विनंती आहे की एकीकडे प्रचंड दुष्काळ महाराष्ट्रात आहे, आत्महत्या वाढतायत, बेरोजगारी खूप मोठी आव्हानं राज्याच्या आणि देशाच्या समोर आहेत. कुठेतरी लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न हा वाढत चाललाय आणि लॉ अँड ऑर्डरचे प्रश्न कधी वाढतात? क्राईम कधी वाढतो? जेव्हा इकॉनॉमिक सिच्युएशन, आर्थिक इशूज जेव्हा वाढतात, तेव्हा या गोष्टी होतात. हे अतिशय चिंताजनक आहे आणि महाराष्ट्र सरकार या विषयाबद्दल गांभीर्याने नाही, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे."  

मुंबईत नेमकं चाललंय तरी काय?

दरम्यान, या हल्ल्यानंतर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार झाल्याची बातमी अत्यंत धक्कादायक आहे. मुंबईत नेमकं चाललंय तरी काय? बाबा सिद्दीकी यांची हत्या, सलमान खानच्या घरावर गोळीबार, अनेक अभिनेते आणि निर्मात्यांना धमक्या, मुंबईत कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. कायदा-सुव्यवस्था नाही, तर जणू निर्व्यवस्थाच निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री पूर्णपणे अपयशी ठरले आहेत! ‘महाराष्ट्राचा बिहार झाला’ असं म्हणण्याची वेळ आली होती; पण आता तर बिहार बरा, असं म्हणण्याची वेळ आली आहे. मुंबईला गुन्हेगारांच्या दहशतीत ढकलणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध!

अभिनेत्यांवर गोळीबाराची मालिका 

  • एप्रिल 2024: बांद्रा येथील गॅलेक्सी अपार्टमेंट या अभिनेत्याच्या निवासस्थानाबाहेर दोन अज्ञातांनी मोटारसायकलवर येऊन 5 राउंड गोळीबार केला होता. लॉरेन्स बिश्नोई गँगने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती, ज्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी कुख्यात गुन्हेगारांवर कारवाई करत गुन्हे दाखल केले आहेत.   
  • फेब्रुवारी 2026: मुंबईतील जुहू भागात प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या निवासस्थानाबाहेर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणातही पोलिसांनी तपासादरम्यान काही संशयितांना आणि शूटर्सना अटक केली आहे.   
  • जानेवारी 2026: ओशिवरा (अंधेरी, मुंबई) येथील एका गोळीबार आणि फायरिंग प्रकरणाशी संबंध असल्यामुळे अभिनेता तथा समीक्षक कमाल आर. खान (KRK) याला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले होते व त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली होती.   

इतर महत्वाच्या बातम्या

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tiger Shroff : टायगर श्रॉफ सुखरुप! गोळीबारानंतर टायगरनेच गाडी चालवून दोघांनाही नेलं रुग्णालयात, बॉलिवूडमध्ये खळबळ
Tiger Shroff : टायगर श्रॉफ सुखरुप! गोळीबारानंतर टायगरनेच गाडी चालवून दोघांनाही नेलं रुग्णालयात, बॉलिवूडमध्ये खळबळ
Gaurav More: गौरव मोरेनं घेतला iPhone 18 Pro; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; अभिनेत्याचं सडेतोड उत्तर, ट्रोलर्सची घेतली फिरकी!
गौरव मोरेनं घेतला iPhone 18 Pro; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; अभिनेत्याचं सडेतोड उत्तर, ट्रोलर्सची घेतली फिरकी!
Sachin Pilgaonkars Guru: सचिन पिळगावकर कुणाला मानतात आपले गुरू? कोणाकडून काय शिकले? गुरूंबद्दल केला मोठा खुलासा!
सचिन पिळगावकर कुणाला मानतात आपले गुरू? कोणाकडून काय शिकले? गुरूंबद्दल केला मोठा खुलासा!
Kavya Maran vs Anirudh: अनिरुद्ध अन् काव्याच्या लग्नाच्या चर्चांना उधाण; संपत्तीच्या बाबतीत कोण पुढे? दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत?
अनिरुद्ध अन् काव्याच्या लग्नाच्या चर्चांना उधाण; संपत्तीच्या बाबतीत कोण पुढे? दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत?
Advertisement

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका, सर्वाधिक फायदा 'या' कंपनीला
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
Satara News : कुरिअर कंपनीतून एकानं टीप दिली, पुणे बंगळुरु महामार्गावर दरोडा टाकत दीड कोटींचे सोने चांदीचे दागिने लुटले, पोलिसांनी 12 तासात 8 जणांना बेड्या ठोकल्या
पुणे बंगलोर महामार्गावर कवठे गावच्या हद्दीत दीड कोटींचा दरोडा, LCB नं तपासाची चक्र फिरवली, 12 तासात 8 जणांना बेड्या
Gokul Election: गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने 99.96 टक्के मतदान; 12 पैकी 10 तालुक्यात शंभर टक्के, गुलाल उद्या दुपारीच लागणार!
गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने 99.96 टक्के मतदान; 12 पैकी 10 तालुक्यात शंभर टक्के, गुलाल उद्या दुपारीच लागणार!
Sachin Sanap : एवढ्या मोठ्या पक्षाला शिक्षक उमेदवार मिळाला नाही, माझ्या विरोधात मंत्री, आमदार प्रचारासाठी उतरलेत, सचिन सानप यांची भाजपवर टीका
एवढ्या मोठ्या पक्षाला शिक्षक उमेदवार मिळाला नाही, एकनाथ शिंदेंना वारं कोणत्या दिशेनं वाहतंय ते कळतं: सचिन सानप
Kolhapur Crime: कोल्हापुरात हातकणंगले तालुक्यात अवघ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला निर्घृण पद्धतीनं संपवलं; गावकऱ्यांकडून मोर्चा काढत गावातच फाशीची मागणी
कोल्हापुरात हातकणंगले तालुक्यात अवघ्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला निर्घृण पद्धतीनं संपवलं; गावकऱ्यांकडून मोर्चा काढत गावातच फाशीची मागणी
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठा ट्विस्ट, महादेव जानकरांची घोषणा; म्हणाले, दत्तात्रय सावंत 'रासप'चे उमेदवार, विजय पक्का
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठा ट्विस्ट, महादेव जानकरांची घोषणा; म्हणाले, दत्तात्रय सावंत 'रासप'चे उमेदवार, विजय पक्का
Embed widget