Dasvi : दसवीच्या ट्रेलरची रिलीज डेट ठरली; 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस
नुकतीच एक पोस्ट अभिषेकनं (Abhishek Bachchan) सोशल मीडियावर शेअर केली आहे.
Dasvi : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अभिषेक बच्चनचा (Abhishek Bachchan) बहुचर्चित चित्रपट 'दसवी' (Dasvi) हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रटात अभिषेकसोबतच यामी गौतम (Yami Gautam) आणि निमरत कौर (Nimrat Kaur) या अभिनेत्री देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. तुषार जलोटा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. अभिषेक हा या चित्रपटात गंगाराम चौधरी ही भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर कधी रिलीज होणार? असा प्रश्न अभिषेकच्या चाहत्यांना पडला असेल. नुकतीच एक पोस्ट अभिषेकनं सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं ट्रेलरची रिलीज डेट जाहीर केली आहे.
अभिषेकनं दसवीचा पोस्टर शेअर केला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर 23 मार्च रोजी रिलीज होणार आहे. पोस्टर शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले, 'कल करे सो आज कर, आज करे सो अब, सबका एकही सवाल ट्रेलर आयेगा कब?' दसवीचा ट्रेलर 23 मार्च रोजी रिलीज होणार आहे. दसवी हा चित्रपट 7 एप्रिल 2022 रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
View this post on Instagram
दसवी बरोबरच अभिषेक हा आर बाल्की यांच्या आगामी चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात सैयामी खेर आणि शबाना आजमी हे कलाकार देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
संबंधित बातम्या
- RRR Sholay Viral : 'बाहुबली'च्या राजामौलीने 'साऊथ'मध्ये करुन दाखवलं, छत्रपती शिवाजी महाराजांची अंगावर काटा आणणारी फ्रेम
- The Kashmir Files : व्हॉट्सअप लिंकवरून 'द कश्मीर फाइल्स' डाऊनलोड करताय? मग तुमचेही बँक खाते रिकामं होऊ शकतं, तिघांना 30 लाखांचा फटका
- The Kashmir Files : केंद्र सरकारने 'द कश्मीर फाइल्स' करमुक्त करावा : अजित पवार
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha